किल्ल्यातील मुंबई ते किल्ल्याबाहेरील आधुनिक मुंबई

मुंबई शहराबद्दल बरंच काही लिहिलं-बोललं गेलेलं आहे. त्यात आता ही नवी भर कशाला असं वाटणं सहाजिकच आहे. मात्र या लेखात मुंबईच्या इतिहासाच्या काही महत्त्वाच्या टप्प्यांकडे नजर टाकण्याचा प्रयत्न केला आहे. शिलाहार राजवटीतील बिंब नावाच्या राजाने महिकावती (माहीम) शहर वसवले आणि तेथे किल्ला बांधून आपली राजधानी वसवली. त्याची कुटुंब देवता ‘प्रभादेवी’ ही होती असे म्हणतात. या राजाच्या […]

गोवा हिंदू असोसिएशन’ निर्मित ‘लेकुरे उदंड जाली’ ची पन्नाशी

३० ऑक्टोबर १९६६ रोजी दि गोवा हिंदू असोसिएशन’ निर्मित, वसंत कानेटकर लिखित व मो. ग. रांगणेकर दिग्दर्शित ‘लेकुरे  उदंड जाली’ या म्युझिकल  नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मुंबईच्या रवींद्र नाटय़ मंदिरात सादर झाला. या घटनेला ३० ऑक्टोबर रोजी पन्नास वर्षे पूर्ण झाली. मराठी रंगभूमीवरील या आगळ्या नाटकाला संगीत पं. जीतेंद्र अभिषेकी यांनी खूप उत्तम प्रकारे नाटकातील सर्व गाण्यांच्या चाली बांधल्या होत्या. ताल, सूर व शब्द सगळे कसे चपखल बसवले होते. या नाटकातील मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्रा या नाट्यप्रकारातल्या […]

सिद्धिविनायकचरणी २ कोटींचे हारतुरे..

दोन दिवसांपूर्वी व्हॉटसअॅपवरुन एक पोस्ट फिरत होती ती वाचनात आली. दिल्लीच्या कोणी भक्ताने म्हणे सिद्धिविनायकाला २ कोटींच्या फुलांनी मढवले होते. कारण काय.. तर त्याची इच्छा सिद्धिविनायकाने पूर्ण केली.. त्या पोस्टवर अनेक प्रतिक्रियासुद्धा आलेल्या वाचायला मिळाल्या. काही प्रतिक्रिया फारच बोलक्या पण तितक्याच कडवट होत्या. त्यातल्या काही खाली दिल्या आहेत. १. या फुलांपेक्षा ते २ कोटी गरिबांसाठी वापरले असते तर […]

मुंबईतील इतिहासप्रेमी राजभवन

श्रावण कृष्ण षष्ठी अर्थात २३ आॅगस्ट २०१६, वार मंगळवार. संध्याकाळी मला महाराष्ट्र राज्याचे घटनात्मक प्रमुख, म्हणजे माननीय राज्यपाल महाशयांच्या वाळकेश्वरातील ‘राजभवना’ला भेट देण्याची संधी मिळाली. निमित्त होतं राज्यपालांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री. उमेश काशिकर यांची आणि माझी आगाऊ ठरलेली भेट. माझे इतिहासप्रेमी स्नेही श्री. अनिल पाटील यांना सोबत घेतले आणि संध्याकाळी ४ वाजता राजभवनावर थडकलो. सर्व […]

माथेरानच्या राणीच्या निमित्ताने

मुंबई-पुण्याहून माथेरानला पर्यटनासाठी जाणार्‍यांना माथेरानच्या राणीने नेहमीच खुणावले आहे. गेली तब्बल १०९ वर्षे ही राणी दररोज अनेक प्रवाशांना आपल्या कुशीत घेउन माथेरानचा डोंगर चढत-उतरत आहे. दोन-सव्वादोन तासांच्या, २० किलोमीटरच्या प्रवासात गेल्या दोन वर्षात या राणीने जवळपास आठ लाख प्रवासांना माथेरानच्या निसर्गसौंदर्याचे दर्शन घडवले आहे. माथेरान हे ठिकाण पर्यावरणीय पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. या गावात प्रदूषण करणार्‍या […]

काळानुसार बदललेले ठाणे

मला कोणी विचारले की तुझे मुळ गाव कोणते तर सहजपणे माझ्या तोंडातून ठाण्याचेच नाव येते. खरंतर प्रधान कुटुंबीय मूळचे कोकणातले. मात्र आता कोकणात काहीही राहिले नाही. वाडवडिलांनी काही पिढ्यांपूर्वीच कोकण सोडून वेगवेगळ्या ठिकाणी आपले बस्तान बसवले. त्याचप्रमाणे माझ्याही कुटुंवाचे कोकणातून ठाण्याला स्थलांतर झाले मात्र तेही व्हाया गुजरात. माझा जन्म मुंबईतला. अगदी दादरच्या शिवाजी पार्कचा, कारण आजोळ […]

उपनगर नाही.. स्वतंत्र ओळख असलेलं डोंबिवली शहर

डोंबिवली हे शहर खूप पुरातन आहे असे म्हणतात. मात्र इतिहासात तसा डोंबिवली शहराचा फारसा उल्लेख सापडत नाही. इ. स. ८४३ मध्ये कोंकणचे राज्य शिलाहारास मिळाले. शिलाहारांनी पुढील ४५० वर्षे या प्रदेशावे सुखनैव राज्य केले. इ. स. १२६५ च्या सुमारास यादवांनी शिलाहार राजवटीचे उच्चाटन केले. अलाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर यादवांची सत्ता खिळखिळी झाली. त्यानंतर उदयास आलेल्या सुलतानांच्या अंकित […]

“सन डे” च्या सुटीची कहाणी…

आपल्याकडे सर्वसाधारणपणे रविवार हा सुट्टीचा दिवस मानला जातो. या दिवशी शाळा, कॉलेजेस, बॅंका, सरकारी कार्यालये वगैरे बंद असतात. बरीच खाजगी कार्यालयेही बंद असतात. सुट्टीचा दिवस “सन डे” म्हणजे रविवारच का असा प्रश्न कधी पडलाय? या सुटीचा इतिहास काय? ही सुटी कोणामुळे मिळाली ? कधीपासून सुरु झाली असे प्रश्न आपल्याला पडत असतील पण ते आपल्या रोजच्या कामाच्या […]

मराठीसाठी किमान एवढंतरी करुया…..

चला तर मग यापुढे आपण मराठीचा संगणकावर जास्तीत जास्त वापर करुया. मराठीतच इ-मेल लिहिण्याचा, पत्रव्यवहार करण्याचा आणि फेसबुकवरही मराठीत लिहिण्याचा संकल्प करुया. किमान दहा मेल्सपैकी एक आणि फेसबुकवरच्या दहा पोस्टपैकी एक एवढं तर आपल्या मायबोलीसाठी आपण करु शकतो ना?
[…]

संयुक्त महाराष्ट्राची दुर्दशा

१९६० साली यशवंतराव चव्हाणांनी संयुक्त महाराष्ट्राचा कलश दिल्लीहून आणला असे म्हणतात. त्यासाठी १०५ हुतात्म्यांना रक्त सांडावं लागलं. मोरारजी देसाईंसारख्या महाराष्ट्रद्वेष्ट्या माणसाने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अनेक विघ्नं आणण्याचा प्रयत्न केला होता. आजच्या पिढीतील अनेकांना हा इतिहास माहित नसेल. आज चित्र असं आहे की आपला हा संयुक्त महाराष्ट्र मराठी माणसाचा राहिला आहे की नाही याचीच शंका यावी. गेल्या […]

1 2 3