संस्कार, विचार आणि विवेक
सामाजिक बदलांचा आणि आर्थिक विकासाचा वेग जसजसा वाढत चालला, तसतसं माणसाचं राहणीमान झपाट्यानं उंचावत चाललं. विज्ञानानं असंख्य सुखसुविधा निर्माण केल्या. शिक्षणाचा प्रसार वाढला. ज्या समाजात ‘व्ह. फा. ‘पर्यंत शिकणाऱ्या मुला-मुलींकडे लोक आदरानं बघत होते, त्याच समाजात घरोघरी पदवीधर दिसू लागले. जास्तीतजास्त उच्च शिक्षण घेतलेला, नोकऱ्यांमध्ये मानाच्या जागा मिळवणारा आणि आर्थिक दृष्ट्या संपन्न असा एक नवा वर्ग, उच्च मध्यमवर्ग निर्माण होऊ लागला. […]
