नवीन लेखन...

वापरा आणि फेकून द्या

तुम्ही नवा मोबाईल विकत घेता तो किती वर्षे वापरता? नवा टीव्ही, गाडी, फ्रिज , लॅपटॉप , फूड प्रोसेसर, वॉशिंग मशिन विकत घेताना पुढे किती वर्षे ती गोष्ट आपण वापरणार आहोत याचा विचार टिपिकल मध्यमवर्गीय माणूस तर नक्कीच करतो. एके काळी, मोठ्या मुलाचे कपडे छोट्याला वापरायचे आणि नंतर त्यालाही तोकडे पडायला लागल्यावर त्याचे पायपुसणे नाहीतर भानशीरे ( या शब्दाची उत्पत्ती कुणास ठावूक असल्यास सांगावी!) बनवायचे आणि तेही पार फाटून वाट लागल्यावर काही नाही तर पाणी तापवण्याच्या चुलीत विस्तव पेटविण्यासाठी त्याचा उपयोग व्हायचा!

थोडे मागे जाऊन विचार केला तर असे आढळून येईल की या साऱ्या गोष्टींचे आयुष्य कमी कमी होत आहे. ‘वापरा आणि फेकून द्या’ तत्वावरच बनविलेल्या वस्तूंचे प्रस्थ वाढत चालले आहे किंबहुना उत्पादक या गोष्टी एकदा वापरून फेकून देण्यासाठीच असतात अशी विचारसरणी ग्राहकांच्या गळी उतरण्यात यशस्वी झाल्या आहेत.

मागे २०१७ ला एक मोबाईल कंपनी मुद्दामहून अपडेट द्वारे मोबाईल स्लो करण्याचा करतेय हे उघडकीस आले होते. नंतर कंपनीने सारवासारव केली की जुनी बॅटरी पुरेसा करंट देऊ शकत नाही आणि त्यामुळे त्यांचा फोन पुन्हा पुन्हा अचानक बंद पडून खराब होऊ नये म्हणून त्यांनी हे काम केले होते! या सर्व प्रकारासाठी कंपनीला दंड भरावा लागला होता.

मोबाईल, लॅपटॉप म्हटल्यावर त्यांचे आयुष्य जास्तीत जास्त ३ वर्षांचे असणार हे आपण गृहीत धरतो. ऑपरेटिंग सिस्टिम आणि अपग्रेड होणारे अँप्लिकेशन्स जुने हार्डवेअर सपोर्ट करू शकत नाही हे मान्य आहे, तरीसुद्धा हे प्रॉडक्ट्स डिझाईन करत असताना हार्डवेअर अपग्रेड ची सोय करून देणे करणे शक्य आहे असे एक एम्बेडेड सिस्टीम इंजिनिअर म्हणून मला वाटते. परंतु त्यामुळे त्या कंपनीचे अर्थकारण बिघडेल हा मोठ्ठा प्रॉब्लेम आहे. असे केल्यास दर तीन महिन्यांनी मार्केट मध्ये येणारे नवीन मॉडेल कोण खरेदी करणार हा मोठा प्रश्न असेल.

खरे तर हळू हळू “Use and Throw’ ही आपली वृत्तीच बनत चालली आहे. आजकाल दुरुस्त करून एखादी गोष्ट वापरण्याच्या फंदात कुणी पडत नाही आणि कुणी हट्टाने पेटून दुरुस्त करायला गेला तर एवढा भाव सांगितला जातो की त्यापेक्षा ती वस्तू नवीन विकत घेणे सोयीस्कर ठरते. काही वर्षांपूर्वी मी केरळ मध्ये असताना माझ्या गाडीचा वायपर बिघडला. मी गॅरेज मध्ये घेऊन गेल्यावर त्या मेकॅनिक ने वायपरची जी मोटर असेंम्बली असते त्यातील गिअर मोडले आहेत म्हणून सांगितले. हाच प्रॉब्लेम मला मुंबईत आला असता तर पूर्ण असेंम्बली नवीन घालायला लागली असती पण त्या केरळ मधल्या मेकॅनिक ने पूर्ण असेंम्बली खोलून त्यातला गिअर बदलला आणि वायपर दुरुस्त करून दिला! त्यानंतर त्या वायपर ने बरीच वर्षे काही त्रास दिला नाही. प्रश्न नुसत्या पैशाचा नाही पण या ‘वापरा आणि फेकून द्या’ वृत्ती मुळे कार्बन फुटप्रिंट किती वाढली जातेय याचा विचार उत्पादकांनी जरूर करावा. खरंतर या साऱ्या गोष्टीशी सध्या कुणाला देणे घेणे नाही. प्रत्येक कंपनीची आणि पर्यायी देशाची एकमेकांशी स्पर्धा आहे जास्तीत जास्त मार्केट काबीज करण्याची.

बरे, या सगळ्याचा विचार डोक्यात का आला? माझ्याकडे Wonderchef कंपनीचा जवळ जवळ तीन वर्षे जुना Nutri Blend ब्लेंडर होता. त्यातला एक जार हा एका वर्षात लीक व्हायला लागला तर दुसऱ्या जार चे ब्लेड्स गेल्या महिन्यात तुटले! कंपनी मला माझ्याकडे असलेल्या मॉडेल चे ब्लेड किंवा पूर्ण जार उपलब्ध करून देऊ शकत नाही आहे. याचा अर्थ मी साडेतीन हजाराचा ब्लेंडर त्याची मोटर व्यवस्थित चालू असताना फेकून द्यायचा ते फक्त त्याचे शंभर दोनशे रुपयाचे ब्लेड नाही म्हणून! बरे, मिक्सर सारखे वेगळे करता येणारे ब्लेड असणारे डिझाईन असते तर जसे कुठल्याही इतर घरगुती उपकरणांचे दुसऱ्या कंपनींनी बनवलेले पार्टस उपलब्ध असतात तसे कुठे ना कुठे ते ब्लेड उपलब्ध झाले असते.

त्यामुळे सध्या तरी, या ब्लेंडर मध्ये smoothie वगैरे बनविणे शक्य नसल्याने त्याचा उपयोग कसा करायचा यावर गहन विचार सुरू आहे! जार चा उपयोग कोथींबीर ठेवायला होऊ शकतो असे तूर्तास लक्षात आले आहे! मोटर असलेला त्याच्या खालच्या भागाचा उपयोग मी कसा करू शकतो ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा!!

Avatar
About श्रीस्वासम 15 Articles
अभियांत्रिकी शिक्षणाच्या आणि करिअर मार्गदर्शनाच्या क्षेत्रात गेल्या एकवीस वर्षांपासून कार्यरत. विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी विविध अभ्यासक्रमांची आखणी व अभियांत्रिकीशी संबंधीत दोन पुस्तकांचे लेखन. शालेय जीवनापासून मराठी साहित्यामध्ये विशेष रुची. कविता, प्रवासवर्णन, द्वीपदी, आठवणी यांच्या माध्यमातून होणारे मराठी लेखन हे मुख्यत्वेकरून जीवनानुभवांवर आधारीत.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..