महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शिवसेनेचे नेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वात जास्त चर्चेत आहे.एकनाथ शिंदे हे नाव जून २०२२ मध्ये झालेल्या राजकीय भूकंपाने महाराष्ट्रातच नव्हे तर देशात पोहोचलं. शिवसेनेत सर्वोच्च स्थानी मानल्या जाणाऱ्या मातोश्री आणि ठाकरे घराण्यालाच एकनाथ शिंदेंनी आव्हान दिलं. ४० आमदारांना सोबत घेऊन बंडाचं निशाण फडकावलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचलं. […]
