नवीन लेखन...

हवालदाराची खेळी (कथा)

उत्तर कोलकात्यातील बारासात गाव. बिल्डिंग ब्लॉक्स फॅक्टरीतला कामगार बिधन पाल त्याच्या घरात जेवणाच्या खोलीत बसला होता. पारुलचं, म्हणजे त्याच्या बायकोचं जेवण संपलं नव्हतं. थंडगार पडलेल्या जेवणाचं ताट तसंच टेबलावर होतं, पण ती जागेवर नव्हती. बिधननं तिच्या ग्लासातलं पाणी पिऊन पालथ्या पंजाने ओठ पुसले आणि आरोळी दिली, “पारो, ये बघू आत आता आणि जेवून घे……ए, पारो, ऐकलंस का? चल ये नाही तर मी दार बंद करून टाकीन आणि तू राहशील बाहेर.” […]

नकोशी (कथा)

मी जेमतेम पाच वर्षांचा होतो. शेजारपाजारच्या काकू, आजी, आत्या म्हणायच्या, ‘या वक्ताला पोर्गी होऊ दे मंजी शिवा ले राखी बांधाले भन भेटल.’ मलाही ते ऐकून वाटायचं की आपल्या घरात लहान बाळ आलं की किती मज्जा येईल. मला ती राखी बांधेल, भाऊबीजेला ओवाळेल, असा विचार मनात आला की सतत आईभोवती फिरायचो. […]

मैदानाचा मृत्यू

सुरुवातीला पोहण्याच्या तलावासाठी तासाला दोन रुपये होते. ते कसेबसे भरुन उन्हाळ्यात का होईना पोरं पोहायला जात. वर्षभर शक्यच नव्हतं. कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेला दृष्ट लागेल असा कॉम्प्लेक्स ओसच राहिला. नुकसान टाळण्यासाठी महापालिकेने तरण तलाव खाजगी कंत्राटदाराकडे दिला. त्याने तासाची फी १५ रुपये केली. पोरं बाहेरच राहिली.
[…]

वाटणी (कथा)

प्रत्येक गावात दादा, काका, मामा, नाना अशा नावाने ओळखली जाणारी माणसे असतात. अशाच एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याला सर्व गाव ‘आबा’ म्हणायचा. साऱ्या गावाचे ते ‘आबा’ होते.. […]

चालणारा पोपट

चालणारा पोपट पहिल्यांदाच बघत होतो. त्यााला कधीच उडता येणार नव्हतं. कारण पंखांची टोकं कलात्मक पद्धतीनं कापून टाकलेली होती. उडणारे पोपट बघितले, पिंजऱ्यातले पोपट बघितले. पण चालणारा पोपट पहिल्यांदाच बघितला. […]

गेट टुगेदर (कथा)

स्पृहाचं म्हणणं ऐकून घेईपर्यंत अनिकेतने कॉल कट केलासुद्धा. दुपारपासून स्पृहाचं डोकं धरलंय त्यात कालच गुडघा सुजलाय. हल्ली थोडी जरी चाल पडली तरी सुजतो. मग घ्या पेनकिलर. मग अॅसिडिटी, अपचन, डोकेदुखी. गेल्या दहा वर्षात या सगळ्या दुखण्याची सवय कशी झाली नाही शरीराला असा स्पृहा स्वत:ला प्रश्न विचारी. […]

गँगमन (कथा)

मैलोगणिक पसरलेल्या रेल्वे रुळांच रक्षण करुन ते व्यवस्थित ठेवायचे. म्हणजे ऊन-पावसात मैलोगणिक चालण्याची शारिरिक क्षमता हवी. इतकं चालणार कोण ? दिवसाकाठी दहा मैल डोंगरकपारी तुडवणारा आदिवासी या कामाला योग्यच होता. पण शहरापासून बिचकून राहणारा हा लाजाळू माणूस गँगमन म्हणूनकाम करायलाकसा तयार झाला कुणास ठाऊक. […]

शिकारी क्वार्टरमेनची गोष्ट (संक्षिप्त रूपांतरीत कथा १८)

किंग सॉलोमन्स माईन्स हा चित्रपट अनेकांना ठाऊक असेल. ती कादंबरी आणि त्यावरील चित्रपट खूप गाजला.लेखक हॅगार्ड ह्यांनी स्वतः दीर्घकाळ आफ्रिकेत वास्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्या कथा कादंबऱ्यांना वास्तवाचं रूप येत असे. प्रस्तुत कथा ही किंग सॉलोमन्स माईन्सची कथेची प्रस्तावनाच असल्यासारखी आहे. मूळ कथा ६५००हून अधिक शब्दांत आहे. मी ती २४६० शब्दांत मांडायचा प्रयत्न केला आहे. ब्रिटीश कसे साहसी होते व त्यांना त्या त्या देशांतील लोकांनी कशी साथ दिली, ह्याचाही प्रत्यय येतो. मागच्या वेळची कथा ही खोट्या शिकारीची होती तर ही खरोखरीच साहस आणि भय असलेली शिकारकथा आहे. […]

माय रेट्रो… व्हॅलेन्टाईन

ही कथा सुरू होत आहे १९७२-७३ च्या काळात… तो काळ हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या राजेश खन्नाचा. तो त्या काळचा सुपरस्टार आणि जोडीला चटपटीत गोल चेहऱ्याची मुमताज ही जबरदस्त हीट जोडी! ‘कटी पतंग,’ ‘आराधना’, ‘अमर प्रेम’, ‘सफर’, ‘आनंद’, ‘अपना देश’, ‘दो रास्ते’ सारखे जबरदस्त हिट सिनेमे देणारा आमचा हिरो राजेश खन्ना. जणू आमचे दैवतच! अपऱ्या नाकाची, फुगीर गोबऱ्या गालांची मुमताज साथीला आल्यावर सिनेमात प्रेमसरिता खळाळून वाहू लागायची. मग आमचा अवतारही काही वेगळा नव्हता… […]

पुलाखालची माणसं (कथा)

ही पुलाखालची माणसं मुंबईच भयावह चित्रण आहेत. कुठेतरी वाळवी लागली आहे. बाकी सर्व प्रश्न सुटू शकतात पण एकदा लागलेली ही वाळवी शहर आतून-बाहेरून पोखरून काढणार. वर्षा-दोन वर्षापूर्वी पुलाखाली माणसं नव्हती. आता कुठल्याही पुलाखाली जाऊन पाहा. नशेत बुडालेल्या केविलवाण्या चेहऱ्यांची ही कळकट-मळकट मंडळी जनावराच्या नजरेन तुमच्याकडे पाहतील. […]

1 37 38 39 40 41 106
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..