नवीन लेखन...

संधीचं सोन! – Part 3

‘अग, पण हे चांगलं आहे का? मतदानासाठी लाच? छे, छे, मला नाही पटत.’ ‘अहो, आपण काही फुकट नाही घ्यायचं, पैसे देऊ त्यांना. आपल्याकडे मनुष्यबळ नव्हते म्हणून तर आपण घरच्याघरी करणार होतो ना? मग त्यांना संधी द्यायची तशी आपणही थोडी संधी साधली तर का बिघडलं?’ ‘चल, तूम्हणतेस तर घेऊ संधी. पण काही ओळख ना पाळख, काही घोटाळा […]

निर्णय (कथा)

ही माझी कथा २८ जुलै  २०१९ च्या ‘सकाळ’ मधे कथास्तु या सदरात प्रसिद्ध झाली आहे. […]

संधीचं सोन! – Part 2

‘आई, सांगा काय काय कामं आहेत? किती वाजता आहे साखरपुडा? कोणता हॉल घेतला आहे? मला एकदा सगळं सांगा, मग तुम्ही फक्त इथं खुर्चीवर बसून ऑर्डर सोडायची.बाकी सगळं मी बघतो.काय? आलं का लक्षात?’ बाळा. ‘अहो बाळाभाऊ, कसला हॉल? अहो या हॉलमधेच होणार आहे साखरपुडा. अगदी साधा घरगुती मामला आहे. आमच्या घरची माणसं आणि व्याह्यांची घरची माणसं, बस […]

टूर लिडर गोमु – भाग २ (गोमुच्या गोष्टी – भाग १०)

दोन दिवसांत कांही मला नांव पाठ झाली नव्हती. पण कोणी चुकू नये म्हणून सर्वांना कंपनीने दिलेली टोपी सतत डोक्यावर घालायची मी ताकीद दिली होती. माझ्या नशीबाने तिथे कोणी चुकले नाही. आम्ही आल्प्सच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन आलो. उतरल्यावर पुन्हा बसमधून ल्युसेर्नला गेलो. तिथे मोठाले तलाव पाहिले. सर्व कसं ठरल्यासारखं होत होतं. मला जास्त कांही करायला लागत नव्हतं. सर्व सदस्यही युरोपचं काश्मीर पाहिल्याच्या समाधानांत होते. […]

संधीचं सोन! – Part 1

गोविंदरावांनी तायडीच्या साखरपुड्याच्या कामांच्या यादीवरून अखेरची दृष्टी फिरवली. पायात चपला सरकावल्या आणि आत राधाक्कांना म्हणजे त्यांच्या पत्नीला आवाज दिला, ‘बरं का हो, मी जाऊन येतो बाहेर.’ ‘सगळं नीट लक्षात ठेवा. ती यादी घ्या बरोबर. ‘राधाक्कांनी बजावले. आज तायडीचा म्हणजे त्यांच्या मोठ्या मुलीचा साखरपुडा. मोठी म्हणजे मुलीत मोठी. दोन मुली, त्यात तायडी मोठी. बबडी छोटी. दोन मोठे […]

वैज्ञानिक वानर (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३)

स्टीव्हनसनचे वाङ्मय खूप प्रसिध्द आहे. डाॅक्टर जेकील आणि हाईड ही त्याची दीर्घकथा सर्व वाचकांच्या व सिनेरसिकांच्या परिचयाची आहे. अवघ्या ४४ वर्षांच्या (आतापर्यंतचे तीनही लेखक ॲास्कर वाईल्ड ४६, अँटन चेकॉव्ह ४४ आणि स्टीव्हनसन ४४ अल्पवयीच म्हणायचे) आंतच चौदा कादंबऱ्या आणि सहा कथासंग्रह लिहिले.
त्याने अरेबियन नाईटस् या नांवाखाली युरोपबद्दल सुरस कथा लिहिल्या. ट्रेझर आयलँड ही त्याची कादंबरीही प्रसिध्द आहे. […]

‘हार्ट’फिल

यमराज आजच्या ‘डिस्पॅच’ यादीवर नजर टाकत होते. त्यांनी नाव वाचलं ‘शुभांगी’, वय पन्नास, घरात सासू-सासरे, नवरा व मुलगा. मृत्यूचं निमित्त. हार्ट ॲ‍टॅक. वेळ. मध्यरात्र. शुभांगी दिवसभर घरकाम करुन थकलेली होती. तिचे पती शेखर, नुकतेच सरकारी नोकरीतून निवृत्त झाले होते. वयोवृद्ध सासू सासरे, हे तिचे आधारस्तंभ होते. मुलाचं काॅलेज शिक्षण पूर्ण होऊन तो चांगल्या कंपनीत नोकरीला लागला […]

लग्नाची बेडी – Part 2

पंधरा-वीस दिवसांनी एके दिवशी पहाटे पाच वाजताच राहुल आणि विभा येतात. विभा जीन्स आणि टॉपमध्ये, बॉबकट, तिचे स्वागत जरा नाराजीनेच होते. दोघेही चहा घेतात. थोडा आराम करून नऊ वाजता सगळे डायनिंग टेबलवर जमतात. थोड्या अवांतर गप्पा झाल्यावर राहुल म्हणतो, “आई-बाबा ही विभा. विभावरी कुलकर्णी आमच्या ऑफिसमधली माझी कलिग नुकतीच आमच्या कंपनीत जॉईन झाली आहे. हिचे आई […]

टूर लिडर गोमु – भाग १ (गोमुच्या गोष्टी – भाग ९)

मी जर तुम्हाला सांगितलं की गोमु टूर लिडर म्हणून एका सुप्रसिध्द ट्रॕव्हेल कंपनीतर्फे युरोपला ४९ जणांना टूरला घेऊन गेला, तर तुमचा तरी विश्वास बसेल कां या बातमीवर ? आणि ती खरीच आहे हे कळल्यावर गोमुचे ग्रहच
त्याच्यावर प्रसन्न झाले असं वाटेल की नाही ? […]

मन वढाय वढाय

मिलिंद राधिकाला घेऊन, डाॅ. परांजपे यांच्या मॅटर्निटी होममध्ये आला होता. गेल्याच वर्षी त्याचं राधिकाशी, शुभमंगल झालं होतं. वर्षभरातच ‘बाप’ होणार असल्याची गोड बातमी, राधिकाने त्याच्या कानात हळूच सांगितली होती. रिसेप्शनिस्टनं राधिकाचं नाव पुकारल्यावर, दोघेही डाॅक्टरांच्या केबिनमध्ये गेले. डाॅक्टरांनी राधिकाची तपासणी करुन काही गोळ्या व टाॅनिक्सची नावं त्यांच्या असिस्टंटला लिहून द्यायला सांगितली. त्या लेडी असिस्टंटकडे पाहून, मिलिंदला […]

1 45 46 47 48 49 105
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..