नवीन लेखन...

त्याच्या पत्नीची मृत बहिण (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३०)

पाच वर्षांपूर्वी माझं संपूर्ण आयुष्यच बदलणारी गोष्ट घडली. इतरांनाही त्यापासून कांही धडा घेता यावा म्हणून मी हे लिहितोय. मी जेव्हां अगदी तरूण होतो तेव्हां साहित्यसेवा करायचे ठरवले. साहित्यातील पदवी घेतल्यानंतर बरेच वर्षे फारसा मोबदला न मिळता मेहनत करत राहिल्यानंतर, मी लेखक म्हणून थोडासा स्थिरस्थावर व्हायला लागलो होतो. अनेक नियतकालिकांच्या संपादकांना आता माझे नांव माहित झाले होते […]

२ जानेवारी

३१ डिसेंबर ही तारीख जवळ येऊ लागली की सर्वजण वर्षाची अखेरची रात्र आनंदात कशी घालवता येईल याचे बेत आखू लागतात. मित्रमंडळी, नातेवाईक, कुटुंबीय असे वेगवेगळे ग्रुप्स आपापल्या पसंतीनुसार कुठे जमायचं, काय खायचं आणि काय प्यायचं याचे मनसुबे आखू लागतात. या पाटर्यांसाठी कोणाला बोलवायचं आणि कोणाला फुटवायचं यावरही चर्चा सुरु होते. अमका कसा बोअर आहे आणि नववर्षाच्या […]

घडीचं जीवन

फोल्डिंगच्या खुर्च्या बघितल्या होत्या. पण भिंतीत घडी होणाऱ्या खुर्च्या  सरळ भिंतीत उभ्या राहतात आणि छोटेखानी दिवाणाची जागा मोकळी होते. भिंतील खेटून उभ असलेल पुस्तकाच कपाट रात्र झाली की आडव होत […]

निपटारा – भाग  4

मालशे मॅडम म्हणजे आमच्या फिजिकल ट्रेनर आणि स्पोर्टस् विभाग प्रमुख. खूप सिनियर. पण उत्साह दांडगा. ट्रेकिंग कँप, पिकनिक वगैरे प्रोग्रॅम त्यांच्या खास आवडीचे. विद्यार्थ्यांमध्ये जाम पॉप्युलर. पण दिवाळीच्या सुटीमध्ये त्यांचे येणे जरा अवघडच वाटत होते. आमची योजना बारगळते की काय असे वाटले. पण त्या लगेच तयार झाल्या. अर्थात त्या आल्यामुळेच आमच्या योजनेचा बोजवारा उडण्याची शक्यता होतीच. […]

नशीब

एखादी किरकोळ गोष्टही कधी मनासारखी घडली नाही की आपण लगेचच नशीबाला दोष देतो. आपण सोडून इतर सर्वांना नशीब भरभरुन साद देतं. मात्र आपल्या वाटेला वणवण पाचवीलाच पूजलेली, असं सर्वांनाच वाटतं! दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या बारीकसारीक गोष्टींचं नातं थेट नशीबाशीच जोडलेलं असतं का? आणि संपूर्ण आयुष्य नशीबाला दोष देत रडतखडत जगणं कितपत योग्य आहे याचा कधीतरी विचार नको […]

निपटारा – भाग  3

दोन दिवसांनी आम्ही जमलो. सगळ्याजणी माझी योजना ऐकण्यास अगदी आतूर झाल्या होत्या. त्यांची उत्सुकता अगदी शिगेलाच पोहचली होती म्हणाना. मी फार न ताणता सुरुवात केली. “आपल्यापैकी बऱ्याचजणी नाट्यविभागात जातात. तिथेच या सर्व प्रकाराचे मूळ आहे अशी माझी पक्की खात्री आहे. आता फक्त आपला संशय पक्का करायचा की झाले. त्यासाठी मी एक युक्ती करायची ठरवली आहे. वासंती, […]

त्यांच्या तत्त्वाच्या प्रकाशात

प्रतिष्ठीत घरांतून रस्त्यावर आलेल्या दोन भिकाऱ्यांची कथा. भिकारी असले तरी त्यांचीही कांही तत्त्वं आहेत. कॅप्टनला मित्राचा विश्वासघात करणं, हे महापाप वाटतं तर मरेला असा विश्वासघात करण्यात कांहीच चूक वाटत नाही. मरेला पैशासाठी कुणाही स्त्रीचा स्वीकार करण्याची तडजोड गैर वाटते, त्या तत्वासाठी तो काकाच्या इस्टेटीवरचा हक्क सोडतो तर खायला मिळावं म्हणून कॅप्टन कुरुप फळवालीला पटवायला जातो. […]

निपटारा – भाग  2

काही खास चर्चा असली म्हणजे आम्ही ‘परिंदा’ मध्ये भेटायचो. सिद्धार्थ गार्डनच्या जवळ, नाल्यावरच्या सिद्धी विनायक मंदिरासमोर, परिंदा म्हणजे एक धाबा वजा छोटंसं हॉटेल होतं. भरपूर मोकळी जागा, उघड्यावर टेबल खुर्त्या प्लॅस्टीकच्या, चार चार टेबलांच्या ग्रुपला एक मेंदीचं बुटकं कुंपण, आजूबाजूला भरगच्च झाडी. फारशी गर्दी नाही, भरवस्तीत असूनही शांत आणि आमच्या सारख्या मुलींना सुरक्षित. तिथं फारशी वर्दळही […]

गणपती

आम्ही दरवर्षी गणपतीचा उत्सव कोकणातल्या आमच्या न्हैचिआड गावी साजरा करतो. गणपतीच्या साधारणतः दोनतीन महिने आधी आमच्या घरी गणपतीची गडबड सुरु होते. ह्यावर्षी गणपती अमुक अमुक तारखेला आहेत, तेव्हा गावी जाण्यासाठी कोण कधी निघणार, कुठल्या गाडीने निघणार वगैरे चर्चा आमच्या घरी सुरु होते. घरी म्हणजे आमच्या चुलत नातेवाईकांमध्ये- रेग्यांमध्ये आम्ही सर्व चुलत बंधू एकत्ररित्या घरचा गणपती गावी […]

लोअर वरळी

गिरणगांव बचाव म्हणून बुध्दिवंतांची एक बैठक झाली, त्याला कवी-लेखक-शाहीर सगळे हजर होते. एक गाव लाटेखाली बुडायच्या मार्गावर आहे, त्याला वाचवायच म्हणजे काय करायच, हाच खरा प्रश्न आहे. तस हे गाव संपाच्या ओझ्याखाली केव्हाच मोडून गेलय. […]

1 … 38 39 40 41 42 … 115
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..