नवीन लेखन...

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ३६)

साहित्यिक , विचारवंतांच्या सहवासातूनच योगायोगाने आमच्या महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे या संस्थेची शाखा मुंबई प्रदेश व ठाणे जिल्हा (महाराष्ट्र्) येथे माझे मित्र कविवर्य प्रा. जयंतराव भावे यांच्या अथक प्रयत्नातून सुरू झाली. ही आनंददायी घटना आहे. आज त्या संस्थेत सर्वच साहित्यिक सर्वस्वी. मा. कविवर्य जयंत भावे प्रमुख तर डॉ.योगेश जोशी उपप्रमुख तसेच डॉ. राज परब (अध्यक्ष) म्हणून तर सर्व साहित्यिक/ कवी सौ. गीता केदारे , सौ, आरती कुलकर्णी , ऍड. रुपेश पवार , विलास अधिकारी, डॉ. अंजुषा पाटील , अभय खोपकर , डॉ. ज्योती परब , हेमंत नेहते , सुनीता काटकर , सौ. जयमाला वाघ , सुरेश्वर शुक्ल , रमेश तारमाळे , ख.र.माळवे , बाळासो तोरस्कर , व डॉ. कविता विघे ही सर्व साहित्यिक मंडळी संस्थेची जबाबदारी सांभाळत आहेत.

साहित्य हे वैश्विक आहे. साऱ्या जगभरात मराठी भाषिक आहेत. सध्याच्या या फेसबुक / वाट्सअपच्या जमान्यात या वरील मित्रांचा सहज संपर्क संवाद होत आहे. अनेक मराठी लेखक/कवी आपल्याशी जोडले गेले आहेत.

महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कविवर्य मा.अरुण रोडे तसेच पुणे जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मा.चंद्रकांत महामुनी (मी त्यांना सीएम म्हणतो.) यांनी मध्यप्रदेश येथील ज्येष्ठ हिंदी /मराठी साहित्यिक मा. विश्वनाथजी शिरढोणकर यांचा पुण्यात सत्कार केला होता. त्यावेळी मी पुण्यात नव्हतो. पण श्री.चंद्रकांत महामुनी व शिरढोणकर यांची भेट माझ्या ऑफिसमध्ये झाली तेंव्हा आमच्या महाकवी कालिदासचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. महेंद्रजी ठाकुरदास सर तसेच पुण्यातील साहित्यिक / कवी मिलिंद सु. जोशी , डॉ.मधुसूदन घाणेकर , दीपक करंदीकर यांनाही मी बोलावले होते. आम्हा सर्वांचाच विश्वनाथजींशी खुपच छान परिचय झाला साहित्य विषयक चर्चाही झाली. नेहमीच्या माझ्या सवयी प्रमाणे आम्ही सर्व न्यू पूना बोर्डिंग मध्ये जेवण करून आनंदाने निरोप घेतला. या भेटीनंतर श्री. विश्वनाथजींचा व माझा सातत्याने ते इंदूरला जरी गेले तरी फोनवरून संपर्क , संवाद होत राहिला. आमचे मैत्र वृद्धिंगत होत राहिले. ही खुपच स्वागतार्ह गोष्ट होती. विश्वनाथजी शिरढोणकर हे ज्येष्ठ साहित्यिक असून त्यांची माझी लेखन सुरुवात ही १९६३ साली सुरुवात झाली एवढेच काय ते त्यांच्या , माझ्या मधले साम्य आहे. माझ्या पेक्षाही त्यांची ज्येष्टता ही अनुभवी विचारवंत अप्रतिम आहे. त्यांनी हिंदी ,मराठी भाषेत अनेक विषयांवर पुस्तके लिहिली आहेत. नवोदितांना व्यासपीठ देणं ही निर्मोही प्रवृत्ती हेच एकमेव आकर्षण त्यांच्या माझ्यात होतं. आपण मराठी आणि हिंदी साहित्यिक एकत्र यावे एवढेच नव्हे तर प्रत्येक भारतीय भाषेतील साहित्यिकांचा समन्वय असावा अशी एक कल्पना आमच्यामध्ये दोघा मध्ये रुजली आहे.

विवेकी विचार , निरीक्षण , वाचन , मनन , चिंतन , आणि प्रबोधनात्मक लेखन यांचा वसा जपावा सातत्याने लिहीत राहावे हा मानवाला अंतर्मुख करणारा एक निर्मळ मानवी संस्कार आहे. हे निश्चित.

अशा विचारातून २९ फेब्रुवारी २०२० रोजी पुणे मुंबई (महाराष्ट्र) व इंदूर भोपाळ (म.प्र.) इथल्या हिंदी , मराठी साहित्याकांचा एक साहित्यिक स्नेह मेळावा घ्यावा असा आमचा विचार झाला व तो कार्यक्रम यावर्षी मराठी साहित्य अकादमी भोपाळ मध्यप्रदेश व लिवा क्लब इंदूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्याचे निश्चित झाले.

इंदूर, भोपाळ, जबलपूर (मध्यप्रदेश) मधील साहित्यिकांची निवड ही विश्वनाथजी यांनी तर महाराष्टातील पुणे , मुंबईची जबाबदारी माझ्यावर असे ठरले. पुण्यातून आम्ही सर्व साहित्यिक /कवी / कवयीत्री सर्वश्री डॉ. ठाकुरदास सर, कृष्णकांतजी चेके , मिलिंद सु .जोशी , डॉ. मधुसूदन घाणेकर , दीपक करंदीकर , मंदाताई नाईक , ऍड.संध्या गोळे,ऍड.अनिता जाधव जयश्रीताई घुले , मीरा शिंदे , अश्विनी पिंगळे , निलीमा पंढरे. मुंबईहून प्रख्यात कवी मा. प्रा. डॉ.लक्ष्मण शिवणेकर सर या सर्व मंडळींचे जाणे एकमताने निश्चित झाले.

आम्ही सर्वजण इंदूर येथे पोहचलो. श्री. विश्वनाथजी शिरढोणकर आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांनी आमचं इंदूर स्टेशनवरच अगदी आत्मीयतेने स्वागत केले त्या क्षणीच आम्ही सर्वच भारावून गेलो. आमच्या महाकवी कालिदास प्रतिष्ठान या संस्थेतर्फे प्रत्येक कार्यक्रमाचे नियोजन अगदी रेखीव असे करत असलो तरी देखील या इंदूरकरांच्या कडून झालेल्या इंदुरी पाहुणचाराचा एक छान उत्तम अनुभव आला. आमच्या सर्वांची रहाण्याची जेवणाची व्यवस्था, तसेच आम्हा सर्वांच्यासाठी गाडीचीही बडदास्त उत्तम ठेवली होती.

२९ फेब्रुवारी २०२० रोजी या साहित्य संमेलन सोहळ्याचे उत्तम नियोजन इंदूर येथील प्रसिद्ध अशा मध्य भारत हिंदी साहित्य समितीच्या शिवाजी सभागृहात केले होते. ठरल्या प्रमाणे सर्व कार्यक्रम अगदी रेखीव , देखणे असे पार पडले. पुण्याहून आलेल्या सर्वच मान्यवर साहित्यिक हे परिसंवादात तसेच काव्यसंमेलनात सामील झाले होते.प्रत्येकाने उत्तम सादरीकरण केले. मध्यप्रदेशातून सर्व दिगग्ज मंडळी या कार्यक्रमास उपस्थित होती. सर्वश्री प्राध्यापक रमेश खांडेकर, (अध्यक्ष लिवा साहित्य सेवा समिति, आणि माजी अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य सभा, इंदूर.)

विनिताजी धर्म (भाजप च्या नगरसेवक आणि लेखिका), श्री .मदनजी बोबडे, कवि आणि सचिव असून मुक्त संवाद नाट्य संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. मा. विश्वनाथजी शिरधोणकर तसेच मा. मिलिंदजी महाजन, (सुमित्रा महाजन यांचे चिरंजीव असून बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली चे कार्याध्यक्ष आहेत. सौ पौर्णिमा हुंडीवाले (तत्कालीन निदेशक, (मराठी साहित्य अकादमी म.प्र शासन) होत्या. अश्विनजी खरे ( माजी निदेशक, म.प्र. मराठी साहित्य अकादमी) मनोहर निरखीवाले (अध्यक्ष, मराठी अकादमी इंदूर), पुरूषोत्तमत सप्रे ( सचिव, म.प्र. मराठी साहित्य संघ) भोपाळ. तसेच किर्तीश धामारीकर , राधिकाताई इंगळे , प्रदीप नवीन, संदीप राशनकर, श्रुति राशनकर ही सर्व मान्यवर मंडळी उपस्थित होती.

पुण्यातील आम्हा सर्व साहित्यिकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रम उत्तम पार पडला यथेच्छ भोजन झाले. रात्री आम्ही इंदूरच्या प्रसिद्ध सराफ बाजारचा आस्वाद घेतला. दुसरे दिवशी इंदूर मधील ख्यातनाम आर्टिस्ट मा. संदीप राशींकर यांनी त्यांच्या ‘आपले वाचनालय’ या संस्थेत माझी मुद्रण व प्रकाशन क्षेत्रासमोरील आव्हाने या विषयावर मुलाखत झाली. त्यांचा बंगला म्हणजे एक उत्तम म्युझियम आहे. त्यावेळी त्यांच्या मातोश्रींची तसेच पत्नीची भेट झाली. त्यावेळी माझा तसेच डॉ ठाकुरदास व जयंतराव देशपांडे यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. या सर्व घटनेचा वृत्तांत इंदूर , भोपाळ येथील सर्व वृत्तपत्रात छापून आला. हा इंदूरचा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला. असा साहित्यिक ,विचारवंताचा समृद्ध सहवास जीवनात सदानंद देत आहे. हे मात्र खरं!

इती लेखन सीमा.

(समाप्त)

वि.ग.सातपुते.

9766544908

Avatar
About विलास सातपुते 459 Articles
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..