नवीन लेखन...

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ८)

पुणे हे जसे विद्येचे माहेरघर आहे तसेच सांस्कृतिक , साहित्यिक , कलात्मक कार्यक्रमाची देखील दखल घेणारी अग्रणी पुण्यनगरी आहे .साहित्य कला संस्कृती या ठीकाणी सदैव फुलत असते . इथे विविध कार्यकमांची नित्य रेलचेल असते ..हेच वैशिष्ठ्य आहे. !!!

पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासनाचे अध्वर्यु व संत साहित्याचे गाढ़े अभ्यासक मा. डॉ. अशोक कामत सरांच्या गुरुकुल प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वार्षिक दैनंदिनी प्रकाशनाच्या समारंभाचे मला निमंत्रण आले होते . कार्यक्रम सदाशिव पेठेतील रहाळकरांच्या राम मंदिरात होता. कामत सरांच निमंत्रण ही माझ्या दृष्टीने मोठी गोष्ट होती .माझा व डॉ. अशोक कामत सरांचा प्रत्यक्ष भेटिचा हा पहिलाच प्रसंग होता .आम्ही एकमेकांना तसे ओळखत नव्हतो . तरी अगदी प्रसन्न वदनाने मंदिराच्या प्रवेशद्वारातच प्रत्यक्ष डॉ. अशोक कामत यांनी माझे स्वागत केले होते. मोठ्ठी माणसे ही खरच मोठ्ठी असतात याची जाणीव झाली.

कार्यक्रम सुरु झाला, अनेक मान्यवर माणसे आली होती. प्रकाशन झाले . आपल्या व्याख्यानात डॉ .अशोक कामत यांनी आपल्या मनोगतात अगदी सहजच ” भारतीय संस्कृती परंपरा ही संत विचारांनी जोपासली आहे ,परंतु सर्व संतांची चित्रे अजुन हवी तेवढी उपलब्ध नाहीत अशी एक खंत व्यक्त केली .
तेंव्हा त्यांचे व्याख्यान संपल्यावर मी माझे हाताचे बोट उंच करून ” सर मला २ मिनिटे बोलण्याची संधी द्याल कां ? ” अशी विनंती केली . सरांनी ती लगेच मान्यही केली देखील . आणि मला बोलण्याची संधी दिली.

माझ्या व्याख्यानात ” मी मुद्रक , प्रकाशक , पत्रकार , संपादक , साहित्यिक जरी असलो तरी एक हौशी चित्रकार आहे ( कमर्शियल आर्टिस्ट नाही ) . पण अगदी लहान पणापासुनच साताऱ्यातील प्रख्यात चित्रकार कै. गोवर्धन लकेरी यांच्या सहवासात राहिल्यामुळे थोडीफार चित्रकला शिकलो आहे . त्यामुळे व केवळ मातृप्रेमापोटी आणि तिने आजपर्यंत 18 वर्षे पायी सातारा पंढरपूर वारी केली असल्यामुळे आणि आता माझी आई वार्धक्यामुळे पंढरपुर वारीला जावू शकणार नाही म्हणून प्रथम तीला घरीच पांडुरंगाचे दर्शन व्हावे म्हणून ” *विश्वरूपी विठ्ठल* २’ x ३’ साइजमध्ये ओइलपेंट मद्धये पोर्ट्रेट काढले . सहाजिकच बऱ्याच लोकांनी ते पाहिले त्याची चर्च्याही खुप झाली . धायरीत कै. आप्पासाहेब सोनटक्के ( अध्यक्ष ) यांनी धारेश्वर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे मी काढलेल्या काही चित्रांचे प्रदर्शनही भरविले होते.

पुढे ग्राहक पुणे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेच्या संयुक्त विद्यमाने ” *ऋषीपंचमीच्या दिवशी* चे औचित्य साधून एक कार्यक्रम ” ” डॉ. मामासो.मोडक यांच्या अध्यक्षतेखाली व ग्राहकपेठ पुणे या संस्थेचे कै. बिंदुमाधव जोशी यांच्या उपस्थितीत आयोजित केला होता त्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक , कवी म्हणून माझा सत्कार केला गेला तेंव्हा संयोजकांनी माझा परिचय करून देताना *विग. सातपुते ( आप्पा ) हे नुसते कवी साहित्यिक नसुन संतचित्रकार ही आहेत त्यांनी ही संतांची तैल चित्र काढली आहेत* .असा उल्लेख केला. तेंव्हा त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ९२ वर्षाचे डॉ. मामासो मोडक यांनी मला जाहिर रित्या सांगीतले ” सातपुते ! तुम्ही ही चित्रे काढली आहेत पण विठ्ठलाची सर्वच लेकरेही काढा नां !
मला विट्ठलाची लेकरे म्हणजे काय कळले नाही .तेंव्हा डॉ. मोडक म्हणाले ” अहो विट्ठलाची लेकरे म्हणजे सर्व ,सकल संत !! ”

मला थोडेफार संत माहिती होते परंतु डॉ. मामा मोडक यांनी मला संतांचे 100 आयकार्ड साईज फोटो व त्यांची नावे माझ्या घरी आणून दिली होती. 92 वर्षांच्या डॉ. मामा मोडक यांचा हा उत्साह मला संतचित्रे काढण्याची प्रेरणा देवून गेला.

तेंव्हा पासून किमान १०० संतांची तैलचित्रे काढण्याचा मी संकल्प केला असून आजपर्यंत मी ५८ तैलचित्रे काढली आहेत आणि त्यांच्या काचेच्या फ्रेम्स मी करून माझ्या बंगल्यात संग्रहित करून ठेवल्या आहेत..!! हे या डॉ.कामत सरांच्या कार्यक्रमात आवर्जून सांगीतले ..कामत सरांनी या गोष्टीचे कौतुक केले …! आणी मी संतचित्रे काढत आहे हेही त्यांना त्यावेळी कळले .त्या कार्यक्रमात अनेक ज्येष्ठ मंडळी भेटली ,पुढे त्या सर्वांचाही दृढ़ परिचय झाला .डॉ. कामत सरांचे व माझे संबंध पुढे दुणावाले ..आम्ही वारंवार भेटु लागलो ..आजही त्यांचे आमच्या महाकवी कालीदास या संस्थेला मार्गर्शन मला लाभते आहे. अशी माणसे जीवनात येणं हाच दुग्धशर्करा योग !

आमच्या संस्थेचे डॉ. महेंद्र ठाकुरदास सर , कवी चं. गो. भालेराव , विजय हेर्लेकर , प्रा. गिरीश बक्षी आम्ही सरांच्या *गुरुकुल प्रतिष्ठान* संस्थेच्या वास्तूत अनेक वेळा भेटण्यास गेलो. त्यांची समृद्ध अशी पुस्तकांची लायब्ररी पाहून आम्ही थक्क झालो. पुढे गुरुकुल प्रतिष्ठान संस्थेच्या कार्यक्रमास अनेक वेळा जाण्याचा भेटण्याचा योग आला. डॉ. अशोक कामत समाजकार्य करणाऱ्या तसेच विधायक कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा आपल्या *गुरुकुल* या संस्थेतर्फे दरवर्षी जाहीर सत्कार करतात. ही गोष्ट अत्यन्त महत्वाची आहे.अशा व्यक्तींच्या भेटीने जीवन समृद्ध होते हे निर्विवाद .

© विगसा
9766544908

१९ – ११ – २०१८.

Avatar
About विलास सातपुते 459 Articles
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..