नवीन लेखन...

छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई

Chhatrapati Shivaji Terminus, Mumbai (CST)

छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई

मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या इमारतीला जागतिक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. २००४ मध्ये या इमारतीचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा लाभलेल्या स्थळांच्या यादीत करण्यात आला. ही इमारत १२५ वर्षांपूर्वी व्हिक्टोरियन गॉथिक स्टाईलमध्ये बांधली गेली. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त बांधण्यात आलेल्या या इमारतीचं नाव सहाजिकच ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’ ठेवलं गेलं. १९९६ मध्ये तिचं नामांतर होऊन `छत्रपती शिवाजी टर्मिनस’ असं भारतीय नाव ठेवलं गेलं. मात्र दुर्दैवाची गोष्टी अशी की सगळीकडे संक्षिप्तनावे म्हणजेच Shrotform वापरण्याच्या सध्याच्या दिवसात या स्थानकाला `छशिट’ असं संबोधलं जावू लागलंय.

१८७८ मध्ये या इमारतीचं बांधकाम सुरु झालं आणि ते १८८८ पर्यंत म्हणजे तब्बल दहा वर्ष सुरु होतं. त्या काळी या बांधकामाला १६ लाख रुपये खर्च आला होता. खरंतर ही किंमत त्याकाळी फार मोठी असेल, पण आजच्यासारखा भ्रष्टाचार त्यावेळी असता तर हाच खर्च ५० लाखावर गेला असताच की. नशीब आपलं की तेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं.

दररोज हजारो… लाखो मुंबईकर या इमारतीतून ये-जा करतात. मुंबईची जीवनरेखा म्हणजेच Lifeline मजली जाणार्‍या मध्य रेल्वेचं हे दक्षिणेकडील शेवटचे टोक. आपणही अनेकदा या इमारतीत गेला असाल. मात्र ही इमारत कशी आहे, तीची वैशिष्ट्ये काय, असे प्रश्न उपस्थित करायला आजच्या धावपळीच्या जीवनात वेळ आहे कोणाला? पुढच्या वेळी या स्थानकात गेलात की तिकिट काढता काढता फक्त मान वर करुन एक निरिक्षण करा. इथे आपल्याला दिसेल स्टार चेंबर. अनेक छान-सुंदर शिल्के, चित्रकला यांचा सुंदर संगम आपल्याला बघायला मिळेल. या इमारतीचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे इथली एकही वेलबुट्टीची नक्षी दुसर्‍यासारखी नाही.

ही इमारत अनेक सिनेमांमधूनही झळकली आहे. अनेक हिंदी सिनेमातला हिरो नोकरीधंदा शोधण्यासाठी मुंबईत येतो तोच मुळी या इमारतीतून. परदेशी पाहुण्यांच्या मुंबई भेटीत स्थलदर्शनामध्ये या इमारतीला भेट देणे हा एक महत्त्वाचा कार्यक्रम असतो.

सध्या या इमारतीत मध्य रेल्वेचे मुख्य कार्यालय आहे. मध्य रेल्वेचे ते कर्मचारी आणि अधिकारी किती भाग्यवान, ज्यांना एका जागतिक ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इमारतीत काम करण्याची संधी मिळते.

आपण भारतात रेल्वे आणण्याचं श्रेय ब्रिटिशांना देतो. मात्र त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे त्यावेळच्या रेल्वे कंपनीच्या १२ संचालकांमध्ये भारतीय माणसांचाही समावेश होता आणि विशेषतः एका मराठी मराठी माणसाचा समावेश होता, ते म्हणजे `नाना शंकरशेट उर्फ जगन्नाथ शंकरशेट’. नाना शंकरशेट यांचा मुंबईच्या विकासात आणि जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा होता. या सर्व संचालकांची चित्रंही या इमारतीवर कोरलेली आहेत. त्याचप्रमाणे त्याकाळी मुंबईत ज्या जातिधर्माचे लोक वास्तव्याला होते त्यांची प्रतिकात्मक चित्रंही इथं कोरलेली आहेत.

आयबीएन लोकमतच्या पत्रकार प्रियांका देसाई यांनी बनवलेला हा लघुचित्रपट पहा. आपल्याला नक्कीच या इमारतीला भेट देण्याची इच्छा होईल. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री मालेगावकर यांचं या लघुपटाच्या निर्मितीसाठी योगदान दिलं.

निनाद प्रधान
About निनाद प्रधान 96 Articles
मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..