नवीन लेखन...

तब्बुचे ‘ते’ तीन रोल

नव्वदच्या दशकाच्या शेवटी एक मस्त हॉलीवूडपट आला होता. ‘What Women Want?’ नावाचा. पाहिलाय तुम्ही? हेलेन हंट…? मेल गिब्सन..? अरे..नाही पाहिला? नो प्रॉब्लेम..!! केदार शिंदेंचा ‘अगबाई अरेच्चा’ पाहिलाय ना? हां…येस्स.. तर, अगबाई अरेच्चा आणि What Women Want एकाच थिमवर होते. अर्थात कथा आणि ट्रिटमेंट पूर्ण वेगळी होती. दोन्हीत एकच विषय हाताळला होता.. ‘बायकांना आयुष्यात नक्की काय हवं […]

जगरहाटी

मी शांत बसलेला असताना मी एकटा असतो; स्वत:शीच जगापासून दूर… मी जगाचा तिरस्कार करतो हे जग स्वार्थी आहे, ढोंगी आहे भयानक क्रूर आहे, आपमतलबी आहे हे जग माझ्यासाठी नाही मी या जगाचा धि:कार करतो माझ्यापुढे ठाकलेला असतो आदर्शाचा हिमालय सुंदर, स्वच्छ, स्फटिकधवल दूरदूरुन मला खुणावत असतात विवेकानंद, राम नावाची त्या हिमालयाची उंच शिखरे शिवाजीच्या असामान्यतेची विविधरुपे […]

अस्तित्व

अस्तित्व तुझे सभोवार सर्वत्र तुझाच स्पर्शभास वात्सल्य तुझे लडिवाळ माते तुझाच अंतरी ध्यास….. तुझ्याच कुशीत स्वर्गसुख पान्हा, तुझा अमृती घास तव आशीष कवचकुंडले आठवे तुझे रूप निरागस….. सत्य! तुच जननी सृष्टिची निरपेक्ष तुझाच गे सहवास आज अंतरी अस्तिव तुझे मज सावरिते क्षणाक्षणास…. साक्षात, तुच गे देवदेवता तुझ्या, उदरी ईश्वरीय वास मातृत्व! एक ब्रह्म शुचिता लाभते जन्मी […]

दृष्टांत विवेकी

मनाचिया, शांत डोही पर्जन्यबिंदू, भावनांचे… स्वाती, नक्षत्रांत पड़ता मोती होती शब्दफुलांचे… गीतात मधुर प्रीतचांदणे निष्पाप स्पर्श भावनांचे… हितगुज अव्यक्त अबोल सहजी उमलते अंतरीचे… शब्दात गंधाळ भावनांचा जीवनी श्वास सारे सुखाचे… सभोवार तृप्तीचे कारंजे दृष्टांत, विवेकी चिंतनाचे… मनाचियाच, शांत डोही परिस्पर्ष सारेच धन्यतेचे… –वि.ग.सातपुते. (भावकवी) 9766544908 रचना क्र. २१९ २९/८/२०२२

मानसशास्त्रज्ञ तुकाराम

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये धनश्री लेले यांनी लिहिलेला हा लेख ‘ग्यानबा-तुकाराम’ या दोन शब्दांवर, मंत्रावर, वारकरी संप्रदायाची इमारत उभी आहे. महाराष्ट्र हा असा एकमेव प्रांत असेल, की जेथे देवाच्या आधी त्याच्या भक्तांचा जयघोष होतो. वारकऱ्यांच्या गळ्यातले दोन टाळ जणू ग्यानबा तुकाराम हा मंत्रच गात असतात. ज्ञानदेवांनी पाया रचला तर तुकाराम त्याचा कळस झाले. कोणत्याही […]

शरणपत्रे!

राजकारण्यांनी जेव्हापासून शिक्षकांना पदरी नोकरीला ठेवायला सुरुवात केली तेव्हापासून शिक्षकांनी शरणपत्रे लिहून द्यायला सुरुवात केली. पुराणकाळात सुरुवात झाली द्रोणाचार्यांपासून ! त्यांना धृतराष्ट्राने आपल्या पुत्रांसाठी – कौरव-पांडवांसाठी गुरु (शिक्षक) म्हणून नेमले. आणि मग द्रोणाचार्य कुरुक्षेत्राच्या युद्धात (कदाचित) मनाविरुद्ध ओढले गेले-राजनिष्ठेचे पालन म्हणून ! […]

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ६ – सावरकरांची कर्तव्यनिष्ठा

देशसेवेच व्रत सावरकरांनी वयाच्या १६व्या वर्षीच शपथेवर घेतले. त्यांची मीमांसा करताना ते सांगतात. ”चापेकरांचे कार्य पुढे कोणीतरी चालवायला हवे मग ते मी का चालवू नये? इतरानाही ते कार्य करावेसे वाटत असे पण काही कारणास्तव ते करू शकत नव्हते मग मीच ते का करू नये?” देशाचा झेंडा पुढे नेता यावा म्हणून क्रांतिकारकांच्या  मार्गातील काटे साफ करायला कुणी तरी सेपार्स एंड मायानर्स हवे असतात ते कार्य आपलेच समजून आम्ही पुढे सरसावलो” […]

माझे आजोळ – भाग १ – पणजोबांचे घर (आठवणींची मिसळ २९)

नशिबाची परीक्षा घ्यायला कोल्हापूरांत आले. ते धर्मशाळेत रहात असतांना योगायोगाने त्यांना शाहू महाराजांनी पाहिले. त्यांची चौकशी केली. पणजोबांनी आपण कुठून आलो, काय उद्देश आहे ते सांगितले. शाहू महाराजांनी त्यांना कोल्हापूरांत वकिली करायची परवानगी दिली. त्यांची वकिली उत्तम चालली. कोल्हापूरांत राजकृपा आणि लक्ष्मीकृपा दोन्ही त्यांना लाभली. शाहू महाराजांच्या घरांतील कोणत्याही समारंभासाठी काव्य करण्याचे काम पणजोबांकडे होते. ते शीघ्रकवी होते. नातेवाईक-मित्र यांच्याकडील विवाहासाठी मंगलाष्टकेही ते रचत. शाहू महाराजांचा सुधारणावादी दृष्टीकोन त्यांनी लगेचच स्विकारला आणि अंमलातही आणला. त्यांनी आपल्या घरीच सर्व जातीच्या लोकांसाठी सहभोजनं घालायला सुरूवात केली. भोजनाला दरबाऱ्यांनाही आमंत्रण असे. विसाव्या शतकाच्या सुरूवातीला ही गोष्ट तितकी सोपी नव्हती. पण शाहूमहाराजांच्या कोल्हापूरांत ती शक्य झाली. […]

नेस्ट रिटर्नड इंडियन्स

अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लड, आखाती देश अशा जगभरातील अनेक ठिकाणी भारतातील युवा पिढी स्थिरावत असल्याचं चित्र आजकाल सहास पाहावयास मिळतं. भारतात एखादी पदवी हस्तगत करुन उच्चशिक्षणासाठी परदेशी जाणं आणि नंतर तिथेच कामधंद्याच्या निमित्ताने स्थिरावणं हा जणू आजकालच्या युवापिढीचा शिरस्ताच बनून गेला आहे. मुंबई पुण्यातील जवळजवळ प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबातील कुणीतरी परदेशात असतं असं म्हंटल तर ती अतिशयोक्ती ठरणार […]

उलघाल अशाश्वताची

आज माणुस शोधून सापडत नाही सापडला तरी मानवता दिसत नाही सारं काही कृत्रिमतेनं नटलेले आहे निर्मल प्रेमभाव कुठे जाणवत नाही नाती, सुंदर हलक्या फुग्यासारखी कधी फुटतील त्याची शाश्वती नाही संस्कार ! फक्त स्वार्थासाठी जगावे भौतिक जगात नातेच राहिले नाही कलियुगी हात ओला तर मैतर भला दातृत्वी भावनां कुठेच उरली नाही संवाद केवळ आता फक्त व्यवहारी आत्मीयता, […]

1 3 4 5 6 7 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..