नवीन लेखन...

निरंजन – भाग २६ – माता ब्रह्मचारिणी

नवदुर्गेचा दुसरा अवतार हा माता ब्रह्मचारिणी म्हणून ध्यानस्मरण करण्यात येतो. ब्रह्मचर्याशी संबंधित असा हा मातेचा अवतार आपल्याला ब्रह्मचर्याचे महत्त्व स्पष्ट करतो. ब्रह्मचर्यामध्ये खूप सामर्थ्य आहे. ब्रह्म म्हणजे ध्यान, तप, आणि तपस्या. ध्यानाचे आचरण म्हणजेच ब्रह्म-आचरण…

ब्रह्मचारिणी मातेने महादेवांसाठी अघोरी ध्यान केले होते. पूर्व अवतारामध्ये, साक्षात ऋषी नारदमुनींद्वारे मिळालेल्या आशीर्वादातून त्यांना हा संकेत मिळाला होता की कठोर परिश्रम करून देवी महादेवांची प्रसन्न करू शकतात, या कठोर ध्यानामध्ये विविध नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाऊन माता ब्रह्मचर्य स्वीकारुन आपले ध्यान संपुर्ण करतात. म्हणूनच मातेला ब्रह्मचारिणी म्हणून ओळखले जाते. मातेचा हा अवतार आपल्याला आपण निव्वळ एक शरीर नसून, आपण अखंड ज्योतिस्वरूप मन आहोत. याची जाणीव करून देतो. मातेच्या या स्वरूपाचे ध्यान आपल्याला ब्रह्मचर्य शिकवते. आपल्याला आपल्यातील अखंड चैतन्याची जाणीव करून देते. ब्रम्हांड-सृष्टीशी असलेले आपल्या मनाचे नाते किती अनंत काळासाठी जोडलेले आहे, याची जाणीव करून देते. मातेच्या या स्वरूपाचे ध्यान केल्यामुळे आपल्यामध्ये ब्रह्मचर्याची उर्जा उत्पन्न होते.

— स्वाती पवार 

Avatar
About स्वाती पवार 57 Articles
मी स्वाती... स्वतःला आनंद मिळतो म्हणुन लिहिणारी....... माझे "निरंजन" या लेखसंग्रहातुन दैनंदिन जीवनातल्या वेगवेगळ्या विषयांवर लेखन... या लेखनामधील निवडक लेखरचना या "|| ॐश्री ||" या ध्यानकेंद्रातील व्याख्यानमालेमधल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..