नवीन लेखन...

राज ठाकरेंनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र का केला ?

( माझ्या काही ज्येष्ठ शिवसैनिक, पत्रकार, वकील, राजकीय विश्लेषक व्यक्तींशी चर्चा केल्या नंतर आणि archives मधील बातम्यांनंतर मिळवलेली हि माहिती आपल्या समोर सादर करतोय…)


जुन्या मनसे आणि सेना कार्यकर्त्यांना ह्या गोष्टी माहित असतील, महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ पत्रकारांना देखील या माहित आहेत पण अनेक नवीन कार्यकर्त्याना माहित नसेल म्हणून हि माहीती, अनेकांना प्रश्न पडत असेल की नक्की साहेबांना असा काय त्रास दिला कि त्यांनी सेना सोडली…? त्यांनी सोडली नाही, तर त्यांनी सोडून जावं या साठीच “अनेकांनी” प्रयत्न केले.

ज्याची कुणकुण बाळासाहेबांना देखील लागलेली, जी त्यांनी “कोकण मेळावा,२००५” वेळी बोलून दाखवलेली.

१) सुरुवात झाली ९६-९८ पासून, नुकत्याच Michael Jackson आणि नंतर लता मंगेशकर यांचे दोन concert आयोजित करून राज ठाकरे यांनी आपले वेगळे कौशल्य दाखवले होते, पुढचे दोन महिने सर्व माध्यमांत राज ठाकरे या नावाची चर्चा होती, पण हे सेनेच्याच “काही” नेत्यांना रुचले नव्हते. त्याच वेळी सध्याच्या “पक्षप्रमुखांचा” राजकारणात प्रवेश झाला, आणि पहिल्याच मुंबई महापालिकेत जवळपास ३१ राज ठाकरे समर्थकांची तिकीट कापली गेली !

२) १९९९ ला मुंबईमधील अनेक शाखांचे अध्यक्ष तडकाफडकी बदलण्यात आले, अर्थात ते कोणाचे समर्थक होते सांगायला नकोच.. !

३) हे सर्व आतून चाललेलं राज ठाकरे यांनी ओळखलं होत ! आणि जर एका पदा साठी ही कारस्थानं चालली होती, त्यात राज यांनी स्वतः २००२ साली उद्धव यांना कार्याध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव सेना कार्यकारिणी पुढे ठेवला, जेणे करून ही कारस्थानं थांबतील.

४) परंतु २००४ ला विधानसभेला पुन्हा तोच प्रकार करण्यात आला, यावेळी मुंबईतच तब्बल ८ आणि राज्यभरात ४४ राज ठाकरे समर्थकांची तिकीट कापण्यात आली.

त्यांनतर झालेल्या महापालिकेत पुन्हा राज्यभरात ६४ समर्थकांची तिकीट कापण्यात आली, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुण्यातील मनसे चे २ टर्म नगरसेवक किशोर शिंदे ..! किशोर शिंदे विद्यार्थी चळवळी पासून कट्टर शिवसैनिक, पण त्यांचे तिकीट कापले कारण ते एक राज ठाकरे समर्थक होते अशी अनेक उदाहरहण आहेत.

५) हे कमी म्हणून का काय १४ जून २००४ ला राज ठाकरे यांच्या वाढदिवसाला देखील, उद्धव ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी बहिष्कार टाकला ! मुंबईतील केवळ राज ठाकरे समर्थक कार्यकर्ते कृष्णकुंज वर होते, आणि पदाधिकारी.

६) याचा कहर झाला तो मालवण पोटनिवडणुकीत ! राणे सोडून गेल्यानंतर मालवणात लागलेल्या पोटनिवडणुकीत, सेना नेत्यांच्या बैठकीत जाणून बुजून त्या निवडणुकीची सर्व यंत्रणा राज ठाकरे यांच्या कडे सोपवली.. राज आणि राणे यांचे चांगले संबंध माहीत असून सुध्दा त्यांना जबाबदारी देण्याचा हा सेनेचा देखील राज ठाकरे यांनी त्यावेळी मान्य केला.

७) याच पोटनिवडणुकीसाठी राज कार्यकर्ते आणि नेत्यांसोबत मालवणला रवाना झाले, त्यावेळी देखील उद्धव समर्थक मालवणात फिरकलेही नव्हते. सर्व जबाबदारी एकट्या राजवर सोपवण्यात आली होती. तेव्हा मालवणातील हॉटेल्स राणे आणि कार्यकर्त्यानी आधीच आरक्षित केल्याने, केवळ दोन हॉटेल मधे सेनेच्या नेत्यांना राहण्याची वेळ आली. यात भर म्हणून की काय, रामदास कदम यांनी “मी सगळ्यांसोबत एकाच रूममध्ये राहणार नाही ” हे सांगून निघाले, त्यावेळी राज ठाकरे यांनी मध्यस्थी करून त्यांना थांबवले.

८) अखेर गेली ७ वर्ष सुरु असलेली कोंडी फुटली, आणि राज ठाकरे निवडणूक सोडून कार्यकर्त्यांसोबत मुंबईत आले. त्याच्या दुसऱ्या दिवशी सामना मध्ये पहिल्यांदा खुद्द राज ठाकरे यांच्यावर टीका करणारा भला मोठा लेख “संपादकांकडून” छापण्यात आला.

१४ जून २००५ साली राज ठाकरे यांच्या वाढदिवसाला, मुंबईत स्वतः सेना कार्यकर्त्यानी राज ठाकरे यांच्या पोस्टर ला चप्पल आणि काळं फासून आंदोलन केलं,  “राज हटाव, सेना बचाव” अशा घोषणा दादर आणि गिरवागावात सेना कार्यकर्त्यांनी दिल्या.

यातच भर म्हणून राज ठाकरे यांना पुण्यात राज ठाकरे यांना भेटायची देखील शिवसैनिकांना बंदी घातली, पण अशात एकच शिवसेनेचा वाघ आदेश झुगारून राज ठाकरे याना पुण्यात भेटायला याचा, त्यांचं नाव मनसे चे नेते “दीपक पायगुडे”.

९) आणि शेवटी या सर्व त्रास आणि अन्यायाचा विस्फोट होऊन लाखो शिवसैनिकांसोबत, राज ठाकरे यांनी २००६ साली सेनेला जय महाराष्ट्र केला. त्यावेळी एकाही पत्रकाराने राज यांच्यावर टीका केली नाही, कारण त्यांना जो भयानक त्रास दिला तो सर्व जाणून होते, खुद्ध २०१२ साली IBN Lokmat ला दिलेल्या मुलाखतीत राज म्हणाले होते, ” देव करो आणि मी जे भोगलंय, ते माझ्या शत्रू च्या वाटेलासुद्धा येऊ नये..”

आमची मराठी अस्मिता आम्ही केंव्हाच हिंदी भाषिकांच्या पायदळी तुडवली आहे. हिंदी भाषिक आपल्याच महाराष्ट्रात राहून मराठीला जुमानत नाहीत..पण उलट आपणच हिंदी भाषेत हुशाऱ्या मारत हिंडतो..

आमचे सत्ताधारी उत्तर प्रदेश, बिहार दिन, गुजरात स्थापना दिवस साजरा करतात, मतांच्या लाचारीसाठी छट पूजेत भोजपुरी गाण्यांवर अश्लिलनृत्य करण्यात धन्यता मानतात आणि आपण मराठी माणसं असल्या लाचारांना मत देतो… त्यांना सत्तेत बसवतो.. कशाला…?? आपलीच मारून घ्यायला..

मा. श्री. राज साहेबांचा आज खरोखर अभिमान वाटतो. एवढे पराभव पत्करून देखील त्यांनी मराठी भाषेचा मुद्दा सोडला नाही..परप्रांतीय मतांसाठी ते कधीच लाचार झाले नाहीत. सत्तेच राजकारण कधीच केले नाही यालाच म्हणतात..स्वतःच्या मातृभाषेकरिता असलेली कट्टरता.. तळमळ.. जी इतर राज्यतल्या लोकांना समजली पण अजून मराठी माणसाला नाही हे महाराष्ट्राच दुर्दैव..!  काही दिवसांपूर्वी कर्नाटक मधून आमंत्रण ! काल आसाम मधून आमंत्रण..! बाहेरच्यांना राज ठाकरे कळाले.. महाराष्ट्राला कधी कळणार ..?

** हे स्वतः नक्की वाचा आणि प्रत्येक मनसैनिकाला आणि शिवसैनिकला पाठवा. ( मी लेखाच्या सुरुवातीला म्हणालो की मी माझे वैयक्तिक मत मांडतोय… मी इथे राज आणि मनसे पक्षाची बाजू घेत नाही आहे.

अलीकडे मी अविस्मरणीय “बाळासाहेब ठाकरे” एक तडपते मराठी व्यक्तिमत्व! हा लेख तसेच “राणे पॅटर्न आणि सिंधूदुर्ग विकास ” यांच्यावर लिखाण केलय..म्हणजे तुर्तास मी सेना किंवा राणे समर्थक झालो का…?? पण हो…आहे मी एक कट्टर शिवभक्त..! माझ्या शिवछत्रपती महाराजांना भजणारा… गुरूवर्य बाबासाहेब पुरंदरेचा आदर्श आणि follow करणारा…आपल्या इतिहासाबद्दल, गड-किल्ले, तीर्थक्षेत्र, मंदिरे यांची माहिती गोळा करणारा… स्वातंत्र्यवीरांबदल आपुलकीची भावना जपणारा…! प्रत्येकाचा जीवनातील राजकीय, सामाजिक, वैयक्तिक दृष्टीकोन आणि विचार वेगवेगळा असतो. माझा नेहमी एकच हेतू असतो की संवाद..भेद-मतभेद होतच राहणार…खोटे प्रचार, गैरसमज नसावेत..कुणाचं ही अंतस्करण दुखावण्याचा प्रयत्न नसावा …असो…!!

— गणेश कदम,
कुडाळ सिंधूदुर्ग

Avatar
About गणेश कदम 48 Articles
पुणे येथे वास्तव्य असलेले गणेश कदम हे विविध विषयांवर समाजमाध्यमांतून लिहित असतात. ते टेक महिंद्र या कंपनीत वरिष्ठ सल्लागार आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..