नवीन लेखन...

शैक्षणिक

तळ्याकाठचे निअँडरटाल

निअँडरटाल ही मुख्यतः शिकारीवर जगणारी प्रजाती होती. त्यामुळे ते कदाचित खाद्य गोळा करण्यासाठी या तळ्याशी आले असावेत. मात्र या निअँडरटालांनी मोठ्या प्राण्याची शिकार केल्याचा पुरावा काही या वाळूच्या थरावरील खुणांवरून मिळाला नाही. तळ्यातले मासे पकडण्यासाठी, छोटे कवचधारी मृदुकाय प्राणी गोळा करण्यासाठी किंवा तळ्यावर येणाऱ्या पक्ष्यांची शिकार करण्यासाठी ते आले असावेत. कारण या परिसरातील निअँडरटालांच्या खाद्यात या गोष्टींचा समावेश असायचा. या ठशांच्या बाबतीतला एक वेगळाच भाग म्हणजे, ज्या सहा वर्षांच्या दोन छोट्या मुलांच्या पायांचे ठसे इथे आढळले आहेत, ते फक्त ठरावीक दिशेनंच गेलेले दिसत नाहीत. ते इकडेतिकडे विखुरले आहेत. यावरून या संशोधकांनी, ही दोघं लहान मुलं वाळूत खेळत असावीत, खेळताना ती इकडेतिकडे बागडत असावीत, असा एक सरळ साधा, पण मनोरंजक निष्कर्ष काढला आहे. […]

तुमचा रिकामा ग्लास कसा भराल?

अशी कुठलीच परिस्थिती नसते की, ज्याबाबत आपण काही करू शकत नाही. तुम्हाला फक्त त्या दिशेने विचार करायला हवा. तुमचा ग्लास अर्धा रिकामा म्हणून न पाहता अर्धा भरलेला म्हणून पहा, आशा हरवू नका. […]

युवापिढी आणि वाचनसंस्कृती

तरूण पिढीला आपलं जीवन सुखासमाधानाचं आणि आनंदाचे व्हावे असे वाटत असेल, तर वाचनासारखा दुसरा पर्याय नाही. आज काळ बदलला आहे. बदलत्या काळाप्रमाणे अनेक सोई-सुविधा आपल्या सेवेला तत्पर आहेत. मग त्यांचा उपयोग आपल्या संपन्न, सुसंस्कृत जीवनासाठी का करायचा नाही? […]

‘निस्तेज’ होणारी पृथ्वी

सिरिस उपकरणांनी गेली काही वर्षं, कमी उंचीवरील ढगांकडून होणाऱ्या प्रारणांचं प्रमाण कमी होत असल्याचं नोंदवलं आहे. कमी होणारं प्रारणांचं हे प्रमाण, कमी उंचीवर पूर्वीइतके ढग तयार होत नसल्याचं दर्शवतं. कमी उंचीवरील ढगांचं कमी प्रमाणात निर्माण होणं आणि चंद्रावरचा पृथ्वीप्रकाश कमी होणं, हे एकाच वेळी घडत असल्याचं या संशोधकांना आढळलं. कमी उंचीवरील ढगांच्या प्रमाणाचा आणि पृथ्वीप्रकाशाच्या तीव्रतेचा थेट संबंध या तुलनेतून स्पष्ट झाला. कमी उंचीवरचे ढग हे सूर्यप्रकाश अधिक प्रमाणात परावर्तित करतात. या कमी उंचीवरील ढगांचं प्रमाण कमी होत असल्यानंच, पृथ्वीकडून सूर्यप्रकाश परावर्तित करण्याचं प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळेच पृथ्वी निस्तेज होत चालली आहे. […]

व्यक्तिमत्व घडविणार्‍या सुट्ट्या आवश्यकच आहेत

सुट्टी म्हणजे स्वातंत्र्य आहे स्वैराचार नव्हे हे मुलांना पटवून द्यायला हवं, त्याप्रमाणेच त्यांना गुंतवायला हवं. रिकामं घर सैतानाचं घर असतं हे ही लक्षात घ्यायला हवें.सुट्टीत मुले खेळतात, संवाद करतात, निरीक्षण करतात, पाहुणे आल्यावर शिष्टाचार शिकतात, आजची पिढी अलिप्त कोरडी होत आहे त्यांना लोकांमध्ये मिसळणं, भावभावनांची जाण येणंआवश्यक आहे. […]

बदलाच्या सात पातळ्या

वेगळे परिणाम मिळण्यासाठी गोष्टी वेगळ्या पद्धतीने विभाजीत केल्या गेल्या पाहिजेत. बदलाचे हे मॉडल सात पातळ्यांमध्ये विभाजीत केलेलं आहे – सोप्यापासून कठीणाकडे […]

मानवी वंशवृक्षाची पाळंमुळं

प्रत्येक सजीवाला त्याचे गुणधर्म हे त्याच्या पेशींतील जनुकांच्या रचनेनुसार प्राप्त होतात. जनुक म्हणजे सजीवाच्या पेशीतल्या डीएनए रेणूंतल्या विशिष्ट रासायनिक रचना. पेशींतील जनुकांच्या संपूर्ण माहितीला, सजीवाचा ‘जनुकीय आराखडा’ म्हटलं जातं. सजीवाच्या जनुकीय आराखड्यात विविध कारणांनी कालानुरूप बदल होत जातात. हे जनुकीय बदल त्या सजीवाच्या स्वरूपात बदल घडवून, त्या सजीवाच्या उत्क्रांतीला कारणीभूत ठरतात. आज अस्तित्वात असलेल्या सजीवांच्या जनुकीय आराखड्यांची प्राचीन काळातील सजीवांच्या जनुकीय आराखड्यांशी तुलना करून त्या सजीवाच्या उत्क्रांतीचा अभ्यास करता येतो. […]

द लास्ट सीन

The last seen…. हेच ते तीन शब्द… बारकाईने वाचल्यास लक्षात येईल की आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या व्हाट्सअपचं एक अनमोल फीचर. हे ॲप तुम्ही शेवटचे केव्हा पाहिले त्याची नोंद दाखवणारं… पण हेच last seen जर पुस्तकांना लागू केलं तर काय असेल उत्तर…? 2 महिने… […]

महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळ – दशा आणि दिशा

मराठी वाङ्मय मंडळ हे विद्यार्थ्यांमध्ये मराठी साहित्य आणि संस्कृतिविषयी प्रेम निर्माण करणारे एक सशक्त साधन आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाङ्मयीन अभिरुची निर्माण करणे, या अभिरुचीला वाङ्मयीन जडण-घडण करण्याचे फार मोठे सामर्थ्य वाङ्मय मंडळाच्या कार्यक्रमात असते. पण सर्वच महाविद्यालयांत हे कार्य घडताना दिसत नाही. त्यामागे वेगवेगळी कारणे आहेत. […]

अपयश ही अफलातून गोष्ट आहे

आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्यासाठी अपयशाचा अर्थ आजच्यापेक्षा वेगळा होता. जेव्हा तुम्ही सायकल चालवायला शिकत होता तेव्हा तुम्ही पडलात, बऱ्याचवेळा पडलात. कदाचित तुमचे गुडघे फुटले असतील, रडला असाल पण तुम्ही परत उठलात. पुन्हा पेडल मारायला सुरुवात केली आणि काही काळातच तुम्ही अशी सायकल चालवू लागता की जशी तुम्ही ती गोष्ट बऱ्याच आधीपासून करत आहात. […]

1 79 80 81 82 83 167
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..