नवीन लेखन...

चेहरे (कथा)

या चेहऱ्यांच्या सतत हेलकावणाऱ्या लाटेत गुदमरुन आपला चेहराही आपल्या लक्षात राहत नाही. गर्दीत भान हरवलेला चेहरा आपलं साम्य इतर चेहऱ्यात कुणी जिवाभावाचा माणूस भेटतो का पाहत असतो कारण इथं कुणाला कुणासाठी वेळ असतो ? […]

सुंदरी की वाघ? (संक्षिप्त आणि रूपांतरीत कथा ११)

फ्रँक स्टॉकटन हा खास करून मुलांचे वाडमय लिहिण्यासाठी खूप प्रसिध्द होता. त्याची ही गोष्ट इंग्रजी वाडमयात अतिशय लोकप्रिय आहे. कारण ती एक सुंदर रूपक कथा आहे. त्यात दैव आणि स्वेच्छा (Determinism versus Free Will) यांचा सनातन झगडा दाखवला आहे. राजा त्याला आरोपी करून त्याची व राजकन्येची स्वेच्छा हिरावून घेतो. परंतु राजकन्या गुपित जाणून घेऊन पुन्हा आपल्या इच्छेनुसार निर्णय घेऊ शकते. तसाच जंगलीपणा आणि सुधारणावाद यांतील द्वंद्वही दाखवले आहे. […]

गोमु आणि परी (गोमुच्या गोष्टी – क्रमांक १९)

गोमुच्या आणि माझ्या भेटी कमी झाल्या होत्या. फोनवर जुजबी बोलणं होई. व्हाटस ॲपवर गुड मॉर्निंग, सुप्रभात होत असे. पण गोमुची खरी खबर कळत नसे. गोमुच्या पार्टीनंतर जवळजवळ तीन महिने आमची भेट झाली नाही. हे अगदीच विचित्र होतं पण आम्ही दोघेही आपल्या कामांत व्यस्त होतो. पाहुणा म्हणून वृत्तपत्रांत लेखन करायला सुरूवात केली त्याची परिणती पांच वर्षांनी मी […]

गेटवे – मनोगत

ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार श्री प्रकाश बाळ जोशी यांचे गेटवे हे पुस्तक म्हणजे शहरी जीवनावर मार्मिक टिपणी करणाऱ्या मराठी शब्दचित्र व रेखाचित्रांचा संग्रह आहे. या पुस्तकातील कथा आता मराठीसृष्टीवर क्रमश: प्रकाशित करत आहोत. […]

क्युटशी गोष्ट – भाग १

सकाळच्या वेळी बाजारात भाजी घेत असताना सारिकाच्या खांद्यावरती एका हाताची थाप पडली. सारिका मागे वळून बघतल आणि आनंदाने आश्चर्यचकित होत म्हणाली, “अय्या! मीरा तू, अगं किती दिवसांनी भेटते आहेस…” […]

ख्रिस्मसचे गीत (संक्षिप्त रूपांतरीत कथा १०)

चार्लस डीकन्स हा व्हीक्टोरीयन काळांतील सर्वांत सुप्रसिध्द लेखक. त्याचे लिखाण आजही वाचले जाते. आजही शालेय/महाविद्यालयीन अभ्यासक्रमात त्याच्या वाङमयाचा समावेश असतोच. त्याला स्वतःला मात्र जास्त शिक्षण घेतां आलं नव्हतं. त्याच्या अनेक कादंबऱ्या, कथा आणि एखाद-दोन नाटके प्रसिध्द झाली. त्याचे बरेच लिखाण प्रथम साप्ताहिक किंवा इतर नियतकालिकांमधून मालिका स्वरूपांत प्रसिध्द झालं. सामाजिक विषयांवर लिहिणारा लेखक म्हणून तो गाजला. अनेक कृतींचे चित्रपटांत रूपांतर झाले. पिकवीक पेपर्स, टेल आॕफ टू सिटीज, डेव्हिड कॉपरफील्ड, आॕलीव्हर ट्वीस्ट, ग्रेट एक्स्पेक्टेशन्स आणि वरील कादंबरी ख्रिसमस कॕरोल ह्या कांही त्याच्या प्रसिध्द साहित्यकृती. ख्रिसमस कॕरोल ही कादंबरी सर्वांत प्रसिध्द कृती म्हणावी लागेल. त्यांत स्क्रूजच्या माध्यमातून दिलेला संदेश फारच महत्त्वाचा आहे. कादंबरी अर्थातच मोठी आहे. परंतु ख्रिसमस आलेला असल्यामुळे ती कथेच्या स्वरूपांत मी आपल्यापुढे सादर केली आहे. […]

गोमुची पार्टी (गोमुच्या गोष्टी – क्रमांक १८)

गोमुला दोन महिने हॉटेलचं काम चालू असतांना आणि नंतरच्या एक महिन्याचा पगार व नफ्याचा भाग मिळाला. आजवर गोमु आम्हां सर्व मित्रांना कोणत्या ना कोणत्या कारणावरून पार्टी द्यायला लावत असे. आता सर्व त्याच्या मागे लागले की आम्हाला पार्टी पाहिजे. गोमुनेही फारसे आढेवेढे न घेतां पार्टी द्यायचं मान्य केलं. ती सुध्दा तो “आपलेच हॉटेल”मध्येच देणार होता. मी आणि […]

द चेंज… (कथा) भाग-४

जसजसे दिवस जाऊ लागले,तसतसा वेदमध्ये एक नवा जोश दिसू लागला. आता त्याची नजर होती वर्क्स मॅनेजर या पदावर! त्यादृष्टीने फॅक्टरीत त्याची पाऊले पडू लागली. ग्वॉलियरवाल्यांनी जॉब वर्क दिल्याने एक नवा उत्साह त्याच्यामध्ये संचारला होता. […]

1 … 50 51 52 53 54 … 115
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..