नवीन लेखन...

अमेरिका – एक आंतरराष्ट्रीय बाजारपेठ

आपल्याकडे गावोगावी, शहराशहरात असतात तशी वाण्यांची दुकाने अमेरिकेत दिसत नाहीत. इथे ‘राल्फस्’, ‘वॉलमार्ट’, ‘कोलह’, ‘टारगेट’, ‘मायकल’, ‘स्पेक्ट्रम’.. अशा मोठमोठ्या मॉल्सची साखळी असते. त्यामध्ये जगाच्या भिन्न भिन्न कोपऱ्यात तयार होणाऱ्या असंख्य वस्तू वेळोवेळी येत असतात. त्यातच हॅलोवीन, ईस्टर, ख्रिसमस, स्वातंत्र्यदिन यासारख्या महत्त्वाच्या दिवसांपूर्वी त्यांचे आगमन होत असते.

अमेरिकेत स्वतंत्रपणे फारशा वस्तू निर्माण होत नाहीत. त्या बाहेरच्या देशांतून येत असतात. मात्र कटाक्ष गुणवत्तेवर राहिलेला असतो.

काही दशकांपूर्वी अमेरिकन सरकारने यासंबंधीचा निर्णय घेतला. तेव्हा चीनने बाजी मारली. अमेरिका आणि रशिया ही दोन सत्ताकेंद्र होती आणि आता रशियाची जागा चीनने घेतली असून अमेरिका आणि चीन एकमेकांचे स्पर्धक वा शत्रू असल्याचे चित्र आपल्याकडे रंगवले जाते. ते खरे असेलही. पण अमेरिकेतली बहुतेक बाजारपेठ चीनने काबीज केल्याचे दिसते. अगदी लहान वस्तूंपासून कोणत्याही मोठ्या वस्तू इथे चीनी बनावटीच्या मिळतात. इलेक्ट्रॉनिक बाबतीत म्हणजे कॉम्प्युटर, कॅमेरे, घड्याळे जपान, कोरिया, मलेशिया वगेरे देश आघाडीवर आहेत. भारतातून, पाकिस्तानातून आणि बांगलादेशातून कपडे इथे आयात केले जाते.

‘कॉस्को’ हा समूह केवळ होलसेल विक्री करणारा. तिथे गुणवत्तेवर खूप भर दिलेला असतो. त्याचे लाभ केवळ जे त्यांचे सभासद असताना, त्यांनाच मिळतो. त्यांचे सभासदत्व मिळविण्यासाठी आपल्याला संबंधी काही माहिती वा कागदपत्रे सादर करावी लागतात. एकदा का ते मिळाले की तिथे जाऊन वस्तूंची खरेदी करता येते. तिथे दरदिवशी नवनवीन वस्तू येत असतात. त्यांची गुणवत्ता चोख असते आणि वाजवी किंमतीत त्या मिळत असतात. याशिवाय काहींवर डिस्काऊंटही मिळतो आणि यदाकदाचित तुम्ही विकत घेतलेली वस्तू चांगली निघाली नाही, तिच्यात काही उणीवा असल्यास वा तुम्हांला ती नापसंत असल्यास तिच्या वापरानंतरही तीन महिन्याच्या आत तुम्ही परत करू शकता. तुम्ही ती का परत करीत आहांत, हे कोणीही विचारत नसते. अशा वस्तू परत करणारांसाठी तिथे वेगळी रांग असते.

याशिवाय ‘टॉयीज आर फॉर यू’ मध्ये केवळ खेळणी, ‘बाथ अँड बॉडी वर्क्स’ मध्ये केवळ न्हाणीघराशी संबंधीत अशा विशिष्ट प्रकारच्या वस्तू मिळणारी मोठमोठी दुकाने असतात. या मॉल्समध्ये कॅफेटेरियाही असतो. म्हणजे खरेदी करताना किंवा खरेदी झाल्यावर तुम्हांला भूक लागली असेल, तर तिथे पदार्थ विकत घेऊन खाण्याची व्यवस्था असते. तिथे रेस्टरूम्स असतात. तुम्ही कपडे खरेदी करणार असलात तर ते तुम्हांला बरोबर होतात की नाही हे पाहाण्यासाठी स्वतंत्र रूम्स असतात. काही ठिकाणी बँकांच्या एटीएमचीही सोय असते. या मॉलमध्ये केमिस्टची दुकाने असतात आणि तिथे तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी सिस्टर्सही असतात. काही ठिकाणी तुमच्या कानांचीही तपासणी मोफत केली जाते आणि श्रवणदोष आढळल्यास वाजवी दरात साधने ही उपलब्ध करून देण्यात येतात. ‘कॉस्को’ सारखी संस्था तर घर, कार विकत घेण्याकरिता मध्यस्थ म्हणून पुढाकारही घेते. खेरीज रास्त भावाने तिथे गॅस म्हणजे गाड्यांसाठी पेट्रोलही विकत मिळते. अमेरिकेत सर्वत्र, सर्रास मोटरगाड्या वापरण्यात येत असल्याने मॉल परिसरात भरपूर पार्किंग सोय करण्यात आलेली असते हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

-– डॉ. अनंत देशमुख 

(अनघा प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या ओ अमेरिका ह्या पुस्तकामधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..