काय देवा आता पहातोसी अंत (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३३)
अमरावतीला एक तरूण व्यापारी रहात होता. त्याची दोन दुकाने होती व स्वतःचे घर होते. त्याचं नाव होतं दिनकर शेट्ये. तो कुरळ्या केसांचा, मोहक चेहऱ्याचा, सुदृढ, तरतरीत तरूण होता. तो नेहमी आनंदी असे. त्याला गाणेही आवडत असे. तो जेव्हा विशीत होता, तेव्हां तो मद्याच्या आहारी जात असे पण लौकरच विवाह केल्यावर त्याने नेहमी मद्य घेणे वर्ज्य केले. […]
