नवीन लेखन...

परमेश्वर पाहिलेला.. मयूर शेळकेच्या रुपात

शनिवार दि. १७-०४-२०२१ रोजी घडलेली वांगणी स्टेशन ला घडलेली ही घटना, जी पाहून चांगल्या चांगल्यांच छातीत धडकी भरली!
एका अंध बाईचा मुलगा वांगणी स्टेशनच्या प्लॅटफॉर्म वरून खाली पडला! मुलगा उंचीने लहान असल्यामुळे प्लॅटफॉर्म वर चढू शकत नव्हता तर आई अंध असल्या मुळे गोंधळून गेली! त्याच वेळेस त्या ट्रॅक वर एक मेल ट्रेन येत होती. शंभर च्या स्पीडने पास होणाऱ्या ट्रेनला हिरवा all right सिग्नल दाखवण्या साठी पॉइंट्स मन मयूर शेळके ट्रॅक च्या पलीकडे उभा होता. ज्या वेळेस हि घटना त्याच्या लक्षात आली.त्याच वेळेस त्याने गाडीच्या समोर धाव घेऊन, वेळेत त्या मुलाला प्लॅटफॉर्म वर अक्षरशः टाकले आणि स्वतःही प्लॅटफॉर्म वर उडी घेतली!
एखाद्या हॉलिवूड चित्रपटात शोभेल असा हा प्रसंग सेकंदाच्या काही भागात घडला आणि सी सी टीव्ही कॅमेरात कैद झाला!१०० km/h समोरून येणाऱ्या मेल ट्रेनला पाहूनही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या लहानग्या मुलाला वाचावतनाच दृश्य काळजाचा ठोका चुकवतो.
वांगणी येथील स्टेशन वर कार्यरत असलेल्या श्री मयूर शेळके (पॉइंट्स मन) ह्याचे हे अतुलनीय कार्य आम्हालाही अभिमानस्पद आहे! याच्या या कार्याचा मध्य रेल्वे च्या डिविजनल रेल्वे मैनेंजर सरानी विशेष पुरस्कार देवून सम्मान केला!
*सलाम तुझ्या कार्याला मयूर शेळके….!!
मात्र असा कसा पडला मुलगा?
रेल्वे पाॅईंटमन मयुर शेळके यांनी रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या लहानग्याला वाचवल्याचा व्हिडिओ सर्वांनी पाहिलात ..सर्वत्र मयुर शेळके यांचे कौतुक होतेय. .खरोखरच थरारक दृश्य आहे ते. मात्र अनेकांना ती अंध बाई लहान मुलाला घेऊन रेल्वे स्टेशनवर का गेली ..असा प्रश्न पडणे स्वाभाविक होते .. त्या बातमीचा श्री तुषार नातू. यांनी पाठपुरावा केला अन जे समजले ते असे ..ABP माझावर सविस्तर बातमी दाखवली गेली ..त्या अंध आईचा अन मुलाचा बाईट घेतला गेला ..तो असा
ती बाई रेल्वे स्टेशन व गाडीत पोटासाठी खेळणी विकण्याचे काम करते ..त्यामुळे तिचा रेल्वे स्टेशनवर नेहेमी वावर असतो.
” तु कसा काय पडलास? ” कसा पडला हा प्रश्न जेव्हा त्या मुलाला विचारला गेला तेव्हा त्याचे निरागस उत्तर ऐकून मलाही भरून आले …
“मी डोळे मिटुन चालत होतो” एका वाक्यातले हे मुलाचे उत्तर अतीशय बोलके आहे ..तो लहानगा अंध आई कशी चालते ते अनुभवण्याचा प्रयत्न करत होता ..कित्ती गोड लेकरू अंध आईचे नेमके दु:ख समजून घेण्याचा त्याचा प्रयत्न होता.
— संतोष द पाटील
Avatar
About संतोष द पाटील 22 Articles
FREELANCE WRITER IN MARATHI,ENGLISH ,POET,SOCIAL ACTIVIST, SOCIAL WORKER.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..