नवीन लेखन...

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १५)

माझा मुद्रण व प्रकाशनाचा व्यवसाय असल्यामुळे त्या निमित्त सर्व महाराष्ट्रभर सतत भ्रमंती असे. कामे संपल्यावर ज्या ज्या ठिकाणी जी जी माहिती असणारी प्रेक्षणीय ठिकाणे मंदिरे असत ती ती मी वेळ असेल त्याप्रमाणे प्रवासात जरूर पहात असे. प्रत्येक प्रवासात मी किमान एक पुस्तक किंवा एक छान गाण्याची कैसेट घेत असे कोडैक कंपनीचा छान कैमेरा होता फोटोही काढत असे. असे माझे छंद होते.

मला ड्रायव्हिंगची हौस ! ड्रायव्हर जरी असले तरी ड्रायव्हिंग माझा आवडता छंद असल्यामुळे , दिवसा ड्रायव्हिंग मी करणार . फक्त रात्रीच ड्रायव्हर गाड़ी चालविणार .रात्रीचे मस्त जेवण झाले की अगदी निवांत रात्री मी गाडीत पुस्तक वाचत असे. कधी अगदी निवांत गाणी तसेच गुलामअली व मेहंदी हसनच्या गझल ऐकत असे. झोप आली की गाडितच प्रवासात झोपत असे.

ज्या गावात जे कुणी प्रस्थापित किंवा नवोदित कवी ,लेखक असत त्यांनाही वेळात वेळ काढून आवर्जून भेटत असे..विचारांचे आदान प्रदान होत असे.साहित्य क्षेत्रातील नवीन नवीन व्यक्तीन्चा देखील परिचय होत असे.

कै. द.वी.केसकर सर तर गुरु . ते तर अगदी जवळ म्हणजे वाईलाच रहात असत. सातारा वाई २२ मैल . मी मनात आले , वेळ असेल तर लगेच त्यांना भेटावयास जात असे ..एकदा त्यांच्याच *चंद्रफुलांची गाणी* या स्वरचित गाण्यांचा कार्यक्रम कृष्णाबाईच्या उत्सवात होता . सातारहून मी व माझे दोन मित्र तर पुण्याहून आवर्जून माझे परम् स्नेही कविवर्य सुधाकरपंत देशपांडे , कवयित्री सौ.निर्मलाताई देशपांडे, संगीतकार कै. विलास आडकर , गायक श्री.श्रीपाद भावे व मंडळी , ज्येष्ठ भावगीत गायक कै.गजाननराव वाटवे इत्यादि मान्यवर मंडळी आली होती. खुपच छान कार्यक्रम झाला होता .या सर्वांचाच खुप जवळून सहवास लाभला ,पुढे सर्वांची छान मैत्रीही झाली . आम्ही भेटु लागलो .

आत्मरंग या माझ्या काव्य संग्रहातील काही गीतांना कै. विलास आडकर यांनी चाली लावल्या होत्या व, त्या मी व द.वी. केसकर सरांनी ऐकल्या होत्या. त्या गाण्यांची कैसेटही काढायची ठरले होते. त्याचे रेकॉर्डिंग शिवरंजनी स्टूडिओत करायचे हेही ठरले होते. परंतु दुर्दैवाने अचानक विलास आडकर यांचे हॄदयविकाराने निधन झाले आणी रेकॉर्डिंग थांबले. पुढे आत्मरंग या माझ्या काव्यसंग्रहातील १६ स्वरचित गीतांचा जाहिर कार्यक्रम पुण्यात संगीतकार श्री. रविन्द्र यादव यांनी सादर केला त्यावेळी साहित्य , संगीत , सामाजिक , राजकीय क्षेत्रातील बरीच मान्यवर मंडळी उपस्थित होती.(सर्वांची नावे लिहीणे अशक्य ) तो माझा खुप आनंदाचा क्षण होता. सर्वात महत्वाचे म्हणजे मला अगदी शून्य ( गरीबी ) अवस्थेतुन पाहिलेले माझे बालमित्र या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. मलाही माझा हा प्रवास अनपेक्षित , अघटित असाच वाटला होता..मी पूर्वीचे सारे दिवस विसरलो होतो. आता माझी एक स्वतंत्र म्हणजे एक यशस्वी उद्योजक , एक पत्रकार , प्रतिथयश साहित्यिक , संपादक , संतचित्रकार , व्याख्याता अशी ओळख झाली होती. मी एक सर्वसामान्य बूकबाइंडर , रूलर होतो याचा मला पूर्णत्वाने विसर पडला होता. परिस्थिती पूर्ण बदलली होती. माझ्या व्यवसायात आता नवीन अद्ययावत ऑटोमैटिक मशीनरी आणी सुमारे २०० कामगार काम करीत होते .

औद्योगिक क्षेत्र , पाठयपुस्तक मंडळाचे मोठे रात्रंदिवस चालणारे काम असे याबाबत मला एक प्रकारचा अहंपणा निर्माण झाला होता .
आत्मरंग या संगीताच्या कार्यक्रमात अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केली होती. सर्वांनीच माझी कौतुकास्पद स्तुती केली. मीही सुखावलो. पण माझे सारे सुविद्य बालमित्र जे होते त्यांच्या वतीने माझा मित्र एडवोकेट जयंत केंजळे यांनी प्रातिधिनिक भाषण केले…त्यात माझ्या बालपणापासुनच्या सत्य वास्तव दारुण परिस्थितिचे वर्णन केले .

तर माझा दूसरा मित्र ख्यातनाम बांधकाम व्यवसायिक अशोक गोडबोले यांनी तर मला त्या कार्यक्रमात एक अत्यंत सुंदर लेखी जाणीवपूर्वक पत्र दिले होते. त्याचे जाहिर भाषणही झाले. ते पत्र फारच महत्वाचे ठरले की माझ्या वास्तव आणी ऋणानुबंध या दोनही कथासंग्रहात मी प्रस्तावनेच्या आधीच छापले आहे . त्या पत्रात मी जे माझे अत्यंत कष्टप्रद जीवन विसरलो होतो आणी मला जो अहंकार झाला होता त्याची मला यथायोग्य प्रसंगासह आठवण करून दिली आणी क्षणात मी जमिनीवर आलो. हे एक सत्य ! असे हक्कानी कांन पिळणारे मित्र मला लाभले .!!! ते पत्र आजन्म माझ्या संग्रही आहे. असे मित्र लाभणं हेच महदभाग्य !!

कार्यक्रमात अचानक मला संगीतकार रवींद्र यादव यांनी अचानक ” आप्पा आता तुम्ही एक गीत सादर करा सांगीतले ! पूर्वी मेळ्यात काम केल्यामुळे मी एक जागर गीत सादरही केले ,त्यावर सर्व ज्येष्ठ मंडळी अगदी मोकळेणाने मुक्त थिरकली होती. त्यामध्ये माझे सर्व बालमित्रही होते..!! माझा अहंकार विलयास गेला होता ..याला कारणीभूत माझे परमबालमित्रच !!!!

या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक कै.डॉ.दभी कुलकर्णी सर ,डॉ. आनंद यादव सर , डॉ. न.म.जोशी सर, डॉ. विभा. देशपांडे सर,तर ज्येष्ठवृंद कै. म.श्री.दीक्षित सर होते….या सर्वांना माझी खरी ओळख झाली होती .

© विगसातपुते

(9766544908)

(पुणेमुक्कामी)

२६ – ११ – २०१८ .

Avatar
About विलास सातपुते 459 Articles
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..