मराठीसाठी किमान एवढंतरी करुया…..

चला तर मग यापुढे आपण मराठीचा संगणकावर जास्तीत जास्त वापर करुया. मराठीतच इ-मेल लिहिण्याचा, पत्रव्यवहार करण्याचा आणि फेसबुकवरही मराठीत लिहिण्याचा संकल्प करुया. किमान दहा मेल्सपैकी एक आणि फेसबुकवरच्या दहा पोस्टपैकी एक एवढं तर आपल्या मायबोलीसाठी आपण करु शकतो ना?
[…]

संयुक्त महाराष्ट्राची दुर्दशा

१९६० साली यशवंतराव चव्हाणांनी संयुक्त महाराष्ट्राचा कलश दिल्लीहून आणला असे म्हणतात. त्यासाठी १०५ हुतात्म्यांना रक्त सांडावं लागलं. मोरारजी देसाईंसारख्या महाराष्ट्रद्वेष्ट्या माणसाने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अनेक विघ्नं आणण्याचा प्रयत्न केला होता. आजच्या पिढीतील अनेकांना हा इतिहास माहित नसेल. आज चित्र असं आहे की आपला हा संयुक्त महाराष्ट्र मराठी माणसाचा राहिला आहे की नाही याचीच शंका यावी. गेल्या […]

मराठीचा वापर न करणार्‍यांना दंडाची तरतूद

जानेवारी महिना सुरु झाला. आता लवकरंच मराठीचा उत्सव साजरा करणार्‍यांच्या उत्साहाला भरती येईल. जागतिक मराठी दिनाच्या निमित्ताने विविध घोषणा सुरु होतील. राजकीय भाषणंही होतील. दरवर्षी हेच चित्र दिसतं, वेगळ्या सजावटीत सजवलेलं. जागतिक मराठी दिन साजरा करताना मराठी भाषा बिचारी दीनवाणी होतेय याकडे आपण कधी बघणार? महाराष्ट्रातील आस्थापनांमधून मराठीचा वापर अनिवार्य करण्यासाठी अनेक कायदे आणि नियम बनवले […]

मराठी माणसाची संपर्क भाषा मराठीच हवी!

मराठीसृष्टीने नुकत्याच केलेल्या एका सर्व्हेचे निष्कर्ष आत्ताच आले आहेत. या सर्व्हेचा विषय होता मराठीतून इमेल आणि ऑनलाईन प्रतिक्रिया पाठविण्याविषयी. यात सहभागी झालेल्या व्यक्तींकडून आलेल्या माहितीतून दिसते की अजूनही ७७ टक्क्यांपेक्षा जास्त मराठी माणसे आपल्या आपापसातील संपर्काची भाषा म्हणून इंग्रजीचाच वापर करतात. […]

मुंबई ते कल्याण रेल्वेप्रवासाची नांदी

१८५४ मध्ये मुंबईजवळचा पारसिकचा डोंगर फोडून त्यातून बोगदा खोदून रेल्वे चालवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. नवीन लोहमार्ग टाकून झाल्यानंतर या लोहमार्गाची चाचणी करुन घेण्यासाठी १ मे १८५४ रोजी मुंबईचा गर्व्हनर लॉर्ड एलफिन्सटन याने २५० प्रतिष्ठित नागरिकांसमवेत आगगाडीतून कल्याणचा दौरा केला. त्यापूर्वी जेमतेम एक वर्षाआधी भारतातीलच नाही तर आशिया खंडातील पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ ला मुंबई – […]

काळाआड गेलेली लाकडाची खेळणी…!

महाराष्ट्रात कोकण जसा खाद्यपदार्थांसाठी जितका प्रसिद्ध आहे तितकाच लाकडी खेळणी निर्मितीसाठीही आहे. कोकणातील सावंतवाडी आणि रायगड जिल्ह्यातील पेण येथे ही लाकडी खेळणी तयार केली जातात. सावंतवाडी या शहरात लाकडी वस्तू खूप चांगल्या आणि वाजवी दरात मिळतात. पालकांनी लाकडी खेळण्यांना प्राधान्य दिल्यास देशात मुख्यत्वे महाराष्ट्रात तरी नवीन झाडे लावली जातील आणि पर्यावरणाचा तोल सांभाळा जाईल अशी आशा आहे. […]

मोबाईल लाईफस्टाईल

अतिशयोक्ती वाटेल… पण हे काही दिवसात प्रत्यक्ष बघायला मिळणार आहे…. आई स्वयंपाकघरात, बाबा हॉलमध्ये, मुलगा त्याच्या खोलीत, ताई कुठेतरी बाहेर, आजोबा-आजी त्यांच्या खोलीत. पण एकमेकांशी गप्पा मारताहेत. चक्क WhatsApp वरुन. प्रत्येक कुटुंबाचा एक स्वत:चा ग्रुप असेल. तसा बर्‍याच कुटुंबांनी आत्ताच बनवलाय. त्या ग्रुपवरुनच आई सांगेल… “चला जेवायला”. बाबा कदाचित चिंटूला विचारतील “अभ्यास झाला का रे बाबा?”. […]

आपल्या महाराष्ट्राची वैशिष्ट्यपूर्ण ओळख

आपण महाराष्ट्रात रहातो म्हणजे आपल्याला महाराष्ट्राची माहिती असणारच. पण सगळी माहिती खरोखर आहे का? तपासून बघा खाली दिलेली सगळी माहिती आपल्याला आहे का? स्थापना : ०१ मे १९६० राज्यभाषा – मराठी एकूण तालुके – ३५३ पंचायत समित्या – ३५१ एकूण जिल्हा परिषदा – ३३ आमदार विधानसभा – २८८ आमदार विधानपरीषद – ७८ महाराष्ट्र लोकसभा सदस्य – […]

छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई

मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या इमारतीला जागतिक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. १२५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या इमारतीचं नाव १९९६ मध्ये `छत्रपती शिवाजी टर्मिनस’ असं ठेवलं गेलं. मात्र दुर्दैवाची गोष्टी अशी की सगळीकडे संक्षिप्तनावे म्हणजेच Shrotform वापरण्याच्या सध्याच्या दिवसात या स्थानकाला `छशिट’ असं संबोधलं जावू लागलंय. […]

जगातल्या भाषा आणि मराठी – एक तुलना

इंग्रजी भाषा जगातील ५७ देशांत बोलली जाते. फ्रेंच ३३ देशांत, अरबी २३ देशांत, तर स्पॅनिश २१ देशांत बोलली जाते. या देशांमधल्या त्या अधिकृत भाषा तर नसणार म्हणजे केवळ बोली भाषाच. मग ५० देशांमध्ये बोलली जाणारी मराठी संपतेय कशी?
[…]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..