नवीन लेखन...

प्रतिकृती (कथा)-भाग-६

साधारण दहा-पंधरा मिनिटांचा अवधी गेला असावा. कुपीच्या तळाशी पायांची बोटं पूर्ण वाढलेली दिसू लागली. हळूहळू सगळं पाऊल आणि नंतर वरवर वाढत वाढत गुडघ्यापर्यंत पूर्ण पाय! मग वरवर जात जात मांड्या, कंबर पोट, हात, छाती असा क्रमाक्रमाने संपूर्ण आमदार प्रकट झाला! ही प्रक्रिया सुमारे सहा तास चालली होती. पण आम्हाला त्याची अजिबात जाणीव झाली नाही! ते अद्भुत […]

पैज

अंधारी रात्र, थंडी पडली होती. पंधरा वर्षांपूर्वी अशाच एका हिवाळी रात्री आपण दिलेल्या पार्टीची आठवण करत राष्ट्रियीकृत बँकेचा सीनियर मॅनेजर धनानंद शतपावलीच्या येरझाऱ्या घालत होता. बुध्दिमान म्हणून गणले जाणारे बरेच मित्र होते त्या पार्टीत. गप्पागोष्टी, चर्चा होत होत्या त्याही गंमतीदार, लालित्यपूर्ण अशा. मृत्युदंड असावा की नसावा हा एक अहमहमिकेच्या वादविवादाचा विषय होता. […]

पोलिस-चोर आणि भजन (संक्षिप्त रूपांतरीत कथा २७)

भिवा नाक्यावरच्या बाकावर बसल्याजागीच अस्वस्थ हालचाली करत होता. पावसाळा जवळ येत होता. मुंबईचा पावसाळा म्हणजे त्रासदायक. दुकाना दुकानात लावलेल्या छत्र्या आणि रेनकोट जाहिर करत होते की पावसाळा जवळ आलाय. लोकांची खरेदी सुरू होती. कावळे घरटी बांधत होते. नक्कीच पावसाळा जवळ आला होता. फूटपाथवर रहाणाऱ्या सर्वांना एखाद दुसरा आकाशांत दिसणारा ढग चिंताक्रांत करत होता. तसे बरेच जण […]

भांडणातली मैत्री

आदित्य, प्रणय आणि हेमंत हे तिघे जण एकमेकांचे खूपच जिवलग मित्र. या तिघांना जेव्हा एकत्र फिरताना पाहिल्यावर असं जाणवायचं की, या जगात मैत्रीच्या नात्याबद्दल ज्या विविध गोष्टी सांगितल्या जातात, त्या या तिघांना एकत्र पाहिल्यावर त्या गोष्टींमधील खरेपणा यांच्या मैत्रिकडे पाहून जाणवत असे. मी त्यांना कधीही एकटे फिरत असल्याचे पाहिलेलं आठवत नाही. जेव्हा पाहावं तेव्हा ते तिघे […]

प्रतिकृती (कथा)-भाग-५

दादाचा विश्वासच बसेना. ती त्याला संशोधनाची माहिती सांगितली. आता मी प्राणी किंवा माणूस एक दिवसापासून एक वर्षापर्यंत जिवंत ठेवू शकतो इतकी प्रगती केली आहे हेही सांगितलं. त्याला हे पण स्पष्ट केलं की हे अत्यंत गुप्त संशोधन आहे आणि याची वाच्यता कुठेही करू नकोस. नंतर घरातल्या देवासमोर बेलभंडारा उचलून मी त्याच्याकडून गुप्ततेची शपथ वाहून घेतली. एवढं होऊनही […]

मन रामरंगी रंगले

आमच्या गावी गणपतीच्या दिवशी संध्याकाळी गावातले सर्व गावकरी भजनासाठी जमतात. गावकरी येण्याआधी आम्ही सर्व तयारीनिशी सिद्ध राहतो. समोरच्या देवखोलीत सुशोभित आसनावर गणपतीची प्रसन्न मूर्ती विराजमान झालेली असते. मूर्तीच्या पाठीमागे दिव्यांची आरास झगमगत असते. समोर निरांजनातील दिवे उजळून निघालेले असतात. देवखोली समोरील ओसरीत मनमोहक रांगोळ्यांवर समयी ठेवलेल्या असतात. हातात टाळ, झांजा घेऊन गावकरी येतात. पायपेटी स्थिरस्थावर होते. […]

वेडेपणातलं शहाणपण

मुंबई नुसती बुडून जाऊ शकते असे नाही, तर जळून भस्मसात होऊ शकते. ही सगळी चर्चा ऐकून भिजलेल्या शरीरावर काटा उभा राहिला. जगबुडी वर्तवणाऱ्या त्या गप्पा सोडून दिल्या तरी वेडेपणातही काही शहाणपणा होता. बुडणाऱ्या मुंबईला वाचवणार कोण? […]

प्रतिकृती (कथा)-भाग-४

आता माझ्या मनात मानवी प्रतिकृती निर्माण करावी असे विचार येऊ लागले. जोपर्यंत उंदीर, सशांवर भागत होतं, तोपर्यंत काही अडचण नव्हती. पण एखादा माणूस निर्माण करायचा ही फार गंभीर, धोकादायक आणि अवघड, जवळजवळ अशक्यप्रायच गोष्ट होती. यासाठी मला कुणीतरी विश्वासू मदतनीस लागणार होता. माझ्या शोधाची घरातच काय पण इतरत्रही कुणाला माहिती नव्हती. एक वेडा शास्त्रज्ञ म्हणून कुणी […]

प्रतिकृती (कथा)-भाग-३

गावी पोचायला दोन दिवस लागले. आई शेवटच्या घटका मोजत होती. मला पाहून तिला खूप बरं वाटलं आणि आश्चर्य म्हणजे तिची प्रकृती सुधारू लागली. पण तिने एकच ध्यास घेतला, “बाज्या, आता तू पुन्हा जाऊ नकोस. पुरं झालं ते संशोधन! तुला इथे काय कमी आहे. तू आता इथेच माझ्याजवळ राहा. लग्न कर, मला नातू पाहू दे.” तसं तर […]

समृध्द प्रेमाची भेट (संक्षिप्त रुपांतरीत कथा २६)

मालतीने त्या डब्यामधल्या नोटा आणि नाणी पुन्हा पु्न्हा मोजली. बरोबर सत्तावन्न रूपये. कमी नाही जास्त नाही. तिने वाणी, भाजीवाली, शिंपी आणि कोणा कोणाबरोबर घासाघीस केली नव्हती ? प्रत्येक ठिकाणी दोन आणे, चार आणे तरी वाचवायचा ती प्रयत्न करी. मग वाचवलेली ती चवली किंवा पावली ती ह्या डब्यात ठेवून देई. आतां दिवाळीचा पाडवा उद्यावर आला होता. पुन्हा […]

1 … 41 42 43 44 45 … 115
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..