नवीन लेखन...

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १९)

या सर्वच साहित्यिक गुरुवर्यांच्या सोबत अनेक वेळा सहवास घडला , कार्यक्रम झाले.एक दिवस दभी. कुलकर्णी सरांनी पुण्यातल्या सर्वच साहित्य संघांची एक समन्वय संस्था स्थापन करावी असा विचार मांडला. त्याची पहिली मिटिंग माझ्याच बंगल्यात झाली. त्यावेळी दभी , मी , ज्येष्ठ कवयित्री मंदाताई नाईक , ज्येष्ठ कवी कृष्णकांत चेके , डॉ. मधुसूदन घाणेकर , ऍड. संध्याताई गोळे , स्वाती सामक , गझलकार दीपक करंदीकर , कवी चं. गो. भालेराव अशी अनेक मंडळी या सर्वांच्या एकमताने साहित्य समन्वय महासंघाची स्थापना झाली. पुढे त्याची कार्याध्यक्ष म्हणून ऍड . प्रमोद आडकर यांचेकडे जबादारी सोपविण्यात आली व त्याचे उदघाटन ज्येष्ठ साहित्यिक कथालेखक ,साहित्यिक मा. द. मा मिरासदार सरांच्या हस्ते मराठी साहित्य परिषदेत करण्यात आले होते. द.मा. मिरासदार हे माझे मामा नामवंत पत्रकार लेखक , पुणे नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष कै. राजाभाऊ पाठक यांचे जवळचे मित्र होते. त्यामुळे माझ्या आजोळी सर्व घरच्या समारंभास नेहमी येत असत. असे ऋणानुबंध होते. त्यामुळे त्यांचाही मला सहवास लाभला. त्यांचे बहुतेक सर्व साहित्य मी वाचले आहे..एकदा सातारला गणपती उत्सवात बी अँड सी ( PWD ) च्या कथा कथनाच्या कार्यक्रमात सर्वश्री पं. भीमसेन जोशी , ग.दि. माडगूळकर , व्यंकटेश माडगूळकर , शंकर पाटील , दमा. मिरासदार हे चौघेही आलेले होते. तो कार्यक्रम आजही स्मरणात माझ्या आहे.साहित्य विश्वात प्रत्येकाचे एक विशिष्ठ स्थान होते विशिष्ट बाज होता. व आहेही हे निर्विवाद .

अनेक ठिकाणी संपादक म्हणूनही मी जबाबदारी स्विकारली होती. त्यामुळे अनेक कथालेखक , व्यंगचित्रकार , व्याख्याते , कवी , या लोकांचाही परिचय झाला होता .ज्येष्ठ ख्यातनाम चित्रकार वारंगे हे पौराणिक काल्पनिक चित्रे खुपच सुंदर काढीत असत. मीही हौशी चित्रकार असल्यामुळे त्यांचेही मला खुप मार्गदर्शन झाले , या प्रवासात खुप काही शिकलो …खुप माणसे जोडली हे मात्र खरे ..!

मुंबईतील प्रख्यात नोगी कंपनी माकड़छाप काळी टूथ पावडरचे मालक कै. प.सी.बोले व कै. ताराताई बोले होते..त्यांचा माझाही खुपच घनिष्ट संबन्ध होता की मी मुंबईला माझे वास्तव्य त्यांचेच बिल्डिंग मध्ये होते. त्यांचेही माझेवर पुत्रवत प्रेम होते. मोठ्ठी माणसे मनाने मोठ्ठी असतात हे जे मी गेल्या १६ व्या भागात बोललो ते एवढ्यासाठी…एक दिवस पाण्याचा काही प्रोब्लेम होता ,तेंव्हा माझ्या बाथरूम मद्धये पाणी आले नव्हते …पण अचानक सकाळीच स्वतः कै. प.सी. (पप्पा) बोले एक बादलीभर गरम पाणी आणी एक बादलीभर गार पाणी घेवून माझ्या फ्लैट मध्ये घेवून आले होते . एक अब्जाधिश व्यक्ती माझ्या सारख्या सामान्य माणसाला स्वतः आंघोळीसाठी पाणी आणून देते ..ही गोष्ट माझ्या दृष्टीने मला आत्ममुख करणारीच होती..या बोले दांपत्यांच्या सहवासात अनेक मोठ्या व्यक्तीन्चा माझा परिचय झाला .

मुंबईत मी स्थिरावलो होतो . त्यामुळे , कै. नंदूजी होनफ, कै. सुधीर फड़के , कै. सुरेश हळदणकर , कै ,यशवंतजी देव , पी. सावळाराम ,कै. मच्छीन्द्र कांबळी , कै . प्रकाश इनामदार , प्रकाश मयेकर , गणेश सोळंकी टिव्हीचे बातमी देणारे अनंत भावे , चारुशीला पटवर्धन ,आमची माती आमची माणसे चे मानसिंग पवार, शहाजी काळे तसेच नृत्यांगना माया जाधव, रिमा लागू , राजन ताह्माणे असे अनेक साहित्यिक , कलावंत , पत्रकारिता क्षेत्रातील माझे गुरुवर्य कै. माधव गडकरी अशा अनेक मान्यवरांचा सहवासही लाभला होता . या काळात अनेक अनुभवांनी जीवन समृद्ध झाले हे मात्र खरे.
विनम्रता आणी कृतज्ञता हे दोनही गुण माणसाला (मानवतेला) खुप समाधान देतात . ! मनातील आपपर भावाचे खंडन करतात ..आपल्याजवळ जे आहे ते निर्मोही ,निस्वार्थी तत्वाने देणे , जे ज्ञान आपल्या जवळ आहे ते सहज देणे , मार्गदर्शन करणे या गोष्टीनी एक सात्विक आनंद जीवनात प्राप्त होतो. हे जीवनाचे प्रगल्भतेचे आणी कृतार्थ तृप्ततेचे सूत्र मला या सहवासात उमजले हे मात्र खरे .!!!

जीवनात घडणारी प्रत्येक घटना आपल्याला निश्चितच काहीतरी शिकवित असते . आपण मात्र त्या घटनेतून शिकले पाहिजे .!! एकमेकांना , परस्परांना समजून उमजून घेणे हेच महत्वाचे त्यातून फक्त सुसंवाद घडतो ..! अशा सुसंवादातुनच एक गोष्ट ऐकण्यात आली ती अशी …..

एकदा स्वर्गामध्ये ब्रह्मदेवाने सर्व संस्कार सद्गुणांची सभा आपल्या महालात बोलावली होती . सर्व सद्गुण जमले होते. आता सभा सुरु होईल असे सर्वाना वाटत होते . पण ब्रह्मदेव काही सभा सुरु करेनात . ते आणखीन कुणाची तरी वाट पहात होते. तेंव्हा उपस्थित सर्व सद्गुणांनी ब्रह्मदेवांना विचारले ” अहो तुम्ही किती वेळ आणी कुणाची वाट पहाता आहात. आणी आम्ही किती वेळ वाट पहायची ? तेंव्हा ब्रह्मदेव म्हणाले एक पांच मिनिटे वाट पाहु , आणी आपली सभा सुरु करूया.. !! एवढ्यात क्षणार्धात एक अत्यंत साधी सावळी कृश अशी व्यक्ती ब्रह्मदेवाच्या सभागृहात प्रवेश करती झाली. त्या व्यक्तीचा प्रवेश होताच प्रत्यक्ष ब्रह्मदेव व्यासपीठावरुन स्वतः पायऊतार झाले.उशीर झाल्यामुळे ती व्यक्ती लगबगिने येवून मागेच बसली . पण ब्रह्मदेवांनी त्या व्यक्तीला हाताने धरुन पुढील रांगेत बसविले होते …सभा संपन्न झाली आणी नंतर मग सर्वांच्यात चर्च्या सुरु झाली की , ही सर्वात उशिरा आलेली अशी कुठली सद्गुणी व्यक्ती आहे ? की प्रत्यक्ष सृष्टिरचयिता ब्रह्मदेवही स्वतः पायउतार होवून अशा सद्गुणाचे स्वागत करत आहे ?…… तेंव्हा ब्रह्मदेवाने सांगीतले की “हे समस्त सद्गुणांनो तुम्ही सर्वच श्रेष्ठ सद्गुण आहातच ! परंतु ज्यांची मी वाट पहात होतो तो सद्गुण म्हणजे कृतज्ञता होता!!!!!

तेंव्हा मित्रहो आपल्या जीवनात योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबाबत आपण *कृतज्ञता* व्यक्त करणे ऋण व्यक्त करणे हा सर्वात मोट्ठा सद्गुण आहे. हाच सद्गुण मानवतेचे सुंदर स्वरूप आहे…! ही गोष्ट मी रोटरी क्लब प्राईम सिटी तर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त झालेल्या एका साहित्य सांस्कृतिक संमेलनात गुरुवर्य डॉ. नम.जोशी यांच्याच व्याख्यानातच ऐकली होती…मला भेटलेल्या सर्व साहित्यिकांच्या व्याख्यानातील , चर्चेतील अशा अनेक गोष्टी या सर्वार्थांने प्रबोधनात्मक तसेच मार्गदर्शक आणी माझ्या लिखाणाला पोषक ठरल्या आहेत. या सर्वांच्याच बाबतीत मी सदैव कृतज्ञ आहे .

© वि.ग.सातपुते.
9766544908

३० – ११ – २०१८.

Avatar
About विलास सातपुते 459 Articles
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..