नवीन लेखन...

जनजागरण आणि दहशत पसरविणे यातील फरक जाणण्याची गरज

चीननंतर सर्वाधिक लोकसंख्येचा देश भारत आहे. चीनला लागून आहे आणि व्यापारी संबंधांमुळे भारत-चीन प्रवासी वाहतूकही चांगलीच आहे. असे असतानाही भारतात कोरोनाग्रस्तांची इतकी कमी संख्या आहे. सावधगिरीचे उपाय काटेकोरपणे अंमलात आणणे आणि भीतीने पळत सुटणे यात फ़रक आहे. […]

शब्द माझा मोगरा

शब्द माझा मोगरा, अन शब्द माझा पिसारा, शब्द माझा बोलका, नि तोच माझा किनारा, तोलतो मापतो,वाटतो, शब्दही सतत ‘झुंज’ देतो, राखतो पूर्ण ताकदही, सत्ताही पालटून देतो,—!!! खेळतो खेळी कल्पनांची, काव्यतुरेही तो खोवतो , राखतो बहुत अंतरे,— नाना जिवांना सांभाळतो,–!!! प्रकटे पण शब्दांतूनही,— कितीक आकसनेमका, तोच कधी जिंकून घेईल, अनेक हृदय संपदा, –!!! वाट दाखवी कधी, वचन […]

वलय

सतत फिरत राही, चक्र जीवनाचे विविधता पाही ,  रंग आयुष्याचे  ।।१ सुख दुःखाच्या भावना,  उठवूनी लहरी देह आणि मना, परिणाम करी  ।।२ लोभ अहंकार निराशा, सारे मनाचे विकार आनंद समाधान आशा, करी भावना साकार  ।।३ जीवन विषयाचे, बनत असे वलय रस शोधितां त्याचे, जीवन वहात जाय  ।।४   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०    

श्री ललिता पंचरत्नम् – १

प्रात: स्मरामि ललितावदनारविन्दंबिम्बाधरं पृथुलमौक्तिकशोभिनासम् । आकर्णदीर्घनयनं मणिकुण्डलाढ़्यं मन्दस्मितं मृगमदोज्ज्वलभालदेशम् ।।१।। आई जगदंबेचे एक नितांत सुंदर नाव आहे ललिता. कोमल, मनोज्ञ, चित्ताकर्षक असा या शब्दाचा अर्थ. आई जगदंबेचे स्वरूप तसेच आहे. शाक्त उपासनेतील दशमहाविद्या मध्ये देवी त्रिपुरसुंदरी स्वरुपात ललितांबेचे अर्चन केले जाते. त्या ललितांबेचे स्तवन करताना पूज्यपाद आचार्य श्री म्हणतात, प्रात: स्मरामि ललितावदनारविन्दम् – मी सकाळी आई […]

विनाश – ईश्वरी व मानवी

संतुलन  करूनी चालवी,  निसर्गाचा खेळ सतत  । जन्ममृत्यूची चाके फिरवी,  एकाच वेगाने अविरत  ।। जन्म घटना ही शांत होता,  मृत्यू परि घेई लक्ष्य खेचूनी  । नष्ट होतो जेव्हां मानव,  विचार लाटा उठती मनी  ।। मरणामध्यें निसर्ग असतां,  हताश होऊनी दु:ख करी  । मानवनिर्मित नाश बघूनी,  घृणायुक्त  येई शिसारी  ।। पूर वादळे धरणी कंप,  पचवितो आम्ही ही […]

श्री कनकधारा स्तोत्रम् – १८

स्तुवन्ति ये स्तुतिभिरमिभिरन्वहं त्रयीमयीं त्रिभुवनमातरं रमाम्।गुणाधिका गुरुतरभाग्यभागिनो भवन्ति ते बुधभाविताया:।।१८।। स्तुतिभिरमिभि: – या स्तुतीच्याद्वारे, या स्तोत्राचा आधारे. अन्वहं- अनु म्हणजे प्रत्येक आणि अह म्हणजे दिवस. अर्थात प्रत्येक दिवशी. नित्यनियमाने. स्तुवन्ति ये- जे स्तुती करतात. स्तवन नित्यनियमाने हवे. अडचण आल्यावर नाही. त्रयीमयीं- त्रयी शब्दाचा एक अर्थ आहे तीन वेद. त्या ज्ञानाने युक्त असणारी. त्रयी शब्दाचा दुसरा अर्थ […]

लोंबकळलेल्या खाली शेपट्या

लोंबकळलेल्या खाली शेपट्या, पिल्लू मौज करे कशी,–? शोधक बुद्धी, चौकस नजर, अफलातून फळते अशी,–!!! युक्ती,शक्ती, बुद्धी, जिवाला आहे देणगी,—- सदुपयोगाने करा किमया, जगण्यात गंमत मोठी,–!!! दिसे पिल्लू छोटेसे,— तरी मस्त आहे कल्पनाशक्ती, आरामात कसे झोके घेई, दुनियाच भासे त्यास छोटी,—!! डोळे मिचकावत पिल्लू बघते, आजूबाजूच्या साऱ्या सृष्टीकडे, भरभरून लुटेन आनंद मी, सोडवेन अनवट निसर्ग कोडे,-! ©️ […]

निसर्ग व्याप्ती

उंच चढूनी हिमालयी,      झेंडा तो रोविला गीरीराजाचे शिरावरी,      विजय संपादिला   उंचाऊनी  बघे मानव,      अथांग जगताला विज्ञानाच्या जोरावरती,   अंतराळात गेला   युगा युगाचा चंद्रमा,       केला अंकित त्याने त्याच्या देही ठेवी पाऊल,   मोठ्या अभिमानाने   अगणित दिसती गृहगोल,      त्याचा दृष्टीला सीमा न उरली आता मग,      चौकस बुद्धीला   चकित होतो प्रथम दर्शनी,      विज्ञाना बघता दिसून येती अनेक गुढे,    एक एक उकलता   किती घेशी झेप मानवा,       उंच उंच गगनी वाढत जातील क्षितिजे,     तितक्याच पटींनी   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

श्री कनकधारा स्तोत्रम् – १७

कमले कमलाक्षवल्लभे त्वं करुणापूरतरङ्गतैरपाड़ंगै:। अवलोकय मामकिंचनानां प्रथमं पात्रमकृत्रिमं दयाया : ।।१७।। कमले- आई जगदंबेलाच येथे कमला असे म्हटलेले आहे. ती केवळ कमळावर बसली आहे एवढाच अर्थ नाही. ती कमळाप्रमाणे उर्ध्वगामी वृत्तीची आहे. कमळाप्रमाणे सौंदर्यसंपन्न आहे. भक्तगणरुपी भुंग्यांच्या आकर्षणाचा विषय आहे. त्वं – हे आई तू, कमलाक्षवल्लभे – कमलाप्रमाणे अक्ष म्हणजे डोळे असणाऱ्या भगवान विष्णूंची वल्लभा म्हणजे […]

चालला घेऊन तो

चालला घेऊन तो, श्रीरामाला वनवासाला, नौकानयन करत करत, पाण्यातील प्रवासाला, नौका चालवे नावाडी, नदी तरुन जाण्या, श्रीरामासंगे जानकी, लक्ष्मण रक्षण करण्या, त्रिकूट’ चालले जलप्रवासा, जसे ओलांडती भवंसागरा,–!!! नावाडीच श्रीराम ते, संसार सागरातून तारण्या,–!! प्रवासीच इथे खरा नावाडी, अन् नावाडी असे प्रवासी, संसार सागर उफाळतां, नावाड्याचे कसब पणाशी,–!! हिमगौरी कर्वे.©

1 2 3 4 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..