नवीन लेखन...

श्रावण

श्रावण एक पवित्र महीना असे पुजा-पाठांचा प्रत्येक वारी व्रत वेगळे महिमा देवी-देवतांचा ऊन पावसाचा खेळ चाले नजारा इंद्रधनुष्याचा सणासुदीची सुरुवात होई पहीला सण नागपंचमीचा नारळीभाताची लज्जत भारी सण आगळा रक्षाबंधनाचा कृष्ण जन्माष्टमी साजरी होई तरुणाईत उत्साह दहीहंडीचा अळूवडी आणि अळूचे फतफत बेत शाकाहारी जेवणाचा सत्यनारायण पूजा घरोघरी साधकास लाभ श्रवणाचा श्री.सुनील देसाई १०/०८/२०२२

आयुष्य

आयुष्य संपत जाते, पण प्रेम संपत नाही किती करा परमार्थ, पण क्रोध आटपत नाही आधी कष्टे स्वतःसाठी, मग कुटुंबासाठी भरुन भांड ओसंडे, तरी लोभ सुटत नाही पैसा-अडका, जमीन-जुमला, घराण्याचा गर्व जववर असे दैव अनुकुल, मद हा हटत नाही सकाळ, दुपार, संध्याकाळ – देई शिव्या अपार एक दिवशीही मत्सर, केल्याविना दिसत नाही कुणावरही विश्र्वास न करी, सर्व […]

शंख-शिंपले

जिथे नदी किनारी शंख-शिंपले शोधले वाळूत खेळताना किती किल्ले बांधले // धृ // त्या दिवसांची आठवण येता, तुला ना विसरावे स्पर्श होता तुझ्या बोटांचा, पुन्हा सर्व आठवावे परंतु हा भास आता, स्वप्न वाटे चांगले //१// ते थोडेसे दिवस सुखांचे, भुर्रकन उडुन गेले जीवनात सात रंगांचे – इंद्रधनुष्य बनवुन गेले दिवस – रात्र, पुनर्भेटीचे वेध लागून राहीले […]

मृगजळ

रडवून पुन्हा, अश्रू पुसण्यात मजा नाही जेंव्हा हरतेस तू, जिंकण्यात मजा नाही मृगजळापाठी धावावे, कुठवर कोणी? प्रेम करुन सारखे, फसण्यात मजा नाही नुसता उगीच हा दिखावा, काय कामाचा? प्रेम नसेल तर मग, भेटण्यात मजा नाही प्रयत्ने रगडता वाळूचे कण, तेल गळे! बोलणे ते सोपे, रगडण्यात मजा नाही हुलकावण्या वाऽ, देशील तू किती कितीदा? पुन्हा पुन्हा सावरुन, […]

II चहा II

तो क्षण फार मस्त असतो जेंव्हा चहा उकळत असतो सुगंध सार्‍या घरभर पसरतो किचनमधून कपबशांचा आवाज येतो अमृतरुपी चहाला कधी स्वाद आल्याचा गवतीचहा कधी, तर कधी सुगंध वेलचीचा तुलसीचहा मसालाचहा – रंग नाना रुपांचा उत्तेजित करे,क्षमता वाढवे-आनंद देई जीवनाचा मग चहा संगे बिस्कीटे येती कुणी पोहे त्यात बुडवून खाती तर कुणी गरमागरम भुरके मारुन पिती बशीत […]

द चेंज… (कथा) भाग-४

जसजसे दिवस जाऊ लागले,तसतसा वेदमध्ये एक नवा जोश दिसू लागला. आता त्याची नजर होती वर्क्स मॅनेजर या पदावर! त्यादृष्टीने फॅक्टरीत त्याची पाऊले पडू लागली. ग्वॉलियरवाल्यांनी जॉब वर्क दिल्याने एक नवा उत्साह त्याच्यामध्ये संचारला होता. […]

द चेंज… (कथा) भाग-३

“का,सत्य कटू असतं म्हणून? ती घटना एक भास नसून विनाशकाली शक्तिने आपलं दाखवलेलं अस्तित्व आहे. कंपनीतील इतरांचा अनुभव तू चेष्टेवरी नेतो आहेस,पण त्यातही तथ्य आहे! मेलेल्या पंढरीचं भूत झालयं असं मला म्हणायचं नाही, पण ती जागा घातक झालेय!” […]

द चेंज… (कथा) भाग २

नऊ नंबर मशिन ठिक करुन वेद ड्रॉइंग करण्याच्या लाकडी चौकटीजवळ उभा होता. त्याची नजर सभोवार दहाही मशिन्सवर फिरत होती. व्हिवर तत्परतेने तुटलेले धागे जोडत होते. धागे जोडताना क्षणभर थांबलेल्या मशिन्स, धाडधाड आवाज करीत पुन्हा चालू होत होत्या. […]

द चेंज… (कथा) भाग-१

वेदला चहाच्या घोटाबरोबर वैदेहीचे विचार अस्वस्थ करु लागले… या जगात जशी पॉझिटिव्ह शक्ति आहे, तशीच निगेटिव्ह शक्तिही आहे. आणि त्याचमुळे या जगात चांगल्या गोष्टींबरोबर अनेक अमंगल अशा गोष्टी घडत असतात. पॉझिटिव्ह शक्ति म्हणजे देव, देवपण.. सुमंगल गोष्टी, तर निगेटिव्ह शक्ति म्हणजे भूत पिशाच्च, राक्षसीपणा.. अमंगल गोष्टी! […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..