नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

एक परीस स्पर्श ( भाग – ४५ )

विजय आज कोणत्यातरी मालिकेचे प्रमो ! पाहत होता.  ज्यात एक नवरा आपल्याला हीच पत्नी सात जन्म मिळावी म्हणून वडाला प्रदक्षिणा घालताना दाखविला होता. तो प्रमो ! पाहून विजयला हसावं की रडावं तेच कळत नव्हतं कारण कालच विजय त्याच्या एका मित्राला त्याच्या कारखान्यात भेटायला ,. गेला होता… तो मित्र विवाहित आहे. त्याला एक मुलगी आणि एक मुलगाही  […]

स्मरणशक्ती आणि विस्मरणशक्ती (आठवणींची मिसळ १२)

“”ज्यात शंभर अब्ज मज्जा पेशी आहेत असा माणसाचा मेंदू म्हणजे जगातले सर्वांत विस्मयकारक, व्यामिश्र (गुंतागुंतीचे), समजण्यास गहनतम असे विद्युत्-रासायनिक यंत्र आहे. शब्द वा ध्वनीसंकेत यातून आपण घरातल्या अजाण बालकाच्या प्राथमिक स्मृती तयार करत असतो. त्याच स्मृतीच्या आधारे बालक आसपासच्या जगाचे अनुभव घेऊ लागते. त्यातुन आपल्या स्वत:च्या स्मृती तयार करून मेंदूला कार्यान्वित करू लागते. […]

उगाच काहीतरी – ५ (टिपिकल भारतीय गृहिणी)

टिपिकल भारतीय गृहिणी: ” अहो, तुम्हाला साधा चहा नीट करता येत नाही, चालले भाजी करायला. राहू द्या तुम्ही” ” तू राहू दे रे कार्ट्या, तू झाडू कमी मारशील आणि कचरा जास्त करशील. मलाच करावं लागेल” ” ताई, तू लादी पुसता पुसता दहा वेळा पडशील आणि कपडे धुणे तर राहूच दे जसेच्या तसे ठेवशील. मीच करते” ………आणि […]

भारतमातेच्या वीरांगना – ५४ – अक्कमा चेरियन

अक्कमा चेरीयन ह्यांनी राज्य कांग्रेसवर लागलेले सगळे प्रतिबंध रद्द करण्यासाठी थंपनूर ते कोडीयार महाला पर्यंत एका विशाल मोर्च्यांचे नेतृत्व केले ज्यात सगळ्यांनी खादी टोपी घातली होती. ब्रिटिश अधिकाऱ्यानी पोलिसांना मोरच्यावर गोळीबार करायला सांगितला, त्यावेळी अक्कमा चेरीयन ह्यांनी गर्जून सांगितले, ‘मी ह्या मोर्च्याची नेता आहे, गोळ्या झाडायच्याच असतील तर माझ्यापासून सुरवात करा.’ अक्कमा चे हे रूप पाहून पोलिसांनी आपले आदेश मागे घेतले. गांधींपर्यत त्रावणकोर ची वार्ता पोचली, त्यांनी अक्कमा चेरीयन ह्यांना ‘त्रावणकोर ची झाशी ची राणी’ अशी उपाधी दिली. १९३९ साली त्यांनी निषिद्ध आदेशांचे उल्लंघन केले अश्या आरोपाखाली ब्रिटिशांनी त्यांना कैद केले. […]

सूर गवसण्याचा आनंद

आपल्या घरात हार्मोनियम असावी अशी माझी खूप इच्छा होती. एक दिवस मी पेटी विकत घेतली आणि ती वाजवायला बसलो. याआधी मी कधीही पेटी वाजविली नव्हती. शुद्ध सूर कोणते, कोमल सूर कोणते, तीव्र सप्तक म्हणजे काय मला कशाचीही काहीही कल्पना नव्हती. मी उगाचच चाळा म्हणून पेटी वाजवत बसलो. बोटं फिरवता फिरवता पेटीतून सूर उमटू लागले. ते सूर […]

एका नव्या विश्वात: इंडियन आयडॉल

“अनिरुद्धजी, इंडियन आयडॉल सुरू होणार आहे. त्यांचा ‘कास्टिंग प्रोड्यूसर’ या पदासाठी शोध सुरू आहे. या संदर्भात मुलाखतीसाठी ताबडतोब अंधेरीला येऊ शकाल का?” “मी येतो. पण माझे नक्की काम काय असणार आहे ते समजू शकेल का?” मी विचारले. “सगळी माहिती तुम्हाला देते. तुम्ही लगेच अंधेरीला या.” माधवी उत्तरली. या मुलाखतीसाठी मी व्हिजक्राफ्ट या कंपनीच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. माझी […]

पांढरा शर्ट खाकी पँट

शैक्षणिक मुल्ये, संस्कार, निती , शैक्षणिक क्रांती हे सगळं पांढऱ्या शर्ट आणि खाकी पँट सारखं काळाच्या पडद्या आड जाऊ लागले आहे आणि ह्याला जबाबदार अशा शाळांचे चोचले पुरविणारी पांढरा शर्ट आणि खाकी पँट घालून शिकलेली तुमची आणि आमची पिढीच आहे. […]

एक परीस स्पर्श ( भाग – ४४ )

मे महिना संपला की सर्वाना वेद लागतात ते पावसाचे ! पाऊस हा कवींसाठी थोडा विशेषच असतो कारण प्रत्येक कवीने पावसावर एकतरी कविता लिहिलेली असतेच ! विजयने पावसावर आतापर्यत दहा- बारा कविता तरी लिहिल्या होत्या. त्यात त्याची सर्वात आवडती कविता होती तर पावसात भिजताना ! ज्या कवितेत प्रियकर आपल्या प्रेयसीसोबत पावसात भिजण्याची कल्पना करत असतो. विजयासाठी ही […]

सर्वाधिक उंचीवर ‘तुंगनाथ’

पावले तुंगनाथची वाट चालू लागतात. साधारण १ कि.मी. अंतर चालल्यावर वृक्षवल्ली आपल्याला एका सुरेख हिरव्या कुरणावर आणून सोडतात व आपला निरोप घेतात. अशा कुरणाला ‘बुग्याल’ असे म्हणतात. या पुढच्या प्रवासात मात्र कुठेही झाडे दिसत नाहीत. वातावरणात होणारा सुखद बदल स्पष्ट जाणवत असतो. समोर सोनेरी तेजाने झळकणारी पर्वतशिखरे उभी असतात. […]

लाघवी करस्पर्श (संक्षिप्त रूपांतरीत कथा – ४२)

मी तिचं नाव तेव्हा ऐकलंच नव्हतं पण माझ्या विचारांत ती मला लाघवी करस्पर्श म्हणूनच आठवते. किती जादू होती तिच्या हातांत! केवळ आश्चर्यकारक. कधी आणि कुठे, हे महत्त्वाच नाही पण केव्हा तरी एकदा मी माझ्या भ्रमंतीमधे एका विरळ लोकवस्तीच्या जिल्ह्यातून जात असतांना अचानक रात्र झाली. मी चालत जात होतो त्यामुळे आता ज्या गांवात मला पोहोचायचे होते, तिथे […]

1 102 103 104 105 106 489
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..