आकाशनिरीक्षणाच्या दृष्टीनं उत्तम आकाश म्हणजे कसं? हजारो ताऱ्यांनी गच्चं भरलेलं… आकाशगंगेच्या पट्ट्याचं सहजपणे दर्शन देणारं… तेजस्वी ताऱ्यांपासून ते अगदी अंधूक ताऱ्यांपर्यंत सर्वांना ‘सामावून’ घेणारं! अर्थात हे वर्णन झालं शहरापासून दूरवरच्या आकाशाचं – जिथे इतर कोणत्याही प्रकाशाचा स्रोत अस्तित्वात नाही, अशा ठिकाणचं. शहरात अर्थात असं आकाश दिसणं शक्यच नाही. […]
….पण तो म्हणाला” हे माझं शेवटचं लॉटरीचे तिकीट आहे .आजच्या दिवसाची सर्व तिकीट खपली असून ,एकच आता बाकी आहे. हे संपलं की मी लवकरच मालकाकडे जाऊन हिशोब देऊ शकतो “ .त्याचे हे बोलणं ऐकून ,का कोणास ठाऊक पण माझ्या मनात त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली आणि कळत नकळत का होईना मी लॉटरीचे तिकीट विकत घेतलं आणि पर्समध्ये ठेवून दिले . […]
सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या रोमन साम्राज्यानं मोठा भूभाग व्यापला होता. या रोमन साम्राज्याच्या खुणा आजही युरोपात भूमध्य सागराजवळच्या देशांत, तसंच उत्तर आफ्रिका आणि पश्चिम आशिआतल्या अनेक भागांत, त्याकाळच्या वैशिष्ट्यपूर्ण बांधकामांच्या स्वरूपात दिसून येतात. […]
हिंदी चित्रसृष्टीतील आद्य घराणे- कपूर ! त्यांच्यानंतर शृंगाराची बहुतांशी रूपे पडद्यावर उधळणारी फॅमिली म्हणजे चोप्राज ! १४ फेब्रुवारीला वॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर नेटफ्लिक्स ने ROMANTICS नांवाची चार भागांची वेब मालिका छोट्या पडद्यावर आणली. […]
२१ फेब्रुवारी हा दिवस जगभरात जागतिक मातृभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतातील तसेच जगातील अनेक देशांमधील विविध समूहांच्या मातृभाषांचे जतन, संवर्धन करणाऱ्या विविध संस्था, जागतिक मातृभाषा दिवस साजरा करतात ! सर्व दूतावास आणि आंतरराष्ट्रीय संस्था हा दिवस विविध उपक्रमाद्वारे साजरा करतात. हा जागतिक मातृभाषा दिवस साजरा करण्याची प्रथा कशी पडली त्याचा इतिहासही रंजक आहे. पूर्व […]
जर्मनीतील बव्हेरिआ प्रांतात फ्रँकोनिअन जुरा नावाचा प्रदेश आहे. हा प्रदेश टेरोसॉर आणि तत्सम अतिप्राचीन सरीसृपांच्या अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे. टेरोसॉर हे सरीसृप, डायनोसॉर या सरीसृपांचे भाऊबंद होते. ते उडणारे सरीसृप म्हणून ज्ञात आहेत. त्यांना पंख होते. मात्र हे पंख पिसांपासून बनलेले नव्हते, तर ते उतींपासून बनलेले होते. जगभरच्या इतर ठिकाणांप्रमाणेच फ्रँकोनिअन जुरामध्येही टेरोसॉरच्या अनेक प्रजाती सापडल्या आहेत. […]
अतिथंड तापमानाला धातूंचे आणि मिश्रधातूंचे गुणधर्म बदलतात. सर्वसाधारण तापमानाला अतिशय उपयुक्त ठरणारा एखादा धातू वा मिश्रधातू हा अतिथंड तापमानात ठिसूळ बनतो व निरुपयोगी ठरतो. त्यामुळे अतिथंड तापमानाला वापरायच्या धातू व मिश्रधातूंवर मर्यादा येते. परंतु हा प्रश्न कदाचित नजीकच्या भविष्यात सुटण्याची शक्यता आहे. […]
ग्रीनलँड हा पृथ्वीवरचा अतिउत्तरेकडचा प्रदेश आहे – उत्तर ध्रुवाजवळचा! या प्रदेशाचा उत्तरेकडचा भाग म्हणजे एक शीत मरुभूमी आहे. अत्यंत कोरडी आणि थंड हवा असणारा हा प्रदेश अगदी वैराण आहे. इथल्या जमिनीतलं पाणी हे सतत गोठलेल्या अवस्थेत असतं. इथल्या अतिप्राचीन काळातील वनस्पतींची आणि प्राण्यांची फारशी माहिती उपलब्ध नाही. […]