नवीन लेखन...

भुयारी

पोरगं बाहेर आलं. हातातल्या मळक्या कपड्याने त्याने टेबल साफ केलं आणि उचलावी की उचलू नये असा विचार करत ती नोट त्याने गल्ल्यावर नेऊन दिली. ‘क्या गंदा काम करता है!’ एवढच पुटपुटत तो आत निघून गेला. […]

बूमरॅंग

काही वर्षांनी दिपक इतका आळशी झाला की, त्याचे सहीपासूनचे सर्व व्यवहार संतोषच सांभाळू लागला. संतोषला काही वेळा, एक विचार सतावत रहायचा की उद्या दिपकनं आपल्याशी भांडून हाकलून दिलं तर आपली अवस्था अतिशय वाईट होईल.. त्यासाठी एकदा त्यानं दिपकला विनंती केली की, माझ्या नावावर ठेवायला काही पैसे देतोस का? त्यावर दिपक म्हणाला अरे, सर्व पैसे तुझ्याच खात्यावर असताना अजून तुला काय हवं? संतोष हे ऐकून, गप्प रहायचा.. […]

प्रतिकृती (कथा)-भाग-२

आमच्या गावात गोविंदभट नावाचे एक कीर्तनकार होते. रामनवमी, हनुमान जयंती, कृष्णाष्टमी अशा निरनिराळ्या धार्मिक प्रसंगी आणि एरवीही, आठवड्यातून एक-दोन वेळा गावातल्या राममंदिरात गोविंदबुवांचं कीर्तन असायचंच. बरेच वेळा मी आईबरोबर कीर्तनाला जात असे. म्हणजे आईच मला घेऊन यायची. हे बुवा आमच्या वाड्यावरसुद्धा घरच्या देवांची पूजा करायला रोज सकाळी यायचे. बुवांची आणि माझी चांगली गट्टी जमायची. तर सांगायचा […]

प्रतिकृती – भाग १ (कथा)

नुसतं नाव सांगायचं, तर त्यासोबत ही आगगाडी कशाला? असं तुम्ही म्हणाल. सांगतो. मी आहे शास्त्रज्ञ. जैविकशास्त्रात मी संशोधन करतो. आता आलं ना लक्षात? शास्त्रज्ञ, प्रोफेसर, कलाकार म्हटला की त्याचा एखादा स्क्रू’ ढिला असणार अशी लोकांची समजूत असते. […]

बंदिस्त

अशा आजीबाई आणि आजोबा आज बऱ्याच घरात बंदिस्त आहेत. पूर्णवेळ नोकर मिळत नाहीत, ठेवता येत नाहीत, परवडत नाहीत, मग अशा वृद्धांना घरात ठेवून, कुलूप लावून घराबाहेर पडणारे महाभाग खूप आहेत. […]

आफ्रिकन जमातीचा म्होरक्या आणि खंडणी (संक्षिप्त रूपांतरीत कथा २५)

मी, येश्या म्हणजे यशवंत आणि काश्या म्हणजे काशीनाथ, आम्ही तेव्हा गडहिंग्लजजवळ होतो आणि आम्हाला एखाद्या मुलाला पळवून खंडणी मागायची कल्पना सुचली. शहरांत लोकांना चीट फंडासारख्या स्कीममधे फसवणं हा आमचा धंदा. तो करायला थोडं भांडवल लागतं. काश्याकडे आणि माझ्याकडे मिळून जेमतेम दहा हजार रूपये होते. आम्हाला आणखी पंधरा-वीस हजार रूपयांची गरज होती. तेव्हा ही मूल पळवण्याची कल्पना […]

कलकलाट

आता ध्वनी-प्रदुषणाविरुद्ध मोहिम काढली पाहिजे, असं मत नुकतच एका जागरुक प्रतिभावान लेखकानं जाहिर केलं आहे. ते सुरु करण्यासाठी दोन-तीन लाऊडस्पीकर्स खरेदी केले आहेत. ‘आवाज कमी करा’ हे सांगितलेले कळणार कसं? ते कळावं म्हणून आहे त्या आवाजापेक्षा मोठा आवाज काढून बोललं तरच लोकांना कळणार, असं त्याच मत आहे. […]

आत्मनिर्भरता, शिवराय आणि अंदमान

इतका वेळ शांतपणे ऐकणारा मिलिंद भारावून बोलू लागला, ‘अप्पा. शिवाजी महाराज आणि सावरकर खरोखरच ग्रेट होते. अतिशय प्रतिकूल परिस्थिती आणि मृत्यूचे सावट सतत डोईवर असताना दोघांनी पेशन्स राखून, प्रसंगी दोन पावलं मागे सरून, मिळालेल्या संधीचा लाभ घेऊन, चकवा देऊन, संकटाशी दोन हात केले होते. […]

न संपणारा रस्ता (कथा)

नागू दुपारची भाकरी खावी म्हणून औत सोडून बैलायला पाणी पाजवू लागला.डोबी पाण्यानं ठिल भरलेली होती.सूर्य नारायण आग ओकत व्हता.बैलायनं पूर sपूर करत खाली मुंडी घालून गटागटा पाणी  पेलं. […]

अल्पोपहार (संक्षिप्त रूपांतरीत कथा २४)

मी नाट्यगृहात बसलो होतो. तिने मला पाहिले व बोलावून घेतले. मी तिला ह्यापूर्वी पाहिल्याला अनेक वर्षे झाली होती. तिचे नाव सुध्दा माझ्या लक्षांत नव्हते. तिच्या बोलावण्यावरून मध्यंतरात मी माझी जागा सोडून तिच्या बाजूला जाऊन बसलो. तिने उत्साहाने बोलायला सुरूवात केली, “काळ किती भराभर जातो नाही ? आपण प्रथम भेटलो त्याला अनेक वर्षे झाली, नाही कां ? […]

1 … 42 43 44 45 46 … 115
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..