नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

रहस्यमय मार्गिका…

इजिप्तचं वैशिष्ट्य असणाऱ्या पिरॅमिड या वास्तू, संशोधकांच्या दृष्टीनं अत्यंत कुतूहलजनक रचना ठरल्या आहेत. काही पिरॅमिडच्या आतल्या भागात थोडंफार शिरता येत असलं तरी, त्या पिरॅमिडची संपूर्ण रचना कशी आहे, त्यांतील विविध रचनांचा उद्देश काय आहे, ते अजूनही आपल्याला ठाऊक नाही. […]

सावध ऐका समृद्धीच्या हाका, पूर्वार्ध

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, मुंबई नागपूर द्रुतगती महामार्ग म्हणजेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा भारतातील सर्वात मोठा तर जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा महामार्ग आहे. हा महामार्ग महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला चालना देणारा, विविध विभागांत कनेक्टिव्हिटी प्रदान करणारा तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे. […]

नेली ब्लाय – धाडसी अमेरिकन पत्रकार

नेली ब्लाय ही जगप्रसिद्ध अमेरिकन पत्रकार ! बातमी मिळवून तिची ‘स्टोरी’ करण्यासाठी ती कोणतीही भूमिका करीत असे. ही भूमिका करताना ती कोणतेही धाडस करीत असे. तिच्या धाडसाला सीमा नव्हती. समाज काय म्हणले याची भीती तिने कधीच बाळगली नाही. वाचकांना सत्य जाणण्याचा अधिकार आहे आणि तो त्यांना मिळवून देण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तिच्या मनाची तयारी असे. […]

अमेरिकन घरं

इथे साधारण तीनेक प्रकारची घर दिसतात. पहिला प्रकार अपार्टमेंट स्वरूपाचा. ती एक किंवा दोन मजली असतात. आपल्याकडे इमारती असतात तशी. त्यामध्येदेखील ऐसपैस जागा असते: […]

अमेरिकेतील आकाशदर्शन..

अमेरिकेत पाऊल टाकले की तिथला विलक्षण निसर्ग मनाला भावतो. आपला भरतखंडही यादृष्टीने संपन्न आहेच. त्याला स्वतंत्र परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक संदर्भ आहेत. […]

प्राण्यांचा जैवभार

मानवाच्या ‘अधिपत्या’खालील भूप्रदेश वाढत आहेत, जंगलं नष्ट होत आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांची संख्यासुद्धा घटत आहे. विविध वन्यप्राण्यांची संख्या ही पृथ्वीवरच्या वन्यजीवनाच्या ‘प्रकृती’ची निर्देशक असते. वन्यप्राण्यांच्या संख्येवर होणारा कोणत्याही प्रकारचा परिणाम जाणून घ्यायचा असला तर, कोणत्या जातीचे किती प्राणी अस्तित्वात आहेत, हे माहीत असायला हवं. […]

बिथोवेनचा मृत्यू

लुडविग वॅन बिथोवेन हा अभिजात पाश्चात्य संगीताच्या क्षेत्रातला एक महान संगीतकार. इ.स. १७७०मध्ये जन्मलेल्या या जर्मन संगीतकारानं आपल्या सांगीतिक कारकिर्दीत उत्तमोत्तम अशा सुमारे सातशे सांगीतिक रचना निर्माण केल्या. त्याची ही सांगीतिक कारकिर्द सुमारे पंचेचाळीस वर्षांची होती. आश्चर्य म्हणजे अशी दीर्घ काळ निर्मितीक्षमता लाभलेल्या या संगीतकाराची श्रवणशक्ती मात्र त्याच्या तरूण वयातच क्षीण होऊ लागली होती. […]

ममींची कार्यशाळा

ममी हा इजिप्तच्या पुरातन इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. ममी म्हणजे इजिप्तच्या राजघराण्यातील, तसंच तिथल्या सधन लोकांची, प्रक्रियेद्वारे जतन करून ठेवलेली शवं. ममीद्वारे मृताचा अनंताकडचा प्रवास सुरू होत असल्याचं मानलं जायचं. त्यामुळे ममी ही अगदी रूढीपूर्वक तयार केली जायची. […]

अजस्र पेंग्विन

पेंग्विन हे अंटार्क्टिकावरील जीवसृष्टीतलं एक वैशिष्ट्य आहे. मात्र या न उडणाऱ्या पक्ष्यांचं वास्तव्य फक्त अंटार्क्टिकापुरतं मर्यादित नाही. पेंग्विनच्या काही जाती अगदी विषुववृत्ताजवळच्या प्रदेशांतही आढळतात. पेंग्विनच्या आज अठरा जाती अस्तित्वात असून, त्यांतील अंटार्क्टिकावर आढळणारी एम्परर पेंग्विन ही जाती आकारानं सर्वांत मोठी आहे. […]

सर विवियन रिचर्डस स्टेडियम

सर विवियन रिचर्डस् स्टेडियम हे मैदान वेस्ट इंडिज मधील अॅन्टिगुआ येथे आहे. या स्टेडियमचे बांधकाम मुख्यत्त्वे २००७ च्या वर्ल्ड कप सामन्यांसाठी करण्यात आले. जेथे सुपर ८ मॅचेस खेळविण्यात आल्या होत्या. या मैदानाची आसन क्षमता ही १०,००० आहे. […]

1 47 48 49 50 51 241
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..