नवीन लेखन...

बघता तुला प्रिया रे

बघता तुला प्रिया रे ,– जिवा बेचैनी येते, कासाविशी होता हृदयी, आत *मोरपीस* हलते,–!!! विलक्षण *ओढ* तुझी, काळजाला किती छळते, मूर्त माझ्या अंतरीची, *अढळ अढळ* होतं जाते,–!!! स्पर्श होता तुझा सख्या, माझी न मी असते, बाहूंत तुझ्या विसावण्या, किती काळ मी तरसते,–!!! तुझ्यातच सारे *विश्व* माझे, जगही तोकडे भासे, तुझ्याचसाठी राजसा, मन्मनीचा *चकोर* तरसे,–!!! उषा आणि […]

उगवत्या सूर्याला नमस्कार

उगवता सूर्य, नमन करती त्याला, विसरती सारे सुर्यास्ताला    ||धृ|| ऐश्वर्याची झलक, श्रीमंतीचे सुख बिनकष्टाची संपत्ती, लक्ष मिळवण्याती माना डोलावती, डामडोलाला   ||१|| उगवता सूर्य. नमन करती त्याला   प्रथम हवे दाम, तरच होई काम पैशाच्या भोवती, सारेच फिरती पैशाचे गुलाम, मानती पैशाला    ||२|| उगवता सूर्य, नमन करती त्याला   सत्तेची नशा, दाखवी जना आशा स्वतःसी समजे थोर, […]

स्वाईन फ्लूचा भस्मासुर !

सकाळची देवपुजा आटोपून, दारात टाकलेले वर्तमानपत्र उचलून वाचू लागलो. प्रमुख बातम्यांनी मन विचलीत केले. स्वाईन फ्लू नावाच्या नवीनच उद्भवलेल्या रोगाने सर्व देशात आणि परदेशातही थैमान  घातले होते. अनेकांचे बळी घेतले गेल्याचा वृतांत होता. खिन्न मानाने खिडकीतून उगवणाऱ्या सूर्य प्रकाशाकडे बघत होतो. एक विचार मनामध्ये डोकावला.   मी त्या नारायाणालाच प्रश्न केला. ” हे परमेश्वरा  काय चालले आहे हे तुझ्या राज्यात ?  ” बघ […]

श्री कनकधारा स्तोत्रम् – १४

यत्कटाक्षसमुपासना विधि: सेवकस्य सकलार्थ सम्पद:। संतनोति वचनाङ्गमानसै- स्त्वां मुरारिहृदयेश्वरीं भजे।।१४।। या जगात भक्तासाठी करण्यासारखे एकमेव कार्य काही असेल तर ते केवळ आणि केवळ महालक्ष्मीची उपासना हेच आहे. अशी अनन्यशरणता सांगत आचार्यश्री येथे आई जगदंबेचे वैभव स्पष्ट करीत आहेत. ते म्हणतात, यत्कटाक्षसमुपासना विधि:- त्या आई जगदंबेच्या कटाक्षाच्या उपासनेचा विधिच, सेवकस्य सकलार्थ सम्पद:- तिचा सेवकांना सर्व अपेक्षित संपत्तीला […]

तू असा, तू तसा

तू असा, तू तसा, तू कायसा, कायसा, अनंत रुपे भगवंता, घेतोस कशी रात्रंदिवसा,–!!! कधी वाऱ्याचा स्त्रोत तू, कधी, खळखळणारे पाणी, कधी खोल खोल दरी तू, कधी कोकिळकंठी मंजूळगाणी,-!! शोधावे कुठे तुला, तळ्याकाठी, झऱ्याजवळ का धबधब्यात, सोनेरी उन्हात राहशी, का डोंगरातील कपारीत,–!!! बाळाच्या हास्यात दडशी, का अंधारल्या गुहेत, प्राण्यांच्या दिमाखी बघावे, का पक्ष्यांतील सौंदर्यात,–!! जगातील आश्चर्यात पहावे, […]

 गतकर्माची विस्मृती

एके दिनीं निघून जाईन    निरोप घेवून ह्या जगताचा प्रवास माझा अनंतात    कसा असेल त्या वेळेचा   आकाशाच्या छाये खालती    विदेही स्थितींत  फिरत राहीन ‘तू’ आणि ‘मी’ च्या विरहीत मी   गत कर्माचे करिन मापन   बाल्यातील चुका उमगल्या     तरूणपणाच्या उंबरठ्यावरी सळसळणारे यौवन रक्त    वृधावस्तेतील खंत ठरी   पूनर्जन्म घेण्याकरितां    गर्भाची निवड करीन गत जन्मींच्या चुका टाळूनी    आदर्शमय  जीवन जगेन   […]

तंत्रविश्व – भाग २ : मोबाईल बँकिंग सुरक्षितता

बँकींग व्यवहार मोबाईलद्वारे करण्याचे म्हणजेच ‘मोबाईल बँकिंग’चे प्रमाण नोटबंदी झाल्यापासून झपाट्याने वाढले आहे. बँकांनी देखील वेगवेगळ्या अँड्रॉईड अँपद्वारे मोबाईल बँकींग सुलभरित्या करण्याची सोय उपलब्ध करून दिली. सरकारने देखील यूपीआय सारखी सुरक्षित आणि जलदरीत्या फंड ट्रान्स्फर करणारी सुविधा उपलब्ध करून दिली. असे असले तरी एखाद्या अँपमधील आणि सुविधेमधील त्रुटींचा (loopholes) शोध घेऊन त्याचा आणि इतर मार्गांनी मिळविलेल्या माहितीचा वापर करून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.त्यासाठी मोबाईल बँकिंग करताना ते सुरक्षितरित्या करणे आवश्यक असते. […]

श्री कनकधारा स्तोत्रम् – १३

सम्पत्कराणि सकलेन्द्रिय नन्दनानि साम्राज्यदान विभवानि सरोरूहाक्षि।त्वद्वंदनानि दुरिताहरणोद्यतानि मामेव मातरनिशं कलयन्तु मान्ये।।1१३।। मान्ये- हे सगळ्यांना मान्य अर्थात वंदनीय असणाऱ्या आई जगदंबे! सर्वसामान्य मानवच नव्हे तर ईश्वर महेश्वर देखील जिच्या योग्यतेचा सन्मान करतात अशी. सरोरूहाक्षि- हे कमलनयने. सर म्हणजे तलाव. त्यात उरुह म्हणजे जन्माला येऊन वर येणारे. अर्थात कमळ. तसे जिचे अक्ष म्हणजे डोळे आहेत अशी. येथे केवळ […]

सामूहिक दायत्वाची गरज!

करोना संसर्ग रोखण्यासाठी आता आपल्याला एकजुटीने उभं राहायचं आहे..करोना विषाणू सोबत युद्धाचा बिगुल वाजला आहे.. सरकार, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा धीरोदत्तपणे मुकाबल्यासाठी उभी आहे. मात्र, लोकसहभागाशिवाय हे युद्ध जिंकताचं येणार नाही.. त्यामुळे, आपण सगळे या लढाईतील सैनिक आहोत.. ही लढाई आपल्याला रणांगणावर नाही तर घरात बसून प्रतिबंधात्मक उपायांच्या शास्त्राने लढावी लागणार आहे..‘एकमेका साह्य करू…’ या भूमिकेतून करोना संसर्गाचा मुकाबला केला करोनाची आपल्यासमोर काय ‘औकात’ आहे? […]

‘निर्भया’ला न्याय!

निर्भया प्रकरणाचे वैशिष्ट्य हेच की ती एक अपवादात्मक घटना राहिली नाही तर देशभरात महिलांवरील अत्याचाराची ती एक प्रतीकात्मक विषय बनली. या घटनेमुळे देश जागृत झाला, कायदे कठोर झाले, शिक्षेची परिभाषा बदलली. त्यामुळेचं निर्भया प्रकरणातील चार दोषींना फाशी दिल्यानंतर नुसता निर्भयाला न्याय मिळाला नाही तर या घटनेनंतर आक्रोश करणाऱ्या संपूर्ण जनतेच्या दुःखावरही मलमपट्टी झाली आहे. मात्र, जखम पूर्ण बरी झाली का? या प्रश्नाचे उत्तर अजूनही आपल्याला शोधावे लागणार आहे..! […]

1 2 3 4 5 6 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..