नवीन लेखन...

विविध प्रकारची परिक्षणे आणि परिचय

“नितळ” – आयुष्याचा तळ ढवळून टाकणारा आरसा !

दोन तास दहा मिनिटे संगणकाच्या पडद्यापासून हलू न देणारा हा नितांतसुंदर चित्रपट बघून मी भारावलो. अवघ्या पाच महिन्यांपूर्वी हा २००७ चा चित्रपट तू-नळीवर आला. ठळक कोडाचे अंश (डाग, पट्टे ) चेहेऱ्यावर बिनदिक्कत मिरवणारी आणि ते स्वीकारलेली डॉ देविका येते तिच्या रानडे नामक डॉ मित्राच्या घरी आणि तिला आपली “भावी” मानताना सगळ्यांची ओढाताण एवढा हा एक दिवसाचा चित्रपट (तरुण पिढी अपवाद, त्यांना तिच्या कोडासकट तिला स्वीकारायला काही अडचण नसते, आणि अर्थातच वृद्ध मंडळी, ज्यांच्या डोळ्यांमध्ये जगाचे असे अनेक अनुभव असतात)! […]

गर्भवतीची डायरी (पुस्तक परिचय)

आपले बाळ सुदृढ निरोगी असावे असे प्रत्येक आईला वाटत असते. मात्र त्यासाठी बाळ होण्यापूर्वी आणि बाळ झाल्यानंतर, शिवाय बाळाचे संगोपन करताना विशेष काळजी घ्यावी लागते. […]

‘कुटुंब’ – खरं एकत्र कुटुंब

आम्ही लहान असताना, 1999-2000 च्या सुमारास ‘प्रपंच’ हि मालिका लागायची अल्फा मराठी वर..आत्ताचं झी मराठी.. YouTube वर ‘प्रपंच’ चे काही भाग पाहिले आणि थेट 1999 मध्ये जाता आलं.. मोबाईल फोन नसलेला, घरोघरी कॉम्पुटर नसलेला तो काळ.. २०-२२ वर्षांचा काळ किती पटकन गेला.. छान आठवणी जाग्या झाल्या.. मात्र आता केवळ आठवणीच राहिल्या याचं वाईट सुद्धा वाटलं. […]

गोदावरी

‘अश्रद्धेकडून श्रद्धेकडचा प्रवास’… चित्रपटाचं उपशीर्षक एक प्रकारची हमी, सकारात्मकता देऊन जातं …आमच्यासारख्या सर्व सामान्य प्रेक्षकांना ‘and they lived happily ever after’ ची इतकी सवय आहे कि सिनेमा म्हटलं कि पहिल्यांदाच ‘शेवट गोड होतोय ना ‘ या कडे लक्ष लागून राहतं. ..आणि ते , ‘गोदावरी’ हा चित्रपट पूर्ण करतो.. […]

‘अचानक’ – रंजीशही सही !

अचानक हा एकमेव चित्रपट की जेथे कवी /शायर /गीतकार गुलजारला काही वाव नव्हता. संपूर्ण चित्रपटात कोठेही काव्य /कविता नाही म्हणून गुलजारने चित्रपटच कवितेत रुपांतरीत केला – एक अशी कविता जिच्या वर्णनासाठी आपण कायम मेहेंदी हसन साहेबांची गज़ल गुणगुणू – […]

“सहेला रे”- वपुंच्या “पार्टनर”पेक्षा, अमिताभच्या ” बेमिसाल “पेक्षा तरल !

“सहेला रे” प्रचंड तरल आहे. हा चित्रपटगृहातील पॉपकॉर्न गर्दीत किंवा घरच्या टीव्ही वर परिवारासमवेत पाहण्याचा अनुभव नाही. डोळसपणे निर्मात्यांनी तो “प्लॅनेट मराठी ” वर रिलीज केलाय,जो फक्त आपल्या एकांतातील संगणकावर/लॅपटॉप वर निगुतीने बघावा. […]

अनवट-सीता रामम !

१९६५ आणि १९८५ साली मानव्य आणि प्रियकर-प्रेयसी यांच्यातील प्रेम किती जिवंत,हळुवार, रसरशीत, नाजूक आणि भिडून जाणारं होतं याचा प्रत्यय काल “सीता रामम ” बघताना आला. मूळ भाषा तेलगू असली (with English subtitles) तरी दर्जेदार कलाकृती कायम भाषेच्या अडसरांना ओलांडून “ये हृदयीचे ते हृदयी ” पोहोचविते याचा हा दुसरा अनुभव. पहिल्यांदा पुलंनी कौतुक केलेला “शंकराभरणं ” एका […]

खळखळू हसणारा अवलिया पडद्याआड गेला

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांनी अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. ‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले. या नाटकामुळे त्यांना मनोरंजन सृष्टीमध्ये एक वेगळीच ओळख मिळाली होती. […]

स्वप्नपंखांना आकाश थिटे – मनोगत

स्वप्नांचे पंख लेऊन, सूर्यमंडळाला भेदू इच्छिणारी त्यांची गरुड झेप, आपल्या सर्वांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल. मराठी शब्दांशी होणारी झटापट सुलभ करणाऱ्या मिलिंद सरवटे या माझ्या मित्रास आणि माझ्या कोणत्याही लेखनाला पॉलिश करण्याचं काम तत्परतेने आणि आवडीने करणारे डिमेलोसर यांच्या मी ऋणातच राहू इच्छिते. […]

1 3 4 5 6 7 34
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..