उत्सव की औपचारिकता?
आपल्यातील सगळेजणच Wish you best of luck, Happy Journy वगैरे म्हणत असतात. फुलांचे गुच्छ हातात देत असतात. एकटी आई मात्र एकच वाक्य उच्चारते, ‘गेल्यावर पत्र टाक रे बाबा! ” कसल्याही शुभेच्छा व्यक्त न केलेल्या त्या वाक्यामध्ये सगळ्या शुभेच्छांचा वर्षाव जाणवतो. औपचारिकतेची सगळी फुलं तेव्हा मलूल वाटायला लागतात. […]
