नवीन लेखन...

एक परीस स्पर्श ( भाग – २५ )

विजयला बुटाचे आकर्षण लहानपणापासून होते. विजय कमवायला लागल्यावर त्याने कधी स्लीपर फार घातली नाही.मग ती कितीही महागातली का असेना ? गोव्यावरून विजयने आणलेली स्लीपर त्याने कारखान्यात काम करताना वापरली. […]

रेशीमगाठी – भाग ४

पाच-दहा मिनिटांतच एक उंचीपुरी, गौरवर्णी, तरतरीत मुलगी आत आली. वेळेवर पोचतो की नाही यामुळे येणारा एक प्रकारचा अस्वस्थ भाव तिच्या चेहऱ्यावर उमटला होता. ती घाईने क्लार्ककडे आली आणि तिने विचारलं, “का हो, कुणी केदार देशपांडे आले आहेत का?” […]

गोमुची मावशी (गोमुच्या गोष्टी -भाग ७)

मुंबईत वर्षानुवर्षे रहाणाऱ्यांना मुंबईत पहाण्यासारख्या कांही प्रेक्षणीय साईटस आहेत याचा पत्ताच नसतो. त्याचं बरेचसे आयुष्य लोकल प्रवासातच जातं. तो लोकलची स्टेशन पाठ म्हणून दाखवू शकतो पण प्रेक्षणीय स्थळाची कल्पना चौपाटीच्या पुढे जात नाही. […]

रेशीमगाठी – भाग ३

“देशपांडे साहेब, तुमची बॅग माझ्याकडे आलीय. त्यात तुमचा जेवणाचा डबा होता. त्यावर तुमचं नाव आहे किशोर देशपांडे म्हणून. त्यावरून मी हा टेलिफोन नंबर शोधला. ती बॅग आणि डबा घेऊन तुम्हाला भेटायला येतो साहेब!” […]

मॉडेल करोडपती (संक्षिप्त रूपांतरीत कथा १)

मूळ कथा-मॉडेल मिलियोनेर. लेखक – ॲास्कर वाईल्ड (१८५४-१९००). या कथेचे संक्षिप्त भाषांतर केले आहे श्री अरविंद खानोलकर यांनी. इंग्रजीतील अनेक उत्कृष्ट कथांना मराठीत भाषांतरित करुन त्या संक्षिप्त स्वरुपात मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम. […]

रेशीमगाठी – भाग २

“अग, ही मुंबई आहे. नगर नाही. इथली गर्दी आणि त्यातही ती ऑफिस टाइमच्या लोकलची. अग, नुसती गर्दी पाहूनच रोज जाणाराही हबकतो तर हिची काय कथा? इंटरव्हूला जाईपर्यंतच चिपाड होईल तिचं!” […]

गोमुची उधारी (गोमुच्या गोष्टी – भाग ६)

सर्वांची उधार देण्याची मर्यादा संपली की गोमु एखादी तात्पुरती नोकरी शोधी. पैसे हातात आले की बरीचशी उधारी फेडून टाकी आणि परत उधार घ्यायला मोकळा होई. उधारी करणे हे आपण मराठी माणसे कमीपणाच कां मानतो कुणास ठाऊक! तसं तर म्हणतात की मानव अथवा त्याचा आत्मा हे शरीर निसर्गाकडून उधारच घेतो आणि जातांना परत निसर्गांतच सोडून जातो. […]

रेशीमगाठी – भाग १

काय रे केदार, असा का बसला आहेस डोक्याला हात लावून? बरं वाटत नाही का? आणि इतका उशीर?” प्रदीपने-केदारच्या मित्राने-विचारलं. केदार म्हणजे एक उमदा, सतत हसतमुख असणारा. वेळेच्या बाबतीत काटेकोर, कामात चोख. […]

मि. साधे भोळे

“साहेब हेच आपले महापौर श्री. साधेभोळे, त्यांचीच इच्छा आहे की त्यांच्या मुलाखती सोबत त्यांचा हा साधासुधा फुलपेज फोटो छापावा. महानगरपालिका फुलपेज जाहिरातीचाखर्च देणार आहे रो, प.ला.” अरे वा! मग ठीक आहे. मग असा एकच का, चार रेड्यांचे फोटोही छापू आम्ही. ते राहू दे. मुलाखतीचे काय?” […]

इस्टेट एजंट गोमु (गोमुच्या गोष्टी – भाग ५)

आधी मुंबईमध्ये आणि नंतर नव्या मुंबईत जागांच्या किंमती कशा आणि किती पटींत वाढल्या याच्या गोष्टी आम्हाला कोणी ना कोणी ज्येष्ठ नेहमीच ऐकवत असतो. त्या अरेबियन नाईटस् मधल्या गोष्टीप्रमाणे सुरस आणि चमत्कारिक वाटतात. सीबीडीला आजच्या रद्दीच्या किलोच्या भावाने म्हणजे एक चौरस फुटाला दहा बारा रूपयेप्रमाणे लोकांनी जागा चाळीस वर्षांपूर्वी घेतल्या आणि आजच्या सोन्याच्या भावापेक्षा जास्त किंमतीत विकून पैसा […]

1 47 48 49 50 51 106
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..