हलकं फुलकं लेखन. यात विनोद वगैरे सगळं आलं

गारवा थंडीचा

सकाळी गारवा थंडीचा किलबिलाट घुमतो पक्षांचा सखी गुथलेली कामात रुणुझुणुतो ताल पावलांचा @ शरद शहारे वेलतूर

लेखणीवरील तीन चारोळ्या

*चारोळी क्रमांक १* लेखणीतील शाई कागद करी काळा अर्थप्रवाही वाक्य वाच सगळी बाळा *चारोळी क्रमांक २* लेखणीतून झरे कागदावरी ज्ञान तिथे अज्ञान सरे लोका करी सज्ञान *चारोळी क्रमांक ३* ज्ञानगंगा वाहते ही स्त्रवता लेखणी सरस्वती रमते साहित्यात देखणी सौ.माणिक शुरजोशी

खरा तो एकची धर्म (चारोळी)

खरा तो एकची धर्म जाणा सत्कर्मातले वर्म करा आपुलाले कर्म प्रेम करणे स्वधर्म…१ प्रेम करणे स्वधर्म त्यास निस्वार्थी झालर आदरार्थी परधर्म करा त्याचाही आदर सौ.माणिक शुरजोशी

प्रेम

वैभवाची झुल माझ्या काल होती आज नाही … बेगडी प्रेमास त्यांच्या मग तसा तो ऊत नाही !!! ……..मी मानसी

‘मी’

शिकावेच म्हणतो मी अता चेहरे बदलायला… अनोळखी माणसात माझ्या ओळखीचे व्हायला!!! ….मी मानसी

खेळ..

तू ध्यास, तू भास, तू न्यास हव्या प्रेमाचा ! तुजसवे खेळते सारा ….खेळ कल्पनेचा !! ….मी मानसी

अबोला

अबोलाही बोलतो काही ऐकूनी होतो असे । अबोल मी आहे कधीचा कोणाही न कळले कसे? …..मी मानसी

लोक

बोललो जेव्हा मनीचे ते न त्यांनी ऐकले । आज म्हणती बोल काही मौन जेव्हा घेतले ।। …मी मानसी

सर्व विषयांवर PHD कलेली भारतातील तज्ज्ञ मंडळी

ही पहा टीव्हीवरील भारतातील सर्व विषयांवर PHD कलेली तज्ज्ञ मंडळी. यांच्याकडे प्रत्येक विषयाचे ज्ञान आहे… आजच्या चर्चासत्राचा विषय आहे : १.”मानववंशाच्या उत्क्रांतीक्रमात होत जाणारे जनुकीय बदल” आणि या विषयावर बोलायला तज्ज्ञ आहेत- प्रताप आसबे विश्वंभर चौधरी प्रकाश बाळ हेमंत देसाई समर खडस कुमार सप्तर्षी …आणि आजचा विषय आहे २. “अणुभट्टीत वापरल्या जाणाऱ्या बोरॉन ला भविष्यात पर्याय […]

1 2 3 40