रेखा नावाचे कधीच न संपणारे पर्व अधिकाधिक व्यवस्थित आणि वेगाने सुरू झाले. आजही ते सुरुच आहे. तिचे जुने चित्रपट आपले अस्तित्व टिकवून आहेत, त्यामुळे तिचा बराच काळ एकादा चित्रपट रिलीज झाला नाही तरी फारसं बिघडत नाही. […]
वाडीतून धूळ उडवत चाललेल्या एस.टी.बसच्या मागे धावण्यात एक वेगळीच मज्जा वाटायची.बालमनाला तो आनंद वाटायचा. आमचं अभेपुरी नजीक पाचपुतेवाडी गाव तसं डोंगराळ भागात वसलेलं, आमच्या अभेपुरी खोऱ्यातील शेवटचं गाव. त्यातच पावसाचं प्रमाण अधिक असल्याने चार महिने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने रस्ते, पूल वाहून जायचे. […]
शनी या ग्रहाचे आजपर्यंत जवळपास दीडशे चंद्र शोधले गेले आहेत. या दीडशे चंद्रांपैकी एन्सेलॅडस हा चंद्र आकाराने सहाव्या क्रमाकांचा ठरतो. सुमारे ३३ तासांत शनीभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करणारा, पाचशे किलोमीटर व्यासाचा हा चंद्र विल्यम हर्शलनं १७८९ साली शोधला. […]
महाभारत पाहणं हा लहानपणी हृद्य सोहळा असायचा… त्या वेळेत भूक लागली म्हणायची बिशाद नव्हती… आजी लोक सॉलिड बडवत. रस्त्यांवर शुकशुकाट सगळे tv समोर …साधारण अर्धा तास आधी प्रक्रिया सुरू व्हायची. घरावर भले मोठे अँटीना नावाचे विमानसदृश्य उपकरण असायचे….काका /दादा पैकी कुणाला तरी वर चढवून ते adjust करावे […]
शेतकरी बाप…चारही पोर जन्माला आली ती कळती होईस्तोवर त्यांचं दवा पाणी, जर कळती झाली दोघे चालली एक मराठी शाळेत तर एक अंगणवाडीत दुसऱ्या दोघांचं आहेच ते दवापाणी..असच निसर्गाशी झुंझत करत, दिवसामागून दिवस, अन वर्षामागून वर्षे हळूहळू उलटतात,न अखेर तो दिवस उजाडतो जेव्हा पदरात जगासाठी धनाची पेटी असणारी कदाचित त्या बापासाठी पण…ती धनाची पेटी म्हणजेच बापाची बेटी जेव्हा उपवरात येते तेव्हा नकळत बापाच्या काळजात चर्रर्रर्रर्र होतं.. इथपर्यंतच शक्य होत मी केलं आता इथून पुढे मी काय करू?? असा हतबल झालेल्या बापासमोर एक भलं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं. […]
आम्ही इंग्लिश मेडीयम करत चुका केल्या त्या चुकांवर चुका होता आहेत. त्या कधी थांबणार ? . विषय खूप गंभीर आहे. सर्वानीच गंभीर होऊन काहीतरी चांगला मार्ग काढायला हवा . […]
ओले आले नावाचा मराठी चित्रपट शुक्रवारी ५ जानेवारी २०२४ ला चित्रपट गृहात दाखल झाला. चित्रपटाचं नाव वाचून ते समजून घ्यायचा खूप प्रयत्न केला पण काही अर्थ लागे ना. मग ठरवलं जाऊयाच चित्रपट बघायला. अर्थातच चित्रपटाला गेल्यावर त्याच्या नावाचं वेगळेपण आणि त्या चित्रपटाचं वेगळेपण लक्षात आलं. […]
आपल्या हिंदू धर्मातील मंदिरे, मठ, तीर्थस्थाने याबद्दल अनेक दंतकथा, कथा, त्याबद्दलचे काही किस्से आपण ऐकतो. रत्नागिरी शहरापासून, पावस मार्गावर फक्त १२ कि.मी. अंतरावर, श्री संत गजानन महाराजांचे सुंदर मंदिर आहे. या मंदिराबद्दलही असेच काही आश्चर्यकारक व योगायोगाचे किस्से ऐकायला मिळतात. […]