नवीन लेखन...

जगलिंग, जगलर्स,आणि शॅडो प्ले (बालरंगभूमी माझ्या नजरेतून – भाग ९)

माझ्या लहानपणी घराघरात मेणबत्ती असायच्या. अनेकदा लाईट जायचे. मग मेणबत्त्या लागायच्या. टीव्ही नसल्यामुळे वेळ जावा म्हणून मोठी माणसे आम्हा मुलांना मेणबत्त्या समोर सावल्यांचे खेळ करून दाखवायचे. आम्ही मुले त्या सावल्यांच्या खेळात मस्त रमायचो. मग दुसऱ्या दिवशी शाळेत मुलांना उन्हामध्ये सूर्याच्या प्रकाशात हातांच्या बोटांच्या कसरती करून ते सावल्यांचे खेळ करून दाखवायचो. आम्हा मुलांचे मनोरंजनाचे ते साधन होते. सावल्यांचे खेळ अर्थात “शॅडो प्ले” असे या मनोरंजक खेळाला म्हणतात हे मला मोठे झाल्यावर कळले.

शॅडो प्ले- आजही मुलांना आवडतात. सावल्यांचा खेळ आजही मुलांना करून बघायला आवडतात. कारण, सर्व मुलांना सावली विषयी अपार कुतुहूल आणि आकर्षण असतं. मुलांच्या आणि मोठ्यांच्या याच आकर्षणातून परदेशामध्ये शॅडो प्ले थिएटर नावाची संकल्पना चांगलीच विकसित झालेली आहे.तिथे याला रंगभूमीचाच एक वेगळा प्रकार मानतात आणि ह्या थिएटर ची जोपासना करतात.

भारतामध्ये शॅडो प्ले थिएटर ला वाव आहे. पण हाताच्या बोटावर मोजण्या इतके मंडळी असे सावल्यांचे खेळ करतात. ठाण्यामध्ये श्री धामणकर गेली अनेक वर्ष असे सावल्यांचे खेळ मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी करताना मी बघितले आहे. त्यांच्या खेळाचे नावच आहे “हा खेळ सावल्यांचा”. परदेशामध्ये शॅडो प्ले थिएटर साठी बऱ्याच वेगवेगळ्या कथा,परिकथा सावल्यांचा माध्यमातून सादर करण्याचा दाखवण्याचा प्रयत्न तेथील संस्था करत असतात. या खेळात कल्पना शक्तीला प्रचंड वाव आहे तसेच कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते. खेळांचा खर्च प्रचंड असतो. आधुनिक तंत्र आणि मंत्र वापरून परदेशात शॅडोप्ले चे प्रेक्षणीय कार्यक्रम होत असतात.भारतात,बालनाट्य संस्था कडून असे प्रयोग होणे अपेक्षित आहे.

जगलिंग म्हणजे हातचलाखीचे ,कसरतीचे ,खेळ. हे खेळ प्रेक्षकांसमोर सादर करणाऱ्या कलाकाराला जगलर्स असे म्हणतात. हे जगलर्स एकाच वेळी अनेक चेंडू किंवा टोप्या किंवा इतर वस्तू हवेत उडवतात आणि लीलया झेलून दाखवत असतात. माझ्या लहानपणी हे उडवाउडवीचे खेळ मी सर्कशीत पाहिले होते. आज मुलांच्या बर्थ डे पार्टीत असे हे उडवा उडवी चे खेळ करणारे जगलर्स सर्रास दिसतात. मुलांना जादूगार प्रमाणे हे असे जगलर्स प्रचंड आवडतात.

बालरंगभूमी ची संकल्पना जेव्हा आपण विचारात घेतो तेव्हा शॅडो प्ले आणि जगलिंग या दोन्ही कलांचा आणि खेळांचा समावेश आपल्याला बालरंगभूमी मध्ये करावा लागतो. मुलांचे मनोरंजन या दोन्ही कला करत असल्यामुळे बालनाट्य प्रमाणे यांचाही समावेश बालरंगभूमी च्या संकल्पनेत करणे मला आवश्यक वाटते.

— राजू तुलालवार.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..