नवीन लेखन...

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २४)

कै. द.भी.कुलकर्णी सरांनी मला मानस पुत्र मानले होते. हा एकार्थी मोठा सन्मानच होता. त्यामुळे आमच्या परस्पर संबंधात एक वेगळं आत्मीयतेचं निखळ वातावरण निर्माण झालं होतं. साहित्य वर्तुळात याची मजेशीर चर्चाही होत असे. बहुतेक त्यांच्या सोबत मी कार्यक्रमाला असेच. दभी. सरांच्या मुळेच एकदा पुण्यात सिंहगड रोडला सुहासिनी मंगल कार्यालयात शिवसेनेने अध्यक्ष मा. उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसा दिवशी एक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. त्यात डॉ. गुरुवर्य दभी.सरांचे ज्ञानेश्वरी वर एक व्याख्यान ठेवले होते. पण त्या कार्यक्रमातील दर्जेदार अशा काव्यसंमेलनाचे सर्व नियोजन व त्या संमेलनाचे अध्यक्षपद गुरुवर्य दभींनीच मला दिले होते. हा त्यांच्या मनाचाच मोठेपणा होता हे निर्विवाद.

कार्यक्रम खुपच सुंदर आणी मोट्ठा झाला होता. पुण्यातील आणी पुणे बाहेरील सुमारे ७० ज्येष्ठ कवी व कवयित्री यांचे सुंदर काव्यसंमेलन त्यावेळी झाले होते. त्यामध्ये शिवसेनेतर्फे प्रत्येक कवीस रु. ५००/- चे बंद पाकिट तसेच मा.उध्दवजी ठाकरे यांचे एक सुंदर पंढरपुरची फोटोग्राफी असलेले पुस्तक, श्रीफल, गुच्छ व सन्मानपत्रक देवून सत्कारीत करण्यात आले होते. त्यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते माननिय भरतआबा कुंभारकर तसेच मा. संतोष गोपाळ यांनी खुप परिश्रम घेतले होते. पण हा अत्यंत देखणा कार्यक्रम झाला होता.

तसेच एकदा कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक यांच्याही पुस्तक पेटी वाचन समारंभाचा कार्यक्रम माझ्याच अध्यक्षतेखाली झाला होता. याचे कारण म्हणजे माझे कै. गुरुवर्य डॉ. द. भी. कुलकर्णी सर तसेच गुरुवर्य डॉ. न.म.जोशी सर अशा अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिकांशी घनिष्ठ संबंध होते हे सर्वश्रुत होते. लोक मलाही पत्रकार, संपादक, साहित्यिक, कवी, व्याख्याता, संतचित्रकार म्हणून ओळखु लागले होते हे मात्र मी नम्रतेने कबूल करतो आहे .

पुढे असे अनेक कार्यक्रम होत राहिले. होतही आहेत. हाच मला लाभलेल्या साहित्यिकांच्याच सहवासाचा एक आर्शीवाद होता. संस्कार होता!

अनेक साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक इत्यादि संस्थांच्या कार्यकारिणीवर मी आजही कार्यरत आहे याचा मला मनस्वी आनंद आहे. माझे वैयक्तिक काही साहित्य म्हणजे आजपर्यंत सुमारे १६ पुस्तके प्रकाशित झाली. त्या पुस्तकांना मान्यवरांच्या प्रस्तावना लाभल्या आहेत. त्यामध्ये गुरुवर्य कै. डॉ. दभींनी चार पुस्तकांना तसेच गुरुवर्य डॉ. नम.जोशी सरांनीही चार पुस्तकांना उत्तम प्रस्तावना दिल्या आहेत. अशा ज्येष्ठ प्रभृतींच्या प्रस्तावनेनंच पुस्तकांची उंची वाढली असे मी म्हणेन. मी इथे आज जो काही थोडाबहुत प्रसिद्ध आहे त्यामध्ये या सर्व गुरुस्थानी असलेल्या सर्व साहित्यिकांचे, कवींचे योगदान आहे असेच मी मानतो.

माझे संस्कार शिदोरी हे लेखन, संपादन व संकलन असलेले एक पुस्तक सुमारे ४०० पेजेसचे गुरुवर्य कै. डॉ. द. भी. कुलकर्णी सरांच्याच सुरेख मार्गदर्शनाखाली लिहिले गेले होते. त्याची पहिली आवृत्ती डॉ. दभी. कुलकर्णी सर आणि गुरुवर्य डॉ. नम.जोशी सरांच्याच हस्ते ३ वर्षापूर्वीच धायरी पुणे येथे महाकवी कालीदास जयंतीचे औचित्य साधुन प्रकाशित झाले. ती आवृत्ती संपली. तेंव्हा डॉ .दभी. सरांनी मला काही अजुन मजकूर त्यात भर घालून पुन्हा दूसरी आवृत्ती प्रकाशित कर असे सूचविले होते त्याप्रमाणे मी तो बदल केलाही आणि आज पुन्हा ते सुमारे ६०० पेजेसचे संस्कार शिदोरी पुस्तक (द्वितीय आवृत्ती) प्रकाशन होण्याच्या मार्गावर आहे. आणि त्या दुसऱ्या आवृत्तीला गुरुवर्य डॉ. नम. जोशी सरांचीच सुंदर प्रस्तावना लाभली आहे हाही दुग्धशर्करा योग आहे.

या साऱ्या घटना पहाता पूर्वायुष्य आठवले की बालपणी कीर्तनातील ऐकलेली काही पदे, भजने आठवितात

“गुरुविण कोण दाखवील वाट”

खरंच जीवनात गुरुंचे स्थान हे खुपच उच्च आहे! तिथे सदैव कृतज्ञ असावे असे म्हणतात.

गुरुवर्य डॉ. नम.जोशीसर आपल्या अनेक व्याख्यानात अनेक प्रबोधनात्मक कथा सांगत असतात. त्यात एका कथेत ते नेहमीच सर्वात कृतज्ञता हाच सर्वश्रेष्ठ सद्गुण आहे असे उद्घृत करतात.

म्हणूनच नवोदित साहित्यिकांनी नेहमीच वाचन करावे, इतर मान्यवर प्रस्थापित अशा सर्व साहित्यिक, कविवर्य यांचे साहित्य वाचावे, त्याचे चिंतन करावे, मनन करावे, लिहित रहावे, आपला अहंपणा, आपले मीत्व विसरून त्यांचेही वेळप्रसंगी मार्गदर्शन घेत रहावे. त्यातूनच आपली लेखणी ही समृद्ध, शुद्ध होत जाते असे मला वाटते.

(गुरुवर्य कै. डॉ.दभी. कुलकर्णी सरांनी माझ्याच भावगंध या काव्य संग्रहाला दिलेली एक मुक्त आणी परखड प्रतिक्रियात्मक प्रस्तावना वाचनीय आहे. नवोदितांनी ती जरूर वाचावी असे मला वाटते. ती पुढील २५ व्या भागात)

© विगसा

दिनांक :- ७ – १२ – २०१८.

Avatar
About विलास सातपुते 459 Articles
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..