नवीन लेखन...

शतशब्द कथा – विषकन्या

आई ग! तिने डोळे मिटले. क्षणभरा करता तिला वाटले आपला चेहरा घामा एवजी रक्ताने डबडबलेला आहे. तिचे लक्ष सहजच पुस्तकाच्या कवरवर गेले. मोठ्या अक्षरात लिहिले होते ‘विषकन्या’.
[…]

सोन्याचे नाणे आणि धर्मराजाचा न्याय

विचारवंत माणसाने निर्णय घेतला. देवाने आपल्या वर कृपा केली आहे, भगवंताचा कृपा प्रसाद समजून सोन्याचे नाणे ग्रहण करायला काहीच हरकत नाही. असा विचार करून त्याने सोन्याचे नाणे उचलून खिश्यात टाकले….
[…]

सरपंचाची खेळी

डोंगर दर्‍याच्या खोर्‍यात अत्यंत दिमाखाने उभे असलेले बाभुळगांव सार्‍या महाराष्ट्राचा एक गौरव असलेले एक आदर्श गांव! गावाच्या चारही दिशांनी निसर्ग सौंदर्य होत, झुलझुळ वहाणारी सरीता तिच्या जवळ असलेल घाटांच सौंदर्य जवळच उभे असलेले प्राचीन असे हेमाडपंती धाटणिचे श्रीशंकराचे मंदिर हे सारे खरेतर त्यागावाचे एक भूषण होते. घाटाचे पायर्‍याचे आधार घेऊन उभे असलेले तुळशिवृंदावन नदीची शोभा द्विगुणीत करीत होते. 
[…]

न्याय व्यवस्थेत…………..भ्रष्टाचार !!!!!!!!!!

रामरावजी एक निष्ठावान सामाजिक कार्यकर्ते व स्वातंत्र सैनिक आपल्याच विचारात गढलेले चालत जात होतें. त्याच वेळी त्यांचे मित्र माधवराव पण सकाळच्या जॉगिंग साठी निघाले. त्यानां रामरावजी आपल्याच तंद्रीत उदग्विन्न मनस्थितीत कोणा कडे लक्ष न देतां चालताना दिसले. माधवरावनी त्यानां बऱ्याच हाका मारल्या पण त्यांचे लक्षच नव्हते .
[…]

एक सफर ऑस्ट्रेलियाची

अमेरिकेला जाऊन आल्यानंतर अगदी महिन्याभरातच ऑस्ट्रेलियाला जाण्याचा योग जुळून आला. एका महासत्तेला भेट दिल्यानंतर या दुसर्‍या प्रगत देशाला जाताना दोघांची तुलना करण्याचे विचार उमटणं साहजिकच होतं.
[…]

न्हैचिआड

वेंगुर्ल्याहून शिरोड्याकडे जातान वाटेत मोचेमाडची खाडी लागते. ही खाडी ओलांडली की डाव्या कुशीला जे गांव येतं ते आमचं न्हैचिआड. न्हय म्हणजेच नदीच्या अथवा खाडीच्या आड ते न्हैचिआड ! आमचं हे न्हैचिआड डोंगराच्या उतारावर वसलेलं आहे. गावात आम्हा इनामदार रेग्यांची पाच घरं आणि इतर शेतकर्‍यांची म्हणजेच इथल्या भाषेत कुळांची चाळीस पन्नास घरं. गावात वरचा वाडा आणि खालचा वाडा असे दोन भाग येतात. आमची घरं खालच्या वाड्यातली.
[…]

मिठाई

त्यानी मुठ उघडुन दाखवली, हातातले ५० रु. आजीकडे दिले व शेठनी “जा मी तुला माफ़ केलेय. हे पैसे घे आणि घरी जा या पैशाची मिठाई खा.” अस सांगीतल्याच सांगीतल. आजीला सुजलेला सख्याचा गाल दिसत होता, उपाशी दुसरी दोन नातवंड दिसत होती. आज घरात खायला काहीच नव्हत. आणखीन दोन दिवस उपाशी राहाव लागणार होत. तीनी ते पैसे देवासमोर ठेवले. सख्याला जवळ घेतल त्याच्या दुखर्‍या गालावरुन हळुवार हात फ़िरवत म्हणाली “सख्या, अरे ते मोठे लोक आहेत. आपण फ़ार लहान आहोत. शेठेनी मारल तर काय होतय ?तेच आपले अन्नदाते आहेत.” […]

९/९ विश्वास निवास

९/९, विश्वास निवास, परळ, मुंबई – १२ हा आमचा परळच्या घराचा पत्ता. आयुष्यातील पंचवीस वर्षे मी परळला काढली. जन्मल्यापासून म्हणजेच १९४९ सालापासून ते १९७४ पर्यंत. थोडक्यात माझं सर्व बालपण परळला गेलं. बालपण आणि तरुणपणातील काही सुरुवातीची वर्ष. आज साठीच्या दाराशी घुटमळत असतानाही मनात बालपणीच्या आठवणी टवटवीत आहेत. परळ ओलांडून पुढे जाताना या सर्व आठवणी जागृत होतात. परळचा रस्तान् रस्ता, तिथल्या इमारती, तिथली गजबज सारं काही पुन्हा आठवतं. क्षणार्धात काळ तीसएक वर्ष मागे झेपावतो. मी पुन्हा परळचा होऊन जातो आणि परळ माझं. […]

गिरणी कामगार ते नॉलेज वर्कर

एका पिढीतला तो गिरणी कामगार आणि दुसऱया पिढीतला हा नॉलेज वर्कर… सुखी कोण? हयातभर साच्यावर काम करुनही आज ऐन सत्तरीतही किमान दोन किलोमीटर सकाळ संध्याकाळ पायी चालणारा चंदूमामा? की डोळे-कान-तोंड-मान-मणका-पाठ-हात-मनगट-कंबर-गुढगे-पाय… सगळं काही पाच-सहा वर्षात कामातून घालवणारा आमचा आयटी युगातला नॉलेज वर्कर – प्रकाश? भले पैशाने नॉलेज वर्कर सुखी असेल पण तब्येतीने? कॉलेजमधून बाहेर पडल्यापडल्या वीस-पंचवीस हजाराचा पगार घेऊन दोन वर्षांनी औषध आणि डॉक्टरवर महिन्याला हजारो रुपये घालवायचे आणि कायमचे अनफिट होऊन बसायचे यात काय मजा?… शेवटी शरीर फीट तरच बाकी सगळं…. खरंय की नाही? […]

1 103 104 105
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..