नवीन लेखन...

रेशीमगाठी – भाग १

काय रे केदार, असा का बसला आहेस डोक्याला हात लावून? बरं वाटत नाही का? आणि इतका उशीर?” प्रदीपने-केदारच्या मित्राने-विचारलं. केदार म्हणजे एक उमदा, सतत हसतमुख असणारा. वेळेच्या बाबतीत काटेकोर, कामात चोख.
मग आज काय झालंय त्याला? प्रदीपने काळजीने विचारलं.

“अरे, माझी बॅग मारली कुणीतरी!”
“बॅग मारली? कुठे?”
‘कुर्ल्याला!”
“तीच ना ती! व्ही.आय.पी. ॲ‍ॅरीस्टोक्रॅट? अरे, जाने दो यार। साली ती काय बॅग होती? ते प्लंबर, टीव्ही रिपेअरवाले वापरतात तसल्या बॅगा! तुला मी हज्जार वेळा सांगितलं की ती बॅग दे आता फेकून. एखादी चांगली घे तुझ्या मॅनेजरच्या पोझिशनला शोभेल अशी.”

“ते ठीक आहे रे, पण त्या बॅगेत मी आज दोन हजार रुपये ठेवले होते ते पण गेले!”

“काय? दोन हजार रुपये? अरे, मग रेल्वे पोलिसांकडे तक्रार करायचीस ना?

“हो केली ना. म्हणूनच तर उशीर झाला.”

“जाऊ देकेदार. पैसे गेले हे वाईटच झालं, पण ती बॅग तुला शोभत नव्हतीच. ता तरी चिक्कूगिरी सोड आणि घे एखादी नवी चकाचक बॅग.”

“अरे, आता त्याचे दोन हजार गेले ना ते वसूल होईपर्यंत तो दोन वर्ष पिशवी घेऊन येईल!” साने म्हणाला. तसे सगळे हसायला लागले.

“अरे, हसताय काय? ही काय चेष्टा मस्करी करायची वेळ आहे का?”
राऊतने सर्वांना दाटलं.

“केदार, जाऊ दे. जे झालं ते झालं. ही मुंबई आहे बाबा. कुणावर काय प्रसंग येईल सांगता येणार नाही. बरं, हे घे दोन हजार रुपये. मी आणले होते. पण माझं काम एवढं महत्त्वाचं नाही. तुझं काम झाल्यावर परत कर.”

त्याचे पैसे घेऊन मी संध्याकाळी मुंबई सेंट्रलला जाऊन काकाकाकूची राजधानी एक्सप्रेसची फर्स्ट क्लासची तिकिटं काढली आणि घरी गेलो. घरी गेल्यावर झालेला प्रकार सांगितला.

“तरी मी रोज सांगत होते. ती बॅग नेत जाऊ नकोस म्हणून. पण ऐकायचं नाव नाही. काय तिला एवढं सोनं लावून ठेवलं होतं कोण जाणे. म्हणे ती माझी लक्की बॅग आहे. कुणी चोरसुद्धा हात लावायचा नाही! आता चोराने नुसता हातच नाही लावला तर चांगला दोन हज्जार रुपयांचा हातही मारला ना? तुम्ही मुलं ना केदार बिलकूल ऐकायचे नाहीत. शंभर वेळा बजावलं होतं जाताना, की पैसे बॅगेत ठेवू नकोस म्हणून. ठेवले तर बॅग हातातच ठेव, वर फळीवर ठेवूनकोसम्हणून. शेवटी केलासच ना घोटाळा?”

“अहो, आता पुरे. जाऊ द्या!”बाबांनी आईच्या सुपरफास्टला ब्रेक लावला. “तो दमून भागून आलाय. त्याने तक्रार नोंदवलीय ना? जे झालं ते झालं. दोन हजार अक्कल खाती गेले असं समजा. माणूस अनुभवाशिवाय शिकत नाही. एरवी बॅगमध्ये फक्त डबा आणि एखादं वर्तमानपत्र असतं त्यामुळे फारशी काळजी नसते, पण आज एवढे पैसे होते म्हणून कळत नकळत याचं बॅगकडे लक्ष जात असणार. सराईत चोर असं सावज चटकन हेरतात. शिवाय प्रवाशांच्या बोलण्याकडे त्यांचं लक्ष असतं. याच्या बोलण्यात काही तरी विशेष आलं असणार. त्यावरून चोराने ‘त’ वरून ताकभात ओळखला असणार.” बाबांनी माझी बाजू सावरायचा प्रयत्न केला. पण त्याच्या बोलण्यात तथ्य असावं असं मला जाणवलं, सकाळी प्लॅटफॉर्मवर प्रभाकर भेटला होता. संध्याकाळी पिक्चरला जाऊ म्हणत होता. तेव्हा त्याला मी संध्याकाळी काकाकाकूची राजधानीची तिकिटं काढायला जाणार आहे. म्हणून आज येता येणार नाही असं म्हणालो होतो. आता आलं लक्षात. पण पैसे जायचे होते ते गेलेच. पण खरं दुःख पैशांचं नव्हतं. माझी लकी बॅग गेल्याचं होतं.लकी लकी म्हणताना तिने असा फटका द्यावा ना? याचाच मला राग येत होता.

— विनायक अत्रे

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 88 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..