रविवार बंद
मजबूत शरीरयष्टी, पिळदार मिशा आणि बऱ्यापैकी उंच असलेले रुबाबदार दूध काका त्यांची अगदी स्वच्छ, चकचकीत आणि नजरेत भरेल अशी खास पितळ्याची किटली सायकलला अडकवून दररोज पहाटे घरोघरी दूध घेऊन जायचे. अगदी नित्यनेमाने. इतर कुठल्याही दुधाचा दर्जा या दूध काकांकडच्या दुधाच्या जवळपास सुद्धा नव्हता. भरपूर साय यायची, तूप उत्तम व्हायचं. अगदी मन लावून दुधाचा व्यवसाय करायचे काका. […]
