नवीन लेखन...

या कातरल्या क्षणांना

या कातरल्या क्षणांना, सय तुझी येते,– उन्हाची तप्त काहिली, चटकन् दूर होते, वारा धुंद वाही, ढग जाती प्रवासी, अधूनमधून बिजलीही, उगा आपुले दर्शन देई, अशा वेळी आठवे मज, सोनेरी प्रभेची सांज, याच समुद्रकिनारी, वाजली मिलनाची गाज, नभ सुंदर सोनबावरे, होते भेटीस साक्षी, कूजन करीत बागडती, पक्षी आनंदें वृक्षी, किनारा दूरवर तटस्थ, उभ्याने राखी सागराला, मिलनाची किती […]

 जीवन घटते सतत

क्षणा क्षणाला घटते जीवन,  जाण त्याची येईल कोठून  । मोठे प्रसंग जेंव्हा टिपतो,  तेच सारे लक्षांत ठेवतो  ।। जीवनाच्या पायऱ्या मोजता,  मना विचारा काय राहता  । ढोबळतेचा विचार येता,  सूक्ष्मपणाला विसरूनी जातो  ।। मृत्यू येई हर घडीला,  जाण नसते त्याची कुणाला  । गेला क्षण  परत न येई,  आयुष्य तेवढेच व्यर्थ होई  ।। समाधान जे मिळे तुम्हाला, […]

श्री ललिता पंचरत्नम् – ४

प्रातः स्तुवे परशिवां ललितां भवानीं त्रय्यन्तवेद्यविभवां करुणानवद्याम्‌।विश्वस्य सृष्टि-विलय-स्थितिहेतुभूतां विद्येश्वरीं निगमवाङ्गमनसाविदूराम्‌॥४॥ प्रातः स्तुवे – प्रातःकाळी अर्थात सूर्योदयाच्या देखील पूर्वी, डोळे देखील उघडण्याच्या आधी, मी स्तुती करतो. परशिवां- पर म्हणजे अत्यंत श्रेष्ठ. शिव म्हणजे अत्यंत पवित्र. अत्यंत श्रेष्ठ आणि पवित्र असणारी. ललितां- अत्यंत लालित्यपूर्ण असणारी. भवानीं- भव म्हणजे भगवान शंकर. त्यांची चैतन्यशक्ती ती भवानी. त्रय्यन्त- कोणत्याही वेदांचे संहिता, […]

मित्रराज उगवताना

मित्रराज उगवताना, सृष्टीवर घडे करामत, आभाळ उतरे जळात, त्याचे रूप दिसे पाण्यात, आरस्पानी निळे सौंदर्य, नजरा खिळवून ठेवी, हलते डोलते आभाळ, पाण्यात प्रतिबिंबित होई, वृक्षांचे समूह किती, धरतीवर कोण पेरती, निळाईत उठून दिसती, पहा,हिरवाईने नटती ,–!! तमाची शामत नसे, हळूहळू तो नाहीसा होई, प्रकाशाचे किरण घेऊनी, दिनकराचा प्रवेश होई,-! अंधारी बुडालेली सृष्टी, रंग तिचा बदलून जाई, […]

कोरोना – मृत्यू वादळ

आजपर्यंत भयंकर संकट आली.. पण निश्चल असणाऱ्या मुंबईने आपली जीवन रेखा असणारी… ‘लाईफ लाईन’ नावाने परिचित असणारी ही रक्ताची शिर कधीच बंद झाल्याचे पाहिले नव्हते. अविरतपणे चालणारी, मृत्युशी झुंज देणारी, संकटाशी भिडणारी लाइफलाइन दहशतवादी हल्ला, महापुरात सुद्धा बंद झाली नव्हती… आणि आज कित्येकांची पोटं भरण्यासाठी त्यांना तारण्यासाठी निरंतर धावणारी ‘ती’आज शांत पहुडली आहे. […]

एक शोषन

शोषून शोषून जमविता, झुरुन झुरुन मरुन जाता पैशांनी भरलेल्या पिशव्या फाटून जातील हाती राहिल ते पिशव्यांचे वस्त्र तुमची आसवे पुसण्यासाठी डॉ. भगवान नागापूरकर    

नॉस्ट्रडेमसची भविष्यवाणी

नॉस्ट्रडॅमसने सांगितलेली बरीच भविष्य खरी ठरली आहेत.. त्याच्यामध्ये फ्रेंच राज्यक्रांती, लेडी डायनाचा मृत्यू, ग्रेट फायर ऑफ लंडन, हिटलरचा उदय, अणुबॉम्‍बचा शोध, दुसरे महायुद्ध,अमेरिकेतील 9 11 चा हल्ला, यांसारख्या घटनाबाबत नॉस्ट्रडॅमसची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरल्याचे दिसून आले आहे. […]

श्री ललिता पंचरत्नस्तोत्रम् – ३

प्रातर्नमामि ललिताचरणारविन्दं भक्तेष्टदाननिरतं भवसिन्धुपोतम्‌।पद्मासनादि-सुरनायक-पूजनीयं पद्मांकुश-ध्वज-सुदर्शन-लांछनाढ्यम्‌॥३॥ यानंतर पूज्यपाद जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज आई ललितांबेच्या चरणकमलांचे वंदन करीत आहेत. त्यांचे वर्णन करीत आहेत. प्रातर्नमामि- मी रोज सकाळी वंदन करतो. ललिताचरणारविन्दम्- आई जगदंबेच्या, श्रीललितेच्या चरणकमलांना. कशी आहेत ही चरणकमले? भक्तेष्टदाननिरतम् – भक्तांना इष्ट म्हणजे योग्य ते प्रदान करणारे. यातील इष्ट शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. इष्ट म्हणजे योग्य ,चांगले […]

रसिक श्रेष्ठ

कवि होणें सुलभ असावे    रसिक होण्यापरि जिवंत ठेविती कवितेला    हीच मंडळी खरी   भावनेचे उठतां वादळ    व्यक्त होई शब्दानीं भाव शब्दांचा हार दिसतो    काव्य ते बनूनी   भाव येणे सहज गुण तो     मानवी मनाचा परि बंदिस्त त्याला करणे    खेळ हा कवीचा   शब्द पिंजरा नि भाव पक्षी    ओळखी को रसिक कवि मनाशीं ‘स्व’ भावांचे   करी जुळवणूक   कविते […]

श्री ललिता पंचरत्नम् – २

प्रातर्भजामि ललिताभुजकल्पवल्लीं रक्तांगुलीय-लसदंगुलि-पल्लवाढ्याम्‌।माणिक्य-हेम-वलयांगद-शोभमानां पुण्ड्रेक्षु-चाप-कुसुमैषु-सृणीर्दधानाम्‌॥२॥ आई ललितांबेच्या मुखकमलाचे स्मरण केल्यानंतर प्रस्तुत श्लोकात पूज्यपाद आचार्य श्री आई जगदंबेच्या हस्त कमलाचे वैभव विषद करीत आहेत. ते म्हणतात, प्रातर्भजामि- मी सकाळी आराधना करतो, स्मरण करतो. ललिताभुजकल्पवल्लीं- आई ललितांबेच्या हाताचे. जे कल्पवल्ली प्रमाणे आहेत. अर्थात एकदा हा हात मस्तकावर असला की काय वाटेल ते प्राप्त होते. मनात येताच हवे ते मिळते. […]

1 2 3 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..