नवीन लेखन...

फास्टफूडचे दुष्परिणाम (भाग १)

भरपूर कॅलरीजच्या जोडीला या पदार्थांमध्ये जास्त फास् प्रमाणात मीठ वापरले जाते. पदार्थ जास्त काळ टिकविण्यासाठी कृत्रिम असे प्रीझरवेटिव वापरले जातात. हे पदार्थ आकर्षक दिसावेत व चवीला चांगले लागावेत म्हणून त्यात कृत्रिम रंग व फ्लेवर वापरले जातात. जास्तीचे मीठ, रंग, फ्लेवर, प्रीझरवेटिव हे आपल्या शरीरासाठी योग्य नव्हे. असे पदार्थ थोड्या प्रमाणात जरी खाल्ले तरी त्यातून भरपूर प्रमाणात साखर, वनस्पती तूप, मैदा व मीठ पोटात जाते. शीत पेयांच्या एका कॅनमधून १० चमचे साखर आपण खातो; परंतु ते पिताना आपल्याला या गोष्टीची जाणीव होत नाही. या पदार्थांमध्ये तंतूमय पदार्थ (फायबर) फारच कमी असल्यामुळे आपले पोट फार काळ भरलेले राहात नाही व एवढ्या प्रचंड कॅलरीज घेऊनसुद्धा जेवल्यासारखे पोट भरत नाही. फूडचा सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे या पदार्थांमुळे रक्तातील साखरेची पातळी झटकन व प्रचंड प्रमाणात वाढते. ती आटोक्यात ठेवण्यासाठी स्वादुपिंडावर (पॅक्रियाजवर) जास्त इन्सुलीन तयार करण्यासाठी भार पडतो. या अतिरिक्त इन्सुलीनचे अनेक दुष्परिणाम शरीरावर होतात, ते असेः १) वाढलेली साखरेची पातळी झपाट्याने खाली येते व लगेचच खूप भूक लागते.

नुकतेच फास्टफूडमधून भरपूर कॅलरीज पोटात गेलेले असले तरीही ताबडतोब भूक लागून ती व्यक्ती आणखी पदार्थ खाते व वजन वाढते. २) जास्त प्रमाणात तयार झालेले इन्सुलीन, साखर व कॅलरीजचे रुपांतर झपाट्याने चरबीत किंवा मेदात करते. अशा तऱ्हेने शरीरात चरबी वाढून स्थूलपणा येतो. ३) नियमितपणे फास्टफूड खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी सतत वाढून, स्वादुपिंडावर पडणाऱ्या ताणामुळे डायबिटीस होण्याची शक्यता वाढते. फास्टफूडमुळे होणारे इतर दुष्परिणाम: १) कोणतेही फास्टफूड हे संतुलीत आहारात बसत नाहीत व त्यात पोषणमूल्ये शून्य असतात. म्हणूनच असे पदार्थ लहान मुलांच्या शारीरिक व बौद्धिक वाढीच्या दृष्टीने हानीकारक असतात.

२) फास्टफूडमध्ये प्रचंड प्रमाणात असलेली साखर व वनस्पती तूप यांच्या मिश्रणांमुळे अशा पदार्थांची एक प्रकारे सवयच लागते व अगदी थोड्या प्रमाणात खाऊन थांबणे शक्य होत नाही.

३) फास्टफूड खाऊन वजन वाढते व त्यामधील अतिरिक्त मीठ या दोन्ही कारणांमुळे उच्च रक्तदाब होण्याची शक्यता वाढते.

गीतांजली चितळे
मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..