नवीन लेखन...

फुलपुडी

“ हॅलो ss .. हा तुझा बाबा रिटायर झाला गं एकदाचा ss !!” .. बाबा आपल्या चेन्नईत राहणाऱ्या एकुलत्या एका मुलीला फोनवर अगदी उत्साहात सगळं सांगत होते. “ वा वा !! मग या आता दोघेही आराम करायला थोडे दिवस इकडे !” “ नको गं बाई …. तुमचा राजाराणीचा संसार त्यात या म्हातारा-म्हातारीची लुडबूड कशाला उगाच ?? […]

प्रवाशाची विचित्र व भयानक पलंगाची गोष्ट – भाग पहिला (संक्षिप्त रूपांतरीत कथा २१)

शिक्षण संपल्यावर मी शशिकांत देशमाने कलकत्त्याला एका बंगाली मित्राबरोबर रहात होतो. आम्ही तरूण होतो आणि त्या रंगीन नगरींत मजा करत होतो. एकदा व्हीक्टोरीया मेमोरीअल जवळच्या भागांत आतां काय मजा करावी ह्या विचारात असताना, माझा मित्र आपण रॉयल क्लबमधे जुगार खेळायला जाऊया म्हणाला. रॉयल क्लबच्या जुगारांत मी बरेचदा पांच/दहा रूपयांच्या खूप नोटा घालवल्या होत्या, कधी कमावल्याही होत्या. […]

रविवार बंद

मजबूत शरीरयष्टी, पिळदार मिशा आणि बऱ्यापैकी उंच असलेले रुबाबदार दूध काका त्यांची अगदी स्वच्छ, चकचकीत आणि नजरेत भरेल अशी खास पितळ्याची किटली सायकलला अडकवून दररोज पहाटे घरोघरी दूध घेऊन जायचे. अगदी नित्यनेमाने. इतर कुठल्याही दुधाचा दर्जा या दूध काकांकडच्या दुधाच्या जवळपास सुद्धा नव्हता. भरपूर साय यायची, तूप उत्तम व्हायचं. अगदी मन लावून दुधाचा व्यवसाय करायचे काका. […]

अनोळखी

काम करायच असेल तर या आठवड्यात सुरु कर, नाही तर दुसरा माणूस बघतो! ‘नक्की करतो म्हणाला’ आणि आगाऊ रक्कम घेऊन पसार झाला. दहा दिवस पत्ता नाही. त्यानंतर आला. कुठे गळत होतं तिथे बाहेरच्या बाजूने प्लॅस्टर काढून गेला. जखमेवरची पट्टी काढून डॉक्टरने जेवायला निघून जावं तसा. […]

कालचक्र

यंदा “नववर्ष संकल्प” बराच काळ टिकला होता त्याचा. रोज संध्याकाळी न चुकता सोसायटीच्या आवारात चालायला जायचा. वय पन्नाशीकडे आणि वजन ऐंशीकडे झुकल्यामुळेही असेल कदाचित. त्याच वेळेस खालच्या मजल्यावर राहणारे नवरा-बायको सुद्धा यायचे चालायला. नेहमी हसतमुख असणारं ते जोडपं .. याच्यापेक्षा जेमतेम “अर्ध्या” पिढीने मोठं असेल. दादा-वहिनी म्हणा हवं तर .. पण हा गेले काही दिवस बघतोय […]

खिडकीपलीकडे

दोन्ही टेकड्या हिरवीगार शाल पांघरुन बसतात. काळपट वाटणारा पर्वत माथाही हिरवागार होतो. कुठल्याही छान चित्रात शोभावं असं हे दृश्य आणि तेही भरवस्तीच्या बकाल मुंबई शहरात. अशी हिरवळ आणि शांत वृक्षराजी आजही मुंबईच्या कानाकोपऱ्यात शिल्लक आहे. पण ती शोधून सापडावी लागते.  […]

पावसाचं आगमन

पण नरिमन पॉइंटवर पांढऱ्या शुभ्र झग्यातले, डोळ्याला पांढरं मुंडासं वर काळी फीत लावलेले अरबस्तानातील लोक जमायला लागले, की समजावं आता पावसाळा आला. वाळवंटात राहणारी ही मंडळी. त्यांना पावसाचं विलक्षण आकर्षण. पावसापेक्षा पावसाच्या आगमनाचं, पहिल्या पावसाचं. […]

इस्पिकची राणी (संक्षिप्त रूपांतरीत कथा २०)

मेजर शिंदे यांच्या घरी रात्रभर पत्त्यांचा जुगार चालू होता. सकाळी पांच वाजतां नाश्ता दिला गेला. तोपर्यंत जिंकलेल्यांनी तो खूप आवडीने खाल्ला तर हरणाऱ्यांच्या तोंडाची चव गेली होती. एकजण म्हणाला, “माझं नशीब जुगारांत नेहमीच दगा देतं.” एकाने दुसऱ्या एका इंजिनीअर्सच्या तुकडीतील हरीरामला विचारले, “हरीराम, आश्चर्य आहे ! तू कधीही पत्त्यांना हातही लावत नाहीस ! तरीही तू आमच्याबरोबर […]

मायाबाजार

कुणी विकतं, कुणी खरेदी करतं, पण काही खरेदी करण्यापूर्वी कमवावं लागतं. मग ज्याच्याकडे जे असेल ते जास्तीत जास्त भावात विकलं जातं. कुणी बुद्धिमत्ता विकतं, कुणी सत्ता विकतं, कुणी जरब विकतं, कुणी देवाने दिलेले सौंदर्य विकतं, तर कुणी त्याच्याच शेजारी आपले वैगुण्य घेऊन विकायला बसतं. मायाबाजार चालू राहतो.  […]

नांव देण्याची हौस

या नांवाचा आग्रह केलेला नगरसेवक आज हयात नाही. त्या रस्त्यावरच्या एकाही नागरिकाला ही व्यक्ती कोण माहित नाही. महापालिकेच्या कचेरीत काम करणाऱ्या कुणालाही या रस्त्याच्या या व्यक्तीचं नाव का दिलं माहित नाही. ज्यावेळी हा ठराव झाला त्यावेळची कागदपत्र काढून बघण्यात आली, पण त्यातही त्या व्यक्तीविषयी काहीच माहिती नाही. […]

1 35 36 37 38 39 106
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..