नवीन लेखन...

माझी सायकल रामप्यारी

मी शाळेत असताना परभणीत ८०%प्रतिशत मध्यमवर्गीयांकडे दळणवळणासाठी सायकल हेच एकमेव वाहन वापरले जात होते. परभणीत त्यावेळी रस्त्यावर प्रदुषण नव्हते मोकळा श्वास घेता येत असे. नेमकीच बजाज कंपनीने स्कूटर बाजारात आणली होती.
(दूरदर्शन संचावर बजाज स्कूटरची “बुलंद भारत की बुलंद तसबीर हमारा बजाज ” ही जाहिरात दाखवली जात असे.)
तसं तर फक्त २०%प्रतिशत लोकांकडे राजदूत मोटारसायकल, स्कूटर, लूना होत्या.

तरी आम्ही शाळेत असताना सायकल घेणे एक स्वप्नच होते. वर्गातील एखाद्या मित्राने नवीन सायकल खरेदी केली की शाळेत उत्सवच साजरा व्हायचा. आम्ही सर्व मित्र सायकल बघण्यासाठी आनंदाने एकत्र यायचो. ज्याची सायकल असे तो त्यादिवशी शाळेचा राजाच असे. नविन सायकल खरेदी केल्याच्या आनंदात मित्र त्याच्याकडून चाॅकलेट घेत असत.

तो आमच्या सर्व मित्रांच्या घरी सायकल दाखवायला यायचा तो काळच खूप छान होता त्याकाळात ८० ते ९० च्या दशकात सायकल घेणे म्हणजे एक अप्रूप वाटायचे. आजच्या काळात तर विद्यार्थ्यांना दुचाकी वाहनाची सुविधा सहज उपलब्ध होते त्यामुळे त्यांना सायकल चालविणे कमीपणाचे वाटते.

 

Close up shot on male hands inside bicycle store while repairing the gearshift on rear wheel of a mountain bike.

मला आठवतंय १९८६ ते १९९५ या काळात परभणी नगर परिषदेकडून नागरिकांना सायकल चालविण्यासाठी (एप्रिल ते मार्च ) या आर्थिक वर्षाच्या कालावधीसाठी बिल्लाच्या स्वरुपात परवाना दिला जात असे. नगर परिषदेचे कर्मचारी गांधी पार्कात दिलीप सरदेशपांडे काकांच्या जनरल स्टोअर्सच्या दुकानाच्या बाजूला एप्रिल व मे हे दोन महिने बसायचे. त्या परवान्यांचे एक वर्षासाठीचे मूल्य २₹ होते. नागरिकांना रस्ता कर म्हणून २₹ची रितसर नावासहीत पावती भेटायची.

मला तर लहानपणी सायकल चालविण्यास खूपच भीती वाटायची. माझा वर्गमित्र युवराज वाडयासमोरच नारायण चाळीत वास्तव्यास होता. आम्ही पाचवी कक्षेत असताना त्याने कॅप्टन कंपनीची सायकल घेतली होती. तो मला सारखं म्हणायचा अरे दत्ता माझ्यासोबत क्रिडांगणात चल तुला सायकल शिकवितो .मी त्याला नकार देत असे.

माझे मित्र युवराज, विनय, गोदाजी,प्रकाश हे सर्वघरी आले की माझी आई म्हणायची अरे बाळांनो दत्ताला सायकल शिकवा रे खूपच भित्रा आहे. सायकल येत नाही याचे पुढे कसं होणार देवालाच माहित..

सानेगुरुजी लहान असताना त्यांना विहीरीत पोहायची भीती वाटत असे तसीच भीती मला सायकल चालविण्यास वाटायची. मलाही सानेगुरुजीसारखीच आई मिळाली हे माझं परमभाग्यच.आईने मला खूप समजावून सांगितले दत्ता तू खूपच भित्रा आहेस रे तुझ पुढे कसं होईल याचीच मला खूप चिंता आहे.तुझ्या सर्व वर्गमित्रांना व वर्गभगिनींना सायकल चालविता येते फक्त तूलाच येत नाही याचे मला खूप दुःख वाटते.

मी सहावी कक्षेत असताना आईने मला खूप समजावून सांगितले . माझा वर्गमित्र प्रकाशच्या वडिलांचे लक्ष्मीनारायण मंदिर स्टेशन रोडला सायकल टॅक्सीचे दुकान होते. त्यावेळी २५पैसे सायकलचे प्रतितास भाडे ते आकारत.आईने मला २५ पैसे देऊन सायकल आणायला पाठविले.

मी सायकल शिकण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यावेळी भितीपोटी व आत्मविश्वास कमी असल्यामुळे मी सायकल चालवायला अपयशी ठरलो.त्यानंतर मी तीन वर्षे सायकल शिकण्यासाठी प्रयत्न केलेच नाही.

नारायण चाळीतून आम्ही क्रांती चौकात लोहगावकर यांच्या वाड्यात वास्तव्यास आलो. मी नववी कक्षेत गेल्यावर आमच्या शेजारी कै.प्रल्हादकाका वास्तव्यास आले त्यांना सर्वजण पल्लुकाका म्हणायचे. पल्लुकाका उदेश्वर विद्यालयात प्रयोगशाळा सहाय्यक या पदावर कार्यरत होते. त्यांनी नुकतीच हरकिल्स कंपनीची सायकल खरेदी केली होती.

एकेदिवशी आई पल्लुकाकांना म्हणाली आमच्या दत्ताला सायकल चालविता येत नाही.तुम्ही शाळेतून आल्यावर त्याला तुमची सायकल चक्कर मारायला देत जा. पल्लुकाकांनी मला सतत दोन महिने सायकल दिली. प्रथमप्रथम सुभेदार गल्लीत मी सायकल घेऊन पायीच जात असे नंतर आठ दिवसांनी आईने केलेल्या उपदेशामुळे आत्मविश्वास आला .

काय आश्चर्य पंधरा दिवसांत सायकलची उंची कमी असल्यामुळे मी सायकल न पडता चालवायला शिकलो. सुभेदार गल्लीतून थेट क्रांती चौकात वर्दळीच्या रस्त्यावर मी सायकल चालवू लागलो ते फक्त प्रल्हादकाकांनी मला त्यांची सायकल दिल्यामुळेच. कै. प्रल्हादकाका देवमाणूसच होते.

सायकल येऊ लागली मला नविन उत्साह आला आकाश ठेंगणे वाटू लागले.घरच्या आर्थिक अडचणींमुळे नविन सायकल खरेदी करता येत नव्हती. नववी कक्षेची परीक्षा झाल्यानंतर प्राध्यापक श्री कनके सर संचलित ज्ञानगंगा कोचिंग क्लासेसमध्ये उन्हाळी शिकवणीसाठी डॉ. गणेश देशमुख सरांमुळे मला मोफत प्रवेश मिळाला. नवा मोंढा येथील आजेगांवकर काकांच्या जागेत ज्ञानगंगा कोचिंग क्लासेसचे शिकवणी वर्ग होते.क्रांती चौकातून मी शिकवणीला पायीच जात असे. शिकवणीचे दोन तास झाल्यावर पंधरा मिनिटाची मध्यांतर होत असे.

गजानन उमरेकर या मित्राकडे एटलसची सायकल होती या मध्यांतरात मी त्याची सायकल घेऊन नवा मोंढयात चक्कर मारायचो. गजानन मला दररोज न मागता त्याची सायकल दयायचा. बाल विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी व बारावी दोन वर्षे गजानन व मी वर्गमित्र होतो. आता गजानन उमरेकरची अधूनमधून भेट होती मग त्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.

बारावी कक्षेत गेल्यावर माझ्या मामाने ३० जुन १९९६ रोजी बीएस ए सायकल खरेदी करुन दिली. मामामुळे माझ्या सायकलचे स्वप्न साकार झाले. तुम्हाला खोटं वाटेल पण आजसुद्धा ही सायकल मला साथ देत आहे. बघताबघता चौवीस वर्षांचा काळ दोन तपे झाली.
मला माझ्या आयुष्यात सायकलने खूप साथ दिली.

१९९७ ते २०१०या काळात तर मी सात ते आठ तास किमान १८ ते २० कि.मी. सायकल चालवायचो. सहकार नगर, प्रभावती नगर ,जुना पेडगाव रोड, माळी गल्ली, शिवाजी नगर, वसमत रोड, खानापूर फाटा तसेच परभणीतील सर्वच चारी दिशांच्या रस्त्यांवरुन मी सायकल चालविली. सायकल चालविण्याचा छंद होता त्यासोबतच कष्ट करण्याची जिद्द चिकाटी त्यावेळी होती.

सायकल म्हणजे माझा जीव की प्राण आहे. सायकलविषयी लिहीतांना सहकार नगर येथील माझा मित्र बाळू स्वामीची आठवण प्रकार्षाने येते. मी १९९७ ते २००८ या काळात मी नवनीत वाचनालय सहकार नगर येथे कार्यरत होतो. बाळूचे ” स्वामी सायकल मार्ट”हे दुकान सहकार नगर येथे होते. जवळपास १५ वर्षे सायकलीची देखभाल दुरुस्ती या माझ्या मित्राने केली. त्यामुळे माझी सायकल आजही मला साथ देत आहे.

शासकीय आश्रमशाळा मूगट येथे २०१२ साली लिपिक या पदावर बाळू स्वामीची नियुक्ती झाली व त्याचे सायकल दुरुस्तीचे दुकान बंद झाले. आजही स्वामीचा फोन आला की पहिला प्रश्न हाच असतो की रामा काय म्हणते रामप्यारी..

( बाळूनेच सायकलचे नामकरण रामप्यारी केल होते) मगच आमचा संवाद सूरु होतो. सायकलविषयी लिहीताना मला रमेश देव यांचा दोस्त असावा तर असा हा चित्रपट आठवला. या चित्रपटात रमेश देव यांनी साकारलेली व्यक्तिरेखा मला खूप आवडते कारण हे चित्रपटातील पात्र माझ्या स्वभावाशी एकरुप आहे असं मला मनोमन वाटते.

या चित्रपटातील जे जे सुंदर ते माझे घर मी तर आहे मस्त कलंदर हे गीतही मला खूप आवडते. आजही मी सायकलवर त्रिधारेला दर्शनासाठी जातो. मित्र मला म्हणतात अरे दत्ता आता मस्त दुचाकी वाहन घे. मी मित्रांना म्हणतो–

पाहिजे ते कधीच मिळत नाही
अन मिळालेले कधीच पुरत नाही
म्हणून समाधानी राहायला शिका

कारण अपेक्षेने माणूस असमाधानी बनतो व मग मनसोक्त जगायचं राहून जात.. खरच मित्रांनो सायकल चालविणे हा एक व्यायामच आहे. सायकलमुळे शरीर निरोगी राहते. आजही मी महाविद्यालयात सायकलवर जातो मला कधीच कमीपणाचे वाटत नाही.
परभणीत मी सायकलवाले जोशी म्हणून प्रसिद्ध आहे.
*दुचाकीवर स्वार होउन जाता*.
*वाट गवसते मजला गावाची*
*नको मोठे शहर वाहन आता*..
*आहे सायकल माझी लाखाची*
सायकल चालविताना रस्त्यावर जसे चढ-उतार येतात तसेच आपल्या आयुष्यातही जगताना सुख-दु:ख येतात.
आपलाच
रामकृष्ण बळीराम जोशी
परभणी.
भ्रमणध्वनि नंबर:-९५२७४५४१८२

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 347 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..