नवीन लेखन...

बालरंगभूमी माझ्या नजरेतून- (भाग १-प्रस्तावना)

लेखक – राजू तुलालवार 

१९७९ साली पहीलं बालनाट्य लिहीलं तेंव्हापासून बालरंगभूमीशी माझं नात जुळलं. रंगदेवतेच्या कृपेने गेली ४१ वर्षे बालरंगभूमी वर कार्यरत राहून बाल मनोरंजनाचे कार्य करत आहे. बालरंगभूमीच्या सहवासात चार दशके राहील्यावर मला जे दिसलं, जाणवलं, ते माझ्या शब्दातुन मांडण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या या लेखनाचा हेतु हा आहे की, बालरंग भूमीवर कार्यरत रंगकर्मी, बालनाट्य अभ्यासक, नाटय समिक्षक, नाट्य शिक्षक, पालक व बालक यांची बालरंगभूमी कडे बघण्याची दृष्टी आधिक सुस्पष्ट व्हावी आणी बालरंगभूमी चे कार्य आणि महत्व किती विशाल आहे याची सर्व संबंधितांना कल्पना यावी.

बालरंगभूमी म्हणजे काय?

मी, बालरंगभूमी ची केलेली व्याख्या अशी… “बालक आपली कला सादर करतात तो मंच आणि बालकांच्या रंजनासाठी विविध कलाप्रकारांकडून उपयोगात येणारा मंच… म्हणजेच बालरंगभूमी.” बालरंगभूमीची ही व्याख्या मान्य केल्यानंतर ‘बालनाट्य’ म्हणजेच ‘बालरंगभूमी’ असे मानणे योग्य ठरणार नाही.बालनाट्य हा बालरंगभूमीचा महत्त्वाचा घटक, परंतु बालनाट्यप्रमाणेच बाल संगीत (गायन आणी वादन), बालनृत्य, बाहुल्यांचे खेळ, जादूचे खेळ, शॅडो प्ले, हातचलाखीचे खेळ इ. सर्व कलाप्रकार बालरंगभूमी च्या कक्षेत येतात, कारण त्या कला बाल मनोरंजनाचे कार्य करतात. भातुकली खेळणारी मुले बालरंगभूमीचाच एक भाग असतात.

शाळेचे गॅदरिंग बालरंगभूमीचा उत्तम अविष्कार. शाळेच्या संमेलनात मुले गातात नाचतात, नाटक करतात, विविध सोंग घेतात. मुलेच मुलांचे मनोरंजन करतात. शिक्षण हा जसा प्रत्येक मुलाचा अधिकार आहे तसाच बालरंगभूमी हा देखील प्रत्येक मुलाचा अधिकार आहे. गॅदरींगमुळे शाळेतील मुलांना रंगमंचावर जाण्याची संधी मिळते तसेच बालरंजनाचे कार्य सहजपणे साधले जाते. शिशु वर्गातील मुलांना बाहुल्यांचे खेळ आवडतात. बाल आणि किशोर गटातील मुलांना जादूचे प्रयोग बघायला आवडतात. शॅडो प्ले (सावल्यांचे खेळ) जगलर्स, हे सर्व प्रकार मुलांना रमवणारे असतात आणी म्हणूनच हे कलाप्रकार बालरंगभूमीचा एक भाग असतात.

बालरंगभूमीची चर्चा करतांना फक्त बालनाट्याचा विचार करून चालणार नाही. बालनाट्यासोबत, बालसंगीत, बालनृत्य, बाहुल्यांचे खेळ, मुखवटा नाट्य आदी कलांचा विचार देखील या लेखमालेत करणार आहोत.

बालरंगभूमीची सुरुवात कधी झाली? उत्तर आहे प्राचीन काळापासून भारतीय परंपरेत ६४ कलांचा उल्लेख मिळतो. ‘बाल क्रीडा कर्म’ या कलेचा स्पष्ट उल्लेख ६४ कलांमध्ये आहे. बाल क्रीडा कर्म ही कला बालकांच्या मनोरंजनाशी संबंधित होती. याचाच अर्थ बालरंजनासाठी सादर केली जाणारी ही कला बालरंगभूमीशी संबंधित असावी.

“बालनाट्य” हा बालरंगभूमी चा घटक.आधुनिक मराठी बालनाट्य ची परंपरा ६० वर्षांची.पुढील लेखात महाराष्ट्रातील बालनाट्य ची सुरुवात आणि बालनाट्याचा प्रभाव आणि प्रसार या विषयी जाणून घेऊया.

— राजू तुलालवार.

टीप: (आपल्या शंका आणि प्रश्न कमेंट करून विचारू शकता.)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..