नवीन लेखन...

हेच खरे प्रेम! हाच खरा विश्वास (कथा)

संज्ञा आणि सुकृत बालसोबती. दोघांची घरे शेजारी शेजारी होती. त्यामुळे दोन्ही घरात छान एकोपा होता. एकाच्या घरात शिजले तर दुसऱ्याच्या घरी द्यावे एवढेच नाहीतर एकाला वेदना झाली तर त्याची सल दुसऱ्याला जाणवायची. अशा प्रेमळ आणि सुसंस्कारित वातावरणात संज्ञा आणि सुकृत वाढत होते. […]

सुगंधाचे पुजारी (कथा)

मुंबईत राहणाऱ्या माणसाला काही वास येत असेल यावर माझा विश्वास नाही. चोवीस तास फॅक्टरीतलं प्रदुषण, चमत्कारिक वासाचे विषारी वायू, टनानं साठणारा कचरा, प्रचंड आकाराच्या दाट लोकवस्त्या, दलदल, चिखल, अपुऱ्या सोई यामुळे सकाळी उठल्यापासून झोपी जाईपर्यंत दुर्गंधीचं सदोदित आक्रमण होतच असतं. […]

ती पण एक सावित्री (कथा)

दहा वर्षे झाली, हरीष अंथरुणाला खिळला होता. जिवंत असून नसल्यासारखा. अर्धांगवायूच्या झटक्याने त्याच्या शरीराचा गोळा झाला होता. सर्व गरजांसाठी त्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागत होते. त्याला त्याच्या बायकोकडे रागिणीकडे बघून अतिशय दु:ख होत होते. मनात सारखे विचार यायचे माझ्याशी लग्न करून हिला कोणते सुख मिळाले. […]

कोजागीरी

“हो तर ! येत्या शनिवारी सायंकाळी पाच वाजता दीनानाथ नाट्यगृहा समोरून आपली बस निघेल. प्रवास साडेतीन तासांचा आहे. रात्री साडेआठला बस डहाणू समुद्र किनाऱ्यावर पोचेल. वाटेत सुका नाष्टा मिळेल. ही सहल अविस्मरणीय करायला आपल्या सोबत आहेत आपले लाडके वपु.” […]

तो रविवार (कथा)

तो रविवार मला अजूनही आठवतो आणि डोळ्यातून अलगद पाणी येते. कारण तो काळ आमच्यावरही आला होता पण त्यास प्रेमाने हरविले. आज आमच्या लग्नाला दहा वर्षे पूर्ण झाली. अशा संकटास दोघेही चोख प्रत्युत्तर देत आहोत,. […]

निर्णय (कथा)

खिडकीतून नजरेस पडणारी सूर्याची लालबुंद चकती एव्हाना क्षितिजाआड लुप्त झाली होती. आकाशात चंद्राची चंद्रकोर डोकं वर काढीत होती. ताऱ्यांचा अंधूक प्रकाश धुक्यातून वाट काढीत आल्यासारखा वाटत होता. कातरवेळेने परिसराचा कब्जा घेतला होता. तोच दरवाजाची बेल वाजली. मम्मीने दार उघडलं. महेश कामावरून परतला होता. येतायेताच त्याने विचारलं, “रुबी कुठाय?” […]

“क्रॉस कीज” चा भाडे-करार (संक्षिप्त रूपांतरीत कथा १५)

द लिज ऑफ द क्रॉस कीज’ मधे केवळ गैरसमजावर आधारीत विनोद आहे. अप्रत्यक्षपणे चर्चच्या अधिकाऱ्यांवर विनोद आहे. चर्चचे अधिकारी वाईट नसूनही केवळ गैरसमजांतून दुय्यम अधिका-याला बिशपबद्दल खात्री वाटत नाही. चर्चच्या प्रमुखाचे नांव खराब होऊ नये म्हणून चर्चचा दुय्यम अधिकारी टपरीच्या मालकाला टपरीचा भाडेपट्टा चौदाऐवजी एकवीस वर्षांसाठी वाढवून द्यायला सहज तयार होतो. मात्र ज्याच्यामुळे हे घडतं त्या वार्ताहराचं पुढे काय झालं, हे कथेत सांगितलेलं नाही. वाचकांच्या कल्पनाशक्तीवर सोडलं आहे कारण तें फार महत्त्वाचं नाही. […]

मुडदा (कथा)

आपल्यापैकीच एक जण मरण पावला. तो कसा मरण पावला हे बघवत नाही. मग कुणीतरी सहन न होऊन चादर पांघरतो. जिवंतपणी बिचाऱ्याला पांघरायला काही नव्हत. थंडी-जी काय थोडीफार वाजते तिच्यामुळे अर्धमेला झाला. गेल्यावरती पांघरुण मिळालं बिचाऱ्याला. मग त्या प्रेतावर डोळा ठेवून, त्यावर मयतासाठी पडणाऱ्या पैशांवर नजर ठेवून बसणारे महाभागही असतात. त्यांना दोष देण्यात तरी काय अर्थ ? त्यांनाही थंडी वाजतच असते. […]

वीस वर्षांनंतर (कथा)

बीटवरचा हवालदार मोठ्या तत्परतेनं आपलं ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’चं काम बजावत रस्त्यावर गस्त घालत होता. त्याची ही तत्परता कोणाला दाखवावी म्हणून नव्हती हे नक्की ! कारण रस्त्यावर रहदारीच नव्हती. रात्रीचे दहाच वाजत आले होते. पण कडाक्याची थंडी आणि बोचरं वारं या दोघांनी मिळून लोकाना घराबाहेर पडण्यापासून परावृत्त केलं होतं हे खरं. […]

चतुर्भुज गोमु (गोमुच्या गोष्टी – क्रमांक २०)

गोमुच्या आणि परीच्या प्रेमप्रकरणाची सुरूवात मी तुम्हांला सांगितली.
पण माणूस योजतो तसंच सर्व तडीस गेलं तर आयुष्य किती सोपं होईल. कांहीजणांच म्हणणं असतं की आयुष्य आपणच कठीण करत असतो. आपला दृष्टीकोन सकारात्मक असला की अर्धा भरलेला ग्लास दिसतो आपल्याला. अर्धा रिकामा आहे हे जाणवत नाही वगैरे, वगैरे. पण ज्याच्यावर प्रसंग येतो, त्यालाच त्याची गंभीरता कळते. इतरांना “त्यात काय एवढं !” असंच वाटतं. […]

1 … 48 49 50 51 52 … 115
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..