नवीन लेखन...

बालनाटयाची पुढील दोन दशके (बालरंगभूमी माझ्या नजरेतून – भाग ३)

बालनाटयाची पुढील दोन दशके (१९८०-२०००)

मुलांना नाटक बघायला जेवढे आवडते तेवढेच ते करायलादेखील आवडते. बालनाट्यात मुलांचा सहभाग महत्वाचा. मुलांच्या कलागुणांना संधी देणे हे बालरंगभूमीचे मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे ही संकल्पना जनमानसात मूळ धरू लागली.पहिल्या दोन दशकात बालनाट्याचा प्रचार आणि प्रसार जोरदार झाला खरा पण मुलांना बाल प्रेक्षकाच्या भूमिकेत बसवलं गेलं. बालनाट्यात मुलांचा सहभाग वाढावा म्हणून काही शाळा मुलांचे नाट्यप्रयोग करू लागल्या. या शाळांना रंगमंच आणि बालप्रेक्षक मिळावा म्हणून सुधा करमरकर यांच्या ‘कला अकादमी’ने व अरविंद वैद्य यांच्या ‘कुमार कला केंद्रा’ने ८० – ९० दशकातआंतरशालेय एकांकिका स्पर्धा मुंबईत सुरू केल्या. बाल्कन जी बारी यांनीही आंतर शालेय नाट्य स्पर्धा घेतल्या… त्यातूनच शालेय रंगभूमीचा उदय झाला.शालेय नाट्य आणि मनोरंजक बाल नाट्य अशा दोन प्रकारात बाल नाट्य विभागले गेले.

शालेय रंगभूमीमुळे बाल नाट्य क्षेत्रात क्रांती होऊन नव्या दमाचे शिक्षक-लेखक/दिग्दर्शक बालरंगभूमीला मिळाले.. माझी स्वतःची वाटचाल याच शालेय रंगभूमीवरून सुरू झाली. शाळेत नाटक बसवल्यामुळे शेकडो बालकलाकारांना त्यांचे कलागुण दाखवण्याची संधी मिळाली. मुलांच्या सतत संपर्कात असणारे शिक्षकच बालनाट्य लिहून बसवू लावले. माधव साखरदांडे, डॉ. विजया वाड, विद्या पटवर्धन, ज्योतिराम कदम, विलास जोशी, विश्वास धुमाळ (मुंबई) गिरीश सहदेव (लातूर), मंदार काळे (सोलापूर),डॉ.राजेंद्र चव्हाण (कोकण) ही नावे या संदर्भात उल्लेखनीय आहेत. शालेय रंगभूमीमुळे बालनाट्य फँटसीच्या प्रभावातून मुक्त होऊन वास्तववादी झालं. परीकथेऐवजी मुलांच्या विश्वाशी नातं सांगणारे शाळा, अभ्यास, घर, मैत्री, भूतदया, खेळ-खेळणी इत्यादी विषय बालनाट्यात येऊ लागलेत. राजा-राणी, परी-राक्षस, चेटकिणीची पात्रे जाऊन त्यांची जागा आई-बाबा, शिक्षक, रोबो, डॉक्टर यांसारख्या वास्तविक पात्रांनी घेतली. दोन अंकी, दिर्घांकांऐवजी शालेय बालनाट्य एकांकिका स्वरूपात सादर होऊ लागलं आणि यातूनच ‘मिनी मंगळावर’ (परग्रह प्रवास), ‘माझं पाखरू'(भूतदया), ‘कुंपणाबाहेरची फुले’ (बालगृह), ‘शाळा निर्मित एके शाळा’ (वाढता अभ्यास), ‘केल्याने होत आहे रे’ विषया (गृहपाठ), ‘मर्कटकथा’ (प्राणिप्रेम), ‘गोष्ट एका मतक पप्पीची’ (मंदबुद्धी मुलं) अशा एकांकिका स्पर्धेत यश खोक मिळवल्या झाल्या. या एकांकिकांना बालप्रेक्षकांचाही उदंड प्रतिसाद लाभला.

शालेय रंगभूमीच्या प्रभावामुळे मनोरंजक (व्यावसायिक) बालनाट्यानेही कात टाकली. दोन अंकी बालनाट्याऐवजी बालनाटिका सादर करण्याची प्रथा सुरू झाली. यातूनच एकाच तिकीटात तीन बालनाट्ये ही संकल्पना आली.बाल प्रेक्षकांना दोन अंकाचे दोन तासांचे एकच नाटक बघण्यापेक्षा तीन वेगवेगळया विषयांवरचे तीन वेगवेगळे एकांक बघण्यात जास्त रस वाटू लागला.

बदलत्या काळानुसार व्यावसायिक मनोरंजक बालनाट्याचे विषय बदलले आणि त्यातूनच ‘ब्रुस ली माझा दोस्त’, ‘चिंगू चिंगम बबली बबलगम’, ‘आम्ही शाळेत जाणार नाही’ (आकांक्षा निर्मित), ‘आईबाबा हरले’, ‘वाघोबाची दिवाळी’, ‘पैशाचे झाड’, ‘मिकीमाऊस हरवला’, ‘फटाक्यांना घाबरणारे डॉक्टर’, ‘चंदू चंद्रावर’ मुल (चिल्ड्रेन्स थिएटर), ‘गोल्डन गँग’, ‘बुटबैंगण’, ‘ढग माध ढमोजीचा पाणी प्रताप’ (बालनाट्य निर्मित), ‘जुळ्या राक्षसांची धम्माल’, ‘शाब्बास लकड्या’ (समूहनिर्मित) इत्यादी आकर्षक नावांची, वेगवेगळ्या विषयावरची बालनाट्य आलीत.या दोन दशकात अनेकांनी वेगवेगळ्या संकल्पना राबवून बालनाट्य सेवा केली आणि बालनाट्यांची वेगवेगळी दालने मुलांना,पालकांना,रंगकर्मीयांना उघडून दिली.

याच काळात रत्नाकर मतकरींनी बालनाटय बागेत ट्रकवर, चहाच्या खोक्यांसोबत सादर करण्याची कल्पना प्रत्यक्षात आणली. ‘आविष्कार’च्या चंद्रशाला या संस्थेच्या सुलभा देशपांडे यांनी ‘दुर्गा झाली गौरी (१९८२)’सारख्या सुंदर नृत्यनाटिकेची निर्मिती करून बालरंगभूमीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले, मीना नाईक यांच्या ‘कळसुत्री’ या संस्थेनेसुद्धा मुलांसाठी जागृती कार्यक्रम निर्मिती करून वेगळी वाट जोपासली. पुण्यात जयंत तारे मनोरंजक बाल नाट्याची धुरा सांभाळत असताना, मोहन आगाशे यांनी १९८६ मध्ये,महाराष्ट्र कल्चरल सेंटर या संस्थे द्वारे ग्रीप्स थिएटरची संकल्पना उचलून धरत मोठ्यांनी लहान मुलांसाठी बालनाट्य करण्याचा अभिनव प्रयोग केला. नागपुरात रंजन दारव्हेकर यांनी बालनाट्य चळवळ पुढे नेली मुलांच्या व्यक्तिमत्त्वविकासासाठी बालनाट्य प्रभाव माध्यम आहे हे सर्वमान्य झालं आणि मुलांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी बालनाट्य शिबिरांची सुरुवात १९८० पासून झाली. सुधा करमरकरांनी आंतरशालेय स्पर्धाबरोबर बालनाट्य शिबिरं देखील घ्यायला सुरुवात केली आणि मग अनेकांनी त्यांचाच कित्ता गिरवला.शहरात पालकांनी या नाट्य शिबिरास उदंड प्रतिसाद दिला. पुढील वीस वर्षांत बालनाट्य शिबिरां अमाप लोकप्रियता लाभली. श्रीराम बडे यांचे ना शिबिर घेण्यामध्ये आघाडीवर होतं.पुण्यात प्रकाश पारखी तर नागपुरात संजय पेंडसे यांनी बालनाट्य शिबिरांतुन नवे बाल नाटय पर्व आरंभले.या नाट्य शिबिरातून उतोमत्तंम शिबिर नाट्यांची निर्मिती करून मनोरंजक रंगभूमीवर त्यांचे प्रयोग करण्याचा प्रघात पडला. या सर्व मांदियाळीत मुंबईच्या डॉ. कांचन सोनटक्के यांनी वेगळी वाट धरुन अपंग/विशेष मुलांच्या विकासासाठी बालनाट्या माध्यम वापरून विशेष मुलांची एक जगावेगळ बालनाट्यनगरी साकारून सगळ्यांना तोंडात बोटं घालायला लावली.

शालेय रंगभूमी पुढे दोन वेगवेगळ्या प्रकारे विभागली गेली.अंतर शालेय स्पर्धा आणि शालेय मंचावर होणारी प्रबोधनात्मक बालनाट्ये..आणि नाट्य शिबिरातून आकारास आलेली मनोरंजक बालनाट्ये… सुधा करमरकर यांच्या काळातील बालनाट्यांची शैली या दोन दशकात हळू हळू नष्ट होत गेली.बालनाट्यांवरचा प्रौढ रंगभूमीवरील प्रभाव हळू हळू पुसला गेला.बाल सुलभ अभिनय आणि बालसुलभ लीला यांना प्रेक्षकांची पसंती मिळू लागली.बालनाट्य बालिश झाले परिणामी बालकांच्या अधिक जवळ आले.

बाल नाट्यांचा या दोन दशकांतील प्रवास विविध रंगी असला तरीही तो सरळ,सोपा नव्हता कारण या दोन दशकांत छोट्या पडद्याने ,टीव्हीने बाल रंगभूमी समोर प्रचंड आव्हान निर्माण केले होते. विविध मालिका, कार्टून्स, सिनेमा, विविध चॅनल्सच्या चकचकीत अशा कार्यक्रमांनी बालप्रेक्षक गिळंकृत करायला सुरुवात केली होती. पण तरीही याच काळात बालनाट्यांची आणि ते सादर करणाऱ्या संस्थांची, प्रयोगांची, बालप्रेक्षक संख्या दुपटीने वाढली. आकाशवाणी आणि दूरदर्शन यांनी बाल नाटयाला नवा प्रेक्षक मिळवून दिला.टीव्हीच्या ‘किलबिल’ आकाशवाणीच्या ‘बालदरबार, बालोद्यान,गम्मत जंमत’ या सारख्या कार्यक्रमांमुळे शालेय रंगभूमीला चालना मिळाली व याचा फायदा बालरंगभूमी अधिकाधिक लोकप्रिय होण्यात झाला.

बाल नाट्यांचा पुढील दोन दशकांतील प्रवास सोपा होता की खडतर? काय घडले बालरंगभूमीवर? हे आपण पुढिल लेखात जाणून घेऊ.

— राजू तुलालवार.

टीप: (आपल्या शंका आणि प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये मांडू शकता.)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..