नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

भारतातील लोहमार्गाचे जनक नाना शंकरशेट

दि. १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणे या दरम्यान भारतातील पहिली रेल्वेगाडी धावली त्या घटनेना आता १७० वर्षे झाली. भारताच्या अर्थकारणात आणि नागरीकरणात अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडण्यात रेल्वेचा मोठा वाटा आहे. स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिश काळात भारतीय रेल्वेचा पाया रचण्यात नामदार नाना जगन्नाथ शंकरशेट हे अग्रेसर होते. त्यांच्या अफाट कार्याचा परिचय आजच्या पिढीला होणे आवश्यक आहे… […]

जनुकीय संरक्षण!

काही प्राणी उष्ण रक्ताचे असतात, तर काही प्राणी थंड रक्ताचे असतात. उष्ण रक्ताचे प्राणी आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित करू शकतात. त्यामुळे उष्ण रक्ताचे प्राणी तापमानातील बदलांना अधिक समर्थपणे तोंड देऊ शकतात. थंड रक्ताच्या प्राण्यांना मात्र शरीराचं तापमान नियंत्रित करता येत नसल्यानं, या थंड रक्ताच्या प्राण्यांची बदलत्या तापमानाला तोंड देण्याची क्षमता मर्यादित असते. […]

श्रीक्षेत्र नरसोबावाडी

श्रीनरसोबावाडी हे एक परमपावन सुंदर महाक्षेत्र आहे! कृष्णा व पंचगंगा ह्या दोन नद्यांच्या संगमामध्ये एक चौरस मैल क्षेत्रामध्ये बसलेले आहे. हे महाक्षेत्र कृष्णेच्या पश्चिम तीरावर विराजमान असून दोन्ही नद्यांच्या तीरांना हे शोभनीय आहे. कृष्णेच्या एक्कावन पायऱ्यांच्या भव्य घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षातळी सुंदर शीलामय मंदिर आहे. […]

सं. देवबाभळी – एक जिवंत अनुभव

पंढरीचे भूत मोठे , आल्या गेल्या झडपी लागे असं हे विठ्ठलनामाचं भूत, एकदा का मागे लागलं की त्यापासून सुटका नाही. अनेक संतांना या भुताने पछाडलं, त्यातलेच एक संत तुकाराम महाराज. त्यांची पत्नी आवली आणि लखूबाई म्हणजे रुख्मिणी या दोघींवरचं नाटक, सं.देवबाभळी. […]

गळाभेट

मंडळी हा जो फोटो दिसत आहे तो फोटो आहे ज्येष्ठ कवी गीतकार जगदीश खेबुडकर यांचा. इतका मोठा माणूस कोणाला ओळखणार नाही अशी ही महान वल्ली. साहित्य क्षेत्रामध्ये वावरत असताना मोठी माणसे भेटतात. त्यांचं वर्णन करणार अवघड होऊन जाते साहित्य कला कवी गीतकार ही नाती उत्तुंग अशी मोठी असतात. परंतु अशी मोठी माणसं फार थोड्या लोकांना भेटतात यापैकी हे जगदीश खेबुडकर होय. […]

फुलपाखरांचं मूळ

फुलपाखरं ही पृथ्वीवरच्या विविध ठिकाणच्या परिसंस्थांतील अत्यंत उपयुक्त घटक आहेत. वनस्पतींच्या प्रजोत्पादन क्रियेत त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. फुलांतील मकरंदाचं सेवन करताना, फुलपाखरं ही या फुलांचं परागीभवन घडवून आणतात. या परागीभवनाद्वारे वनस्पतींच्या पुढच्या पिढीच्या निर्मितीचा पहिला टप्पा गाठला जातो. त्यामुळे, वनस्पतिसृष्टीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या प्राणिसृष्टीतील घटकांचा जन्म केव्हा व कुठे झाला असावा, हे जाणून घेणं औत्सुक्याचं ठरतं. […]

सरकारी शाळा बंद का पडत आहेत?

भारत जगातील प्राचीन देशापैकी एक देश आहे.येथील संस्कृती ही प्राचीन आहे. भारतातील शिक्षण देणे घेणे ही प्रक्रियाही प्राचीन काळापासून निरंतरपणे चालू आहे.येथे गुरु शिष्यांची परंपरा प्राचीन अनादी काळापासून चालत आलेली आहे.प्राचीन काळातील शिक्षण हे विशिष्ट वर्गातील ,जातीतील लोकांनाच दिले जाई. शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध नव्हते. […]

माझी सायकल रामप्यारी

मी शाळेत असताना परभणीत ८०%प्रतिशत मध्यमवर्गीयांकडे दळणवळणासाठी सायकल हेच एकमेव वाहन वापरले जात होते. परभणीत त्यावेळी रस्त्यावर प्रदुषण नव्हते मोकळा श्वास घेता येत असे. […]

अत्तराचा फाया

खरंतर लहानपणीच्या खूपशा आठवणी प्रत्येकाला आयुष्यभर पुरतात . त्यात कसा आनंद घ्यायचा ? किंवा त्यातून काय शिकायचे ? हे प्रत्येकाच्या आपापल्या स्वभावावर अवलंबून असते .खूप साऱ्या खूप छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानता येतो .म्हणजे तुम्ही म्हणाल, ‘ हे अल्पसंतुष्ट आहेत काय ? आपल्याला आवडत नाही . […]

सायकल – एक आठवण

रविवारचा दिवस होता. मुलाची सायकल रिपेअरिंग ला घेऊन गेलो. दुकानामध्ये खूपच गर्दी होती. सर्वच्या सर्व सायकल लहान मुलांच्याच रिपेअरिंगला आलेल्या. मोठी सायकल रिपेअरिंगला दिसलीच नाही. लहान्यांच्याच सायकलींची गर्दी होती. वाट पाहण्या शिवाय दुसरा पर्याय नव्हता. […]

1 25 26 27 28 29 222
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..