नवीन लेखन...

शैक्षणिक

पूर्णविराम

भूतकाळात झालेल्या गोष्टींना पूर्णविराम देण्याशिवाय आपल्याकडे दूसरा कोणताही पर्याय नाही. जर आयुष्याला नवे वळण द्यायचे असेल तर वाईट गोष्टींना, घटनांना विराम द्यावा. कारण आयुष्य हे ऊन पावसा सारखे आहे. सुख-दुःख ह्यांचा खेळ चालूच राहणार. पण नवीन दृश्य आपल्याला बघायची असतील तर नकारात्मक विचारांना विराम देऊन, विचारांना नवीन बनवण्याची गरज आहे. […]

‘दामू, साने गुरुजींचा धडपडणारा मुलगा’ – पुस्तक परिचय

हे पुस्तक आशाताई कुलकर्णी यांनी २०१८  मध्येच मला सप्रेम भेट म्हणून दिले होते. त्यावेळी मी ते पुस्तक वाचून काढले होते, पण पंधरा दिवसांपूर्वी ते पुस्तक मी वाचू लागले आणि त्यातला सखोल आणि सुयोग्य अर्थ, खरेपणा मला जाणवू  लागला. हा धडपडणारा विद्यार्थी म्हणजे, तरुण वयातच भारावून जाऊन, देश आणि लोक सेवाकार्यात झोकून देणारा ‘दामोदर बळवंत कुलकर्णी”,  म्हणजेच साने गुरुजींचा दामू !  ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’  हा त्यांचा सामाजिक कार्याचा गाभाच आणि मूलतत्वच  होते. […]

माणूस कधी बोलू लागला?

मेंदूतील ‘आरक्युएट फॅसिक्यूलस’ ही मेंदूतील नसांची जुडी, भाषा विकसित होण्यासाठी आवश्यक असणारे विविध भाग एकमेकांना जोडते. आर्क्युएट फॅसिक्यूलस हा भाग किती विकसित झाला आहे, यावरून त्या प्राण्याची बोलण्याची क्षमता कळू शकते. […]

आली माझ्या घरी ही “शाळा “!

गेले काही महीने माझ्या घरात माझ्या नातीसाठी सकाळी नऊ ते अकरा चाळीस असा पहिलीचा वर्ग बसतो. चाळीस चिल्लीपिल्ली आपापल्या घरट्यातून स्वतःच्या घरून वर्ग घेणाऱ्या टीचरना हैराण करून सोडतात. नातीबरोबर मी वर्गाला बसतो- वही शोधून दे, पेन्सिलला टोक, पान नंबर हुडकून दे वगैरे मदतनीसाची कामे करत. मस्त मनोरंजन असतं ते आणि माझ्या आज्जी म्हणायच्या तसे “गुरं वळणं ! ” […]

धावणारा काळ

आपली घड्याळं ही दिवसाच्या या चोवीस तासांच्या कालावधीवर आधारलेली आहेत. पृथ्वीच्या प्रदक्षिणा काळातील बदलामुळे आपली घड्याळं ही अधूनमधून पृथ्वीप्रदक्षिणेशी जुळवून घ्यावी लागतात. पृथ्वीचा वेग बहुधा कमी होत असल्यानं, दिवसाचा कालावधी वाढत असतो. दिवस चोवीस तासांचाच असण्यासाठी आपल्याला आपली घड्याळं मागे न्यावी लागतात. यासाठी घड्याळ किंचितसं थांबल्याचं मानलं जात. […]

परमेश्वर पाहिलेला.. मयूर शेळकेच्या रुपात

“मी डोळे मिटुन चालत होतो” एका वाक्यातले हे मुलाचे उत्तर अतीशय बोलके आहे ..तो लहानगा अंध आई कशी चालते ते अनुभवण्याचा प्रयत्न करत होता ..कित्ती गोड लेकरू अंध आईचे नेमके दु:ख समजून घेण्याचा त्याचा प्रयत्न होता. […]

पुरुष सूक्तम् – सहस्रशीर्षा पुरुषः – मराठी अर्थासह

पुरुषसूक्त हे ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील नव्वदावे सूक्त आहे. आपल्याला दिसणारे जग हे विराट परमेश्वराचा केवळ अंशभाग आहे हा या सूक्ताचा मुख्य विषय. विश्वपुरुष व त्याच्यापासून निर्माण झालेली सृष्टी यांचे वर्णन करणार्‍या या सूक्तात सोळा ऋचा असून रचयिता नारायण ऋषी व देवता पुरुष (परमेश्वर) आहे. मुख्यत्वे अनुष्टुप् छंदात रचलेल्या या सूक्ताची शेवटची ऋचा मात्र  त्रिष्टुप् छंदात गुंफलेली […]

अंजिराच्या शेतीतुन समीर डोंबेचे “पवित्रक” ब्रँडनेम  

समीर डोंबे याचा इंजिनिअर ते अंजीर किंग असा गेल्या सहा वर्षांचा प्रवास. दौंड तालुक्यातील खोर गावच्या युवा शेतकऱ्याने इंजिनिअरिंगचे लॉजिक शेतात वापरुन अंजिरांच्या शेतीतून मोठी कमाई केली. विशेष म्हणजे, लॉकडाऊनच्या काळातही त्याने तब्बल 20 टन अंजीर विकले. […]

कोटा फॅक्टरी – तारुण्याचे हडप्पा, शिक्षणाचे मोहेंजोदरो ! – ६

घरच्यांना फसवून, क्लास बदलून राहणारे तरुणही कोटा फॅक्टरीत भेटतात. प्रत्येक ” ईशान अवस्थी “ला निकुंभ सर भेटत नाही इथे! दिवसरात्र क्लासमध्ये घालवल्यावरही इथे मुले एज्युकेशनल ऍप वरील लाईव्ह सेशन्स ऐकत असतात. प्रवेश घेतानाच क्लासने टाय-अप केलेल्या महाविद्यालयात अधून-मधून प्रयोग करायला जात असतात. पूर्ण दिवस क्लास केल्यावर महाविद्यालयात जायला वेळ/ऊर्जा कोठे? आणि तसही सगळं क्लासमध्ये कव्हर होतंच. […]

मिसिंग टाइल थेरपी

मनाचा आढावा घेणारे आपले मानसशास्त्रज्ञ नेहमीच आपल्याला स्वतः चा शोध घ्यायला शिकवतात. कदाचित आपण कधी तितके स्वतः चे परीक्षण आजवर केले ही नसू पण त्यांनी अनेक प्रयोगा द्वारे त्याची जाणीव करून दिली आहे. मानसशास्त्रामध्ये एक प्रसिद्ध सिद्धांत आहे, मिसिंग टाईल्स फिलॉसॉफी! […]

1 80 81 82 83 84 155
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..