नवीन लेखन...

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १७)

आजपर्यंत मी ज्येष्ठवृंद साहित्यिक गुरुवर्य आनंद यादव , अशोक कामत , दवी.केसकर , दभी कुलकर्णी , प्राचार्य बलवंत देशमुख, गुरुवर्य शांताबाईं शेळके , यशवंतजी देव , नंदूजी होनफ अशा काही व्यक्तिन्चे अनुभव कथन केले ..जीवनात साहित्य क्षेत्रात ज्यांचे मोलाचे मार्गदर्शक योगदान लाभले अशा अनेक व्यक्तिबद्दल खरे तर खुप लिहायचे आहे..

विशेष म्हणजे ख्यातनाम व्याख्याते कै. प्राचार्य शिवाजीराव भोसले हे साताऱ्यातील खटाव तालुक्यातील कलेढोण या गावचे. काय दैवयोग आहे पहा माझा , माझी आत्या कलेढोणची तिचे यजमान राजारामबापू इनामदार हे शिवाजीराव भोसले यांचे वर्गमित्र व शेजारी अगदी कौटुंबिक घरचे संबंध होते. मी लहानपणी कलेढोणला सुट्टीत जात असे महिनोन्महिने रहात असे. तेंव्हा सरांना तसेच त्यांच्या सर्वच कुटुंबाला पाहिले होते. कधी कधी ही सर्वच मंडळी सातारला आली की बापूंच्या सोबत आमचेकडे येत असत. प्राचार्य मलाही ओळखत होते. पुढे मीही शिक्षण संपल्यावर मुद्रण व्यवसायात आल्यानंतर फलटणच्या मुधोजी कॉलेजचे छपाईचे कामही करू लागलो. सरांची माझी गाठ पडू लागली.साताऱ्यात त्यांचे व्याख्यानाचे कार्यक्रम असले मी जरूर जात असे. त्यांचेही अनेक अनुभव आहेत . अत्यन्त मृदु , लाघवी स्वभावाचे , अत्यन्त अभ्यासू , एकपाठी असे व्यक्तिमत्व म्हणजे प्राचार्य शिवाजीराव भोसले मला लहानपणापासून आठवतात. अत्यन्त साधे रहाणीमान हे त्यांचे वैशिष्ठय होते .एक बोलतं चालतं विद्यापीठ होतं. त्यांचे शब्द फक्त ऐकत रहावे अशी त्यांची चिंतनीय वाणी होती. ते सर्वश्रुत होते. त्यांची अनेक व्याख्याने ऐकण्याचे भाग्य मला लाभले. माझ्या आठवणी त्यांच्याबद्दल स्वतंत्र लिहिणे योग्य ठरेल.

या भेटलेल्या प्रत्येक व्यक्तिच्या स्वभावाचा , लेखनाचा , काव्याचा एक विशिष्ठ बाज होता . प्रत्येकाची वेगळी खासियत होती. मला या सर्वांच्या विचारांची त्यांच्या सोबतच्या बैठकीत मेजवानी असे. या सर्वांच्या सोबत कधी , कसा , किती वेळ जात असे हे कळतच नसे. ज्येष्ठ शिक्षण तज्ञ गुरुवर्य मा. डॉ.न.म.जोशी . व्याख्याते ,लेखक प्राचार्य श्याम भुर्के व मी मुळ सातारचे त्यामुळे आमची विशेष जवळीक आहे .

महाकवी कालिदास प्रतिष्ठानची जेंव्हा स्थापना झाली तेंव्हा सर्वश्री डॉ.न.म., डॉ. दभी , डॉ. आनंद यादव , म.श्री.दीक्षित , डॉ. विभा..हे व्यासपीठावर होते. तेंव्हा त्या समारंभात कै. दभी. कुलकर्णी सरांनी उदघाटन प्रसंगी खुप सुंदर मार्गदर्शक विचार व्यक्त केले .आणी सरते शेवटी या धायरी वड़गाव पुणे विभागात भविष्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होईल असे भाकित केले . तर डॉ. न.म.जोशी सरांनी अत्यंत मूलभूत विचार मांडले ” की विग. तू आणी तुझे सहकारी यांनी या साहित्य संस्थेला महाकवी कालिदास हे नाव दिले त्याबद्दल प्रथम मी तुम्हा सर्वांचेच आभार मानतो . (आजकाल कुणाला कालीदास माहिती आहे ?. हे नम. सरांचे उद्गार ! आणी एक करा ही संस्था संस्थाच राहु द्या ! हीचे संस्थान करु नका !
बघा यात किती गर्भितार्थ आहे.अशा गुरुवर्य डॉ. नम.जोशी सरांचे आजही कालिदास संस्थेला मार्गदर्शन आहे .. आषाढ़स्य प्रथम दिवसे या दिवशी नम.जोशी सर आवर्जून कालीदास जयंती निमित्त स्वतःहुन उपस्थित असतात. हे आम्हा सर्वांचेच महदभाग्य ! .

कालिदास प्रतिष्ठान संस्थेत अशा मान्यवर साहित्यिकांचा असणारा मार्गदर्शक सहभाग हीच खुप मौल्यवान आणी भाग्याची घटना आहे ..! आजपर्यंत खुप दिग्गज साहित्यिकांची उपस्थिती व मार्गदर्शन महाकवी कालिदास प्रतिष्ठानला लाभले आहे.

खरे तर या अशा सहवासामुळे माझी अक्षरांची ओळख झाली आणी मी लिहूही लागलो …! लिहिरा झालो हे माझे नशिबच !! पण ही जशी खुप कनवाळू , मार्गदर्शक , दिग्गज मंडळी भेटली तशी मला साहित्य क्षेत्रात काही विक्षिप्त आणी संकुचित प्रवृत्तीची साहित्यिक मंडळी देखील भेटली हेही नाकारुन चालणार नाही . त्यांचा उल्लेख मी करणार नाही हे तितकेच खरे !

साहित्य सुसंस्कृत , वैचारिक , विवेकी माणुस घडविते ! असे म्हणतातच नव्हे तर ते अलिखित साक्षात सत्य आहे, पण अशा संकुचित प्रवृत्तीच्या प्रस्थापित साहित्यिकांची मला कीव आली हे मात्र खरे! पण साहित्यसंपदा ही वैश्विक असून , सरस्वतीची मंगल पूजा आहे. ती सात्विक श्रद्धेने आणी नम्रतेने केली पाहिजे असे जाणकार मान्यवरांचे मत आहे आणी महत्वाचे म्हणजे प्रस्थापित मान्यवर सहित्यिकांनी , कवींनी नवोदितांना अगदी मुक्त मार्गदर्शन करणे अत्यावश्यक आहे. नव्हे तर ते ज्येष्ठवृंद साहित्यिकांचे कर्तव्य आहे.नवोदितांनी देखील अजुन आपल्याला खुप शिकायचे आहे ही भावना मनात जपली पाहिजे.
एक चारोळी लिहिली की मी कवी झालो किंवा एखादा साधा निबंध लिहिला की मी लेखक झालो हा न्यूनगंड मनात बाळगु नये हे ही तितकेच खरे ….असो.

पण व्यक्ती तितक्या प्रकृती ! असेच म्हणावे लागते. कै. डॉ. दभी कुलकर्णी सर तर वाचस्पति तर होतेच पण शब्दप्रभु होते हा माझा स्वानुभव . त्यांच्या सोबत जेंव्हा जेंव्हा मी किंवा आम्ही मित्र मंडळी चर्चेसाठी बसत असू , तेंव्हा तेंव्हा आम्हाला नवनवीन शब्दान्ची माहिती होत असे . अनेक अनभिज्ञ शब्द समजत असत . अर्थ कळत असत . कै. दभी. सरांचे सारे मुखोदगत ! प्रचंड पाठांतर ! विषय कुठलाही असो त्यावर त्यांचा असणारा अभ्यास म्हणजे प्रभुत्व होते . त्यांचे कडून तसेच या सर्वच गुरुवर्या कडून खुप काही आम्हाला शिकावयास मिळाले .
ही जीवनातील एक विलक्षण जमेची बाजू !…

अगदी बालपणापासुनच या वैविध्यपूर्ण गोष्टी आत्मसात करण्याची संधी मला मिळाली याचे श्रेय जन्मदाते , सर्व गुरुवर्य , सर्व आप्त ,सर्व शेजारीपाजारी आणी मला सर्वार्थांने सांभाळणारे मित्र आणी त्यांच्यातील प्रेमळ मैत्रभाव हे सत्य !!!!

© वि.ग.सातपुते.

9766544908

२८ – ११ – २०१८ .

Avatar
About विलास सातपुते 459 Articles
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..