नवीन लेखन...

आत्मनिर्भरता, शिवराय आणि अंदमान

इतका वेळ शांतपणे ऐकणारा मिलिंद भारावून बोलू लागला, ‘अप्पा. शिवाजी महाराज आणि सावरकर खरोखरच ग्रेट होते. अतिशय प्रतिकूल परिस्थिती आणि मृत्यूचे सावट सतत डोईवर असताना दोघांनी पेशन्स राखून, प्रसंगी दोन पावलं मागे सरून, मिळालेल्या संधीचा लाभ घेऊन, चकवा देऊन, संकटाशी दोन हात केले होते. […]

न संपणारा रस्ता (कथा)

नागू दुपारची भाकरी खावी म्हणून औत सोडून बैलायला पाणी पाजवू लागला.डोबी पाण्यानं ठिल भरलेली होती.सूर्य नारायण आग ओकत व्हता.बैलायनं पूर sपूर करत खाली मुंडी घालून गटागटा पाणी  पेलं. […]

अल्पोपहार (संक्षिप्त रूपांतरीत कथा २४)

मी नाट्यगृहात बसलो होतो. तिने मला पाहिले व बोलावून घेतले. मी तिला ह्यापूर्वी पाहिल्याला अनेक वर्षे झाली होती. तिचे नाव सुध्दा माझ्या लक्षांत नव्हते. तिच्या बोलावण्यावरून मध्यंतरात मी माझी जागा सोडून तिच्या बाजूला जाऊन बसलो. तिने उत्साहाने बोलायला सुरूवात केली, “काळ किती भराभर जातो नाही ? आपण प्रथम भेटलो त्याला अनेक वर्षे झाली, नाही कां ? […]

बाई आली पणात

सुगीचे दिवस आले होते अन् समधी माणसं कशी पटापटा आपल्या कामाला लागली व्हती. शाळूकाढायला आला व्हता. कारडी गहू, हरभऱ्यानी रानं कशी फुलून तरारली व्हती. चिंचोळलीमधी जिकडं तिकडं घाई गडबड चालू व्हती. समधं शेतकरी लई कामात व्हढाचढीनं मरमर मरोस्तवर काम उरकीत व्हती. गावात शिंद्याची आळी विठ्ठल रखमाई दोन्ही हात देवळात कमरेवर ठेवून जणू चिंचोलीची राबणारी कष्टकरी बाई बाप्पे पाहत होती. […]

आयुष्य

स्मिता कॉम्प्युटर इंजिनीअर. चार वर्षे झाली विक्रोळीला एका छोट्याशा कंपनीत नोकरीला होती. तिला प्रोग्रॅमिंग व काही क्लाएंटचे प्रोजेक्ट्स बघावे लागत. ती घरातून बारा-साडेबाराला निघे व रात्री बारा साडेबारापर्यंत परत येई. अर्थात तिला कारने घरापर्यंत ड्रॉप असे. पण काल रात्री तिला अजिबात झोप आली नाही. […]

मुंगी आणि टोळ (संक्षिप्त रूपांतरीत कथा २३)

जेव्हा मी लहान होतो, तेव्हां मला कांही नीतीकथा पाठ करायला लावल्या होत्या आणि त्यांचे तात्पर्य नीट समजावून सांगण्यात आलं होतं. त्यांतलीच एक कथा होती, ‘मुंगी आणि टोळ.’ ह्या अपूर्ण जगांत जो उद्योगी राहतो त्याला बक्षिस मिळतं आणि आळशी किंवा मौज करत रहाणा-यांस शिक्षा मिळते, हा धडा मुलांच्या मनावर ठसवण्यासाठी ही नीतीकथा. ही कथा सर्वांना माहिती असणारच […]

भटकंतीतील भुतनी

अखेर मायावतीच्या कड्यावर मला एकट्यालाच जावं लागणार हे निश्चित आहे. नेहमीप्रमाणे सहा महिने आधी सांगूनही इतरांनी काही ना काही सबबी सांगून माघार घेतली. हीच मंडळी नेहमी मी कुठे जाऊन आलो की, ‘अरे, आधी बोलला असतास आम्ही बरोबर आलो असतो,’ असे म्हणणार आणि तिकीटे बुक करायची वेळ आली की सबबी पुढे करणार हे ठरलेले. खरं तर इतक्या वर्षांचा अनुभव लक्षात घेता मला या गोष्टीची सवय व्हायला हवी होती तरीही प्रत्येक वेळी मनाचा चडफडाट व्हायचा तो झालाच! […]

उल्लू टिल्लू बेडूक (संक्षिप्त रूपांतरीत कथा २२)

ह्या राजा जेवढा विनोदप्रिय होता, तेवढी विनोदप्रियता असलेल्या दुस-या कुणा व्यक्तीबद्दल मी कधी ऐकलं नव्हतं. त्याचे जगणंच विनोदासाठी होतं असावं. त्याची मर्जी कमवायची असेल तर विनोदी गोष्ट त्याला ऐकवायची. त्यामुळे त्याचे जे सात मंत्री होते ते सगळे उत्तम विदूषक होते. ते राजाची यथास्थित काळजी घेत व स्वत:चीही. त्यामुळे ते चरबीने युक्त गोल गरगरीत झाले होते. विनोद […]

ऋणानुबंध (कथा)

आधीच रविवारचा सुटीचा दिवस. त्यातही अमर पार्टी हॉल निमंत्रकांनी भरलेला होता. राजू-राणीचे मित्रमैत्रिणी डॉ. शरदचे हॉस्पिटलमधील कर्मचारी, आदी संबंधितांनी बाळ संदेशच्या वाढदिवसाला फार शोभा आणली होती. राणी त्याच हॉस्पिटलमध्ये बरीच वर्षे परिचारिकेचे काम करीत होती. साहाजिकच साऱ्यांची ती लाडकी होती. राजेंद्र म्हणजे राजू हा तर डॉ. शरद यांचा अगदी जवळचा, मग काय विचारता? परकेपणा कुठेच नव्हता. कडक, शिस्तीची पण प्रेमळ व कामसू राणीने साऱ्यांचीच मने जिंकली होती. राजू-राणीच्या बाळाचा वाढदिवस म्हणजे जणू घरचाच कार्यक्रम. […]

1 34 35 36 37 38 106
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..